आपला मेंदू हेल्दी कसा ठेवावा याबद्दल काही टिप्स -

 

आपला मेंदू हेल्दी कसा ठेवावा याबद्दल काही टिप्स -


मानवाला अनेक प्रकारच्या सवयी असतात. काही चांगल्या सवयी तर काही वाईट. चांगल्या सवयींमुळे माणूस तर चांगलाच राहतो परंतु काही वाईट सवयी अक्षरशः मेंदूची वाट लावत असतात. कारण त्या वाईट सवयी कामच तंस करत असतात. अशा काही वाईट गोष्टीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आणि त्या टाळणे खूप गरजेचे आहे. 


1) अपुरी झोप 

     झोपल्यानंतर मेंदूला विश्रांती मिळते . याशिवाय झोपेच्या वेळी मेंदू नवीन पेशी तयार करत असतो. मात्र जर आपण सात तासांपेक्षा कमी झोपलो तर नवीन पेशी तयार होत नाहीत. सोबतच झोपेच्या कमतरतेमुळे डिमेन्शिया, अलझायमर अशा आजारांचा धोकाही वाढतो.
           जर आपल्याला आपल्या मेंदूचे संरक्षण करायचे असेल तर रात्री किमान सात तासांची झोप घेणे गरजेचे आहे. आठ तास झोपणे हेही मेंदूसाठी चांगलेच आहे. अमेरिकेच्या न्यूरोलॉजी आणि वेलनेस सेंटरच्या मते - आपल्या मेंदूचे सर्वात जास्त नुकसान हे अपुऱ्या झोपी मुळे होते. प्रौढांसाठी पुरेशी झोप म्हणजे दिवसातील 24 तासांपैकी सात ते आठ तासांची झोप होय आणि रात्री सलग झोप घेणे तर चांगलेच ‌.



2) नाश्ता टाळणे 

     रात्रभर न जेवल्यानंतर दिवसभर काम करण्याची ऊर्जा ही आपल्याला नाष्ट्या मधून मिळते. पण काहीजण कामासाठी किंवा इतर गोष्टींसाठी घाई करतात व नाश्त्यासारखी महत्त्वाची गोष्ट सोडून देतात . असे केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते व त्यामुळे मेंदूवरती परिणाम होऊ शकतो.


3) पुरेसे पाणी न पिणे 

    आपल्या मेंदूतील 75 टक्के भाग हा पाण्याचा आहे. त्यामुळे आपण तहानलेले असलो की आपला मेंदू नीट काम करत नाही. तज्ज्ञांच्या मते - प्रौढ व्यक्तीने आपला मेंदू निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून कमीत कमी दोन लिटर पाणी प्यायला हवे.


4) दीर्घकाळ तणावात असणे 

     खूप काळ तणावामुळे मेंदूच्या पेशी मरतात. आणि मेंदूचा पुढचा भाग हा आकुंचन पावतो. या गोष्टीचा आपल्या विचारशक्तीवरती व स्मरणशक्तीवरती परिणाम होतो. संशोधक म्हणतात की - जे लोक सतत कामात गुंतून राहतात व कोणत्याच कामाला नाही म्हणू शकत नाही अशा लोकांना सर्वात जास्त ताण सहन करावा लागतो. पण असे करणे ताबडतोब थांबवले पाहिजे. कोणत्याही प्रकारे अतिरिक्त  तणाव घेणे टाळले पाहिजे.


5) अंधारात जास्त वेळ घालवणे 

      जास्त प्रकाश आणि हवेची हालचाल होत नसलेल्या अशा या वातावरणामुळे मेंदूवरती मोठा दबाव निर्माण होतो. कारण सूर्यप्रकाशाचा संपर्क आपल्या मेंदूसाठी खूप महत्त्वाचा असतो. नाहीतर मग निराशासारख्या काही समस्या उद्भवू शकतात. आपला मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आपण दररोज उन्हात जाणे गरजेचे आहे. यासाठी बाहेर जायला हवे. जर तुम्ही घरी असाल तर दरवाजे व खिडक्या उघडे ठेवले पाहिजेत. आणि सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

6) नकारात्मक विचार 

      नकारात्मक विचारांमुळे तणाव, नैराश्य , चिंता निर्माण होते. म्हणून नकारात्मक विचार करणे टाळलेच पाहिजे. जर आपण असे वारंवार केले तर आपल्याला त्याची सवय लागेल. जर एकट्याने हे थांबवणे शक्य नसेल तर मानस उपचार तज्ञांची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो. जे लोक आपली एनर्जी खाली आणतात अशा व्यक्तींपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

7) सतत एकटं राहणं 

       लोकांमध्ये मिसळणे, लोकांसोबत गप्पा मारणे, राहणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. एकटे राहिल्यामुळे पुरेशी झोप न मिळणे एवढाच वाईट परिणाम आपल्या मेंदू वरती होत असतो. मित्र-मैत्रिणी सोबत व घरातल्या व्यक्तीसोबत राहिल्यामुळे आपला मेंदू ताजातवाना राहतो.


8) सतत हेडफोन वापरणे 

          मोठमोठ्या आवाजात गाणे ऐकणे किंवा मोठ्या गोंगाटात जास्त वेळ राहिल्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. श्रवणशक्ती कमी झाली तर त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवरती होतो. यामुळे अभ्यास करणे व लक्ष केंद्रित करणे कठीण होऊन जाते. हेडफोन वापरण्यापूर्वी व जास्त गोंगाटात राहण्यापूर्वी विचार करणे खूप गरजेचे आहे.


9) गुगल सर्चचा अतिवापर 

        आपल्याला किती फोन नंबर पाठ असतात? किती पत्ते किती संदर्भ आपल्याला तोंडपाठ असतात ? गुगल असल्यामुळे आपण सध्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे कष्टच घेत नाहीत .आपण एखादी गोष्ट पटकन सर्च करतो, वापरतो आणि पुढे जातो. यामुळे आपली स्मरणशक्ती व विचारशक्ती दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेली आहे. जर मेंदूला चालक ठेवायचे असेल तर इंटरनेटचा वापर टाळला पाहिजे व मेंदूला विचार करण्यास भाग पाडले पाहिजे.


10) जास्त खाण्याची सवय 

       कितीही हेल्दी फूड असेल तरीही ते जास्त खाण्याची सवय ही मेंदूला हानिकारकच असते. संशोधनातून असे दिसून आले आहे की - जास्त खाल्ल्यामुळे मेंदूच्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. आणि रक्तप्रवाह कमी होतो. म्हणूनच मध्यम व योग्य आहार घेणे महत्त्वाचे मानले जाते.


11) अतिरिक्त स्क्रीन टाईम 


      जास्त स्क्रीन टाईमचा मेंदूच्या आकारावर व विकासावर मोठा परिणाम होतो. मोबाईल फोनच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने डोकेदुखी, ब्रेन ट्यूमर यासारखे आजार होऊ शकतात. या कारणामुळेच मुलांचा स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे. तसेच फोन रात्री झोपताना उशाशी व शरीराच्या अगदी जवळ ठेवून झोपणे टाळले पाहिजे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.