ओवा खाण्याचे काही विशेष फायदे -OVA Khanyache vishesh Fayde





 ओवा खाण्याचे काही विशेष फायदे -

ओवा हा एक मसाला आहे. जो प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात सहजासहजी उपलब्ध असतो. स्वयंपाकात वापरला जाणारा हा ओवा आपल्या आरोग्यासाठी औषधासारखा उपयुक्त आहे. ओव्यामध्ये अँटीव्हायरल आणि अँटिऑक्सिडंट असे गुणधर्म आहेत. जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. काही आजारांमध्ये तर ओवा खाल्ल्याने आजार सुद्धा बरे होतात. 
        
       कोमट पाण्यात ओवा टाकून खाल्ल्याने औषध खाल्ल्यासारखा परिणाम शरीरावरती होतो. ओव्याचा उपयोग भारतीय घरांमध्ये अनेक वर्षापासून केला जात आहे. पोटाची समस्या असल्यानंतर ओव्याचा वापर केला जातो.

      रात्री कोमट पाण्यात पाण्यासोबत ओवा खाल्ल्याने अनेक फायदे होतात. जसे की कोमट पाण्यात ओवा चावून खाल्ल्याने गॅस, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी यासारख्या समस्या दूर होतात. ओवा
 खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास सुद्धा मदत होते.

         रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा ओवा चावून कोमट पाणी पिल्याने पोटात जमा झालेला वायू निघून जातो. आणि अपचनाची समस्या ही दूर होते. ओवा खाल्ल्याने चयापचनाची क्रिया वाढते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी कोमट पाण्यात ओवा खाल्ल्याने चरबी कमी होण्यास मदत होते.
अनेकांना गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय असते. जर तुम्ही रात्री एक चमचा ओवा कोमट पाण्यासोबत खाल्ला तर सतत पोट भरल्यासारखे वाटेल व जास्त खाण्यापासून दूर राहताल. रात्री जर एक चमचा ओवा पाण्यासोबत खाल्ला तर शरीराला आरामही मिळेल व चांगली झोप येईल. ओव्यामध्ये शरीर आणि मन शांत करणारे व शांत झोप आणणारे असे गुणधर्म आहेत.
ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. अशा लोकांना तर हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. कोमट पाण्यासोबत ओवा खाल्ल्यास सर्दी व खोकल्याचा त्रास कमी होतो.

         ओवा खाणे विशेषता महिलांसाठी चांगले आहे. हे मासिक पाळीच्या दरम्यान अस्वस्थपणापासून मुक्त होण्यास मदत करते. ओवा खाल्ल्याने हार्मोनल बॅलन्स राहतो व रक्तभिसरण सुधारते. हिवाळ्यात तर विशेषतः ओव्याचे खूप महत्त्व आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे  संसर्गजन्य आजार होणे सहाजिकच आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या समस्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी ओवा खाल्ल्याने त्याचे बरेच फायदे शरीराला होतात. ओवा हा गरम पदार्थ असल्यामुळे हिवाळ्यात आपल्याला तो आजारांपासून दूर राहण्यास मदत करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.