तोंड कडू होणे यावरती उपाय/tond kadu hone yavarti upay
तोंड कडू होणे यावरती उपाय-
- तोंड कडू होणे
बऱ्याचदा आपले तोंड कडू होत असते. या त्रासात घेतलेले अन्न कडू लागते व आपल्याला काहीही खाण्याची इच्छा होत नाही.
उपाय -
1) तोंड कडू झाल्यावर नंतर आपल्याला आवडतील असे पदार्थ खावेत.
2) तोंडाला चव येण्यासाठी दोन मिरी चावून खाव्यात.
3) तोंडाची चव सुधारण्यासाठी मोसंबी, कैरी, संत्रे असे वेगवेगळे आंबट फळे खावेत.
4) तोंड कडू झाल्यानंतर दही भातात थोडे सैंधव मीठ घालून खावे. यामुळे तोंडाला चव येण्यास मदत होते.
5) तोंडाला चव येण्यासाठी लिंबाचे लोणचे आहारात समविष्ट करावे.
6) तोंडाची चव सुधारण्यासाठी ताज्या फळांचा रस, लिंबूपाणी, ताक असे द्रव्य पदार्थ घ्यावेत.
7) तोंडाची स्वच्छता ठेवावी. यासाठी दिवसातून दोन वेळा दात घासावेत. दात घासताना जिभेची देखील स्वच्छता करावी.
या उपायाने तोंडाला चव येण्यास मदत होते.
Post a Comment