नदीचे आत्मवृत्त/Nadiche Atmavrutta
होय, मी नदी बोलतेय. मीच ती नदी, जी तुम्हाला पाहायला डोंगरातून इथपर्यंत आले. हो बरोबरच ऐकलं. माझा जन्म हा डोंगरावरती झालेला आहे. बऱ्याच वळणावळणांनी, दगड धोंड्यातून मी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. माझा प्रवास हा खूप दूरपर्यंतचा आहे. माझ्यासारख्या अनेक माझ्या बहिणी, नद्या मला येऊन मिळतात आणि आम्ही सर्वजणी एका विशाल महासागरामध्ये जाऊन विलीन होतो. मी निसर्गाचा आस्वाद घेत घेत सतत चालत राहते. कंटाळा आला तरी थांबू वाटत नाही, कारण जी माझ्या आगमनाची वाट अगदी आतुरतेने पाहत असतात, त्यांना मला आनंदी करायचे असते.
माझे जिवलग मित्र - झाडे हे सुकलेली असतात. मी आल्यानंतर ते हिरवेगार होऊन स्वतःही आनंद राहतात व मलाही आनंद ठेवतात. पशु-पक्षी, प्राणी यांची ही माझ्यामुळे तहान भागते. पाणी पिण्याच्या ओढने दूर वरून पक्षी मला भेटायला येतात. याचा मला खूप आनंद होतो. माझी वेगवेगळी नावे आहेत, जसे की-गंगा, कृष्णा, नर्मदा, कोयना इत्यादी मला माझे नावे ऐकूनही खूप अभिमान वाटतो. प्रवास करत असताना मला दुखापतही होतात. मोठमोठाली दगडे माझ्यावरती येऊन आदळतात. पण मी त्यांनाही अजिबात घाबरत नाही. माझा प्रवास मी सतत चालूच ठेवते. मला मी नदी असल्याचा खूप गर्व वाटतो. कारण माझ्यामुळे कित्येक जण आनंदी राहतात पण कधी कधी खूप दुःखही होते. दुःख यामुळे की मी ज्या मानव जातीला पाहायला इथपर्यंत आले त्यांनीच आज मला निराश केलेले आहे. माझ्या किनाऱ्यावर लोक वस्त्या, घरे बांधतात. लोक माझा वापर अंघोळीसाठी, पिण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी इत्यादी कामासाठी करतात. एवढेच नाही तर गावाकडच्या लोकांचे उपजीविकेचे साधन हे शेती आहे आणि ती शेती ही माझ्यावरतीच अवलंबून आहे. शहरातील लोकही जागो - जागी नळ काढून पाण्याची व्यवस्था करतात. ते पाणी ही मीच त्यांना पुरवते. अगदी मनमोकळ्या पणाने मी त्यांना मदत करते. पण माणसांना या गोष्टीची जाणीव राहिलेली नाही.
शहरी भागात माझ्या जवळच मोठ-मोठी कारखाने उभारली आहेत. आणि त्या कारखान्यातून येणारे घाण पाणी माझ्या स्वच्छ पाण्याला खराब करते. तेच दूषित पाणी घेऊन मी प्रवास करत असते. गावाकडील लोकही माझ्या पाण्यात घाण कपडे फेकून देतात. प्लॅस्टिकच्या वस्तूंनी तर मला पूर्णपणे भरून टाकतात. यामुळे मला माझा प्रवास करायलाही खूप अडचण येते. हे माणसाचं वागणं पाहून मला खूप खंत वाटते.
मला दूषित केल्याने मला तर त्रास होतच आहे. पण माझ्यापेक्षाही मानवाला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे. पण हे मानवाला समजायला तयारच नाही. जर मानवाने ठरवले तर, तो मलाही आनंदी ठेवू शकतो व स्वतःही आनंदी राहू शकतो. माणूस मला एवढा त्रास देतो याचा मला रागही येतो. पण तोच माणूस जेव्हा माझ्या पाण्याने स्नान करून, स्वतःला पवित्र समजतो आणि मलाही पवित्र मानतो त्यावेळेस मला खूप बरे वाटते. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, माझं पाणी कायम राहावं व मी मनुष्य, पशु, पक्षी, जीव-जंतू यांना सुखी ठेवावं व मी स्वतःही आनंदी रहाव.
Post a Comment