झाडाचे आत्मवृत्त/Zadache Aatmvrutta
मी एक झाड बोलतोय. मी ते झाड आहे - जे सर्वांना निस्वार्थाने पाहिजे ते देऊन टाकतो. कोणताही विचार न करता ज्याला जे हवे आहे ते देतो. पक्षी माझ्या डोक्यावरती घर बांधतात, प्राणी माझ्या सावलीमध्ये आराम करतात, कधी कधी तर माझ्या फांद्यांना, फुलांना, फळांनाही खातात. प्राण्यांबरोबर माणसेही माझा आस्वाद घेतात.
कधी उन्हात चालता चालता माणसे थकले की माझ्याच सावलीमध्ये येऊन शांत होतात. माझे फळेही खातात. जेव्हा ते म्हणतात ना किती छान झाड आहे हे! सावली देत आहे आणि फळेही खायला किती गोड आहेत. जेव्हा मीच माझं कौतुक ऐकतो ना तेव्हा मला पण भन्नाट आनंद होतो व मी पण वारा आला की नाचायला लागतो. आज मी एवढा हिरवेगार, टवटवीत व भक्कम आहे याचा मलाही अभिमान वाटतो. पण कधी कधी भीतीही वाटू लागते. भीती यासाठी की माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी मला व माझ्या मित्रांना कापून नेतो या गोष्टीचा मला खूप त्रास होत आहे.
ज्या माणसासाठी मी शुद्ध हवा देतो. मी स्वतः कार्बन डायऑक्साइड घेतो व त्यांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन देतो. तेच माझ्यासोबत अन्याय करत आहेत. ज्यांना मी जीवदान देतो तेच माझ्या जीवावर उठले आहेत. या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. जेव्हा माणूस माझ्या सावलीला येऊन झोपतो, माझे फळेही खातो, त्यावेळेस मी त्याला नाराजही करत नाही, उठ नको बसू माझ्या सावलीला, नको खाऊस माझी फळे, नको तोडूस माझे फुले असं म्हणत नाही. उलट मी तर सगळंच आनंदाने त्याला देतो पण तो उपकाराची फेड जाणूनच घेत नाही.
दिवसेंदिवस तापमान वाढत चाललेले आहे. जमिनीची धूप होत आहे. याचं कारण हे आहे की मला तुम्ही नष्ट करत आहात. एवढेच नाही तर माझा वापर तुम्ही इंधन म्हणूनही करतात, इमारत बांधण्यासाठी, फर्निचर तयार करण्यासाठी, खेळणी, शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी, औषधांसाठी, कागद निर्मितीसाठी, जहाज बांधणीसाठी अशा विविध गोष्टींसाठी तुमचा फायदा तुम्ही करून घेतात. आणि हे पण लक्षात ठेवा की आज पाणी तुम्हाला किती महत्त्वाचं आहे पाण्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही, पाणी हवं असेल तर पाऊसही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि पाऊस माझ्यामुळेच पडतो. माझ्यामुळेच पाणी जमिनीत शोषले जाते व पर्यावरणाचा समतोल ही राहण्यास मदत होते.
तुम्हाला निसर्गाने दिलेली अनमोल देणगी तुम्ही हातानेच नष्ट करत चालला आहेत. एक प्रकारे माझा ऱ्हास होत चालला आहे. हे थांबवण्यासाठी तुम्हाला याबाबत जागृत होणे गरजेचे आहे. देणाऱ्याने देत जावे या प्रकारे मी तुम्हाला सगळं देतो. उत्तम आरोग्य देतो, संरक्षण देतो, स्वच्छ पर्यावरण देतो, मी तुमचा आधार आहे. निसर्गाची शान आहे. माझे रक्षण हेच तुमचे संरक्षण. मानवी जीवनात व माझ्यात एक अतूट असं मैत्रीचं नातं असने खूप गरजेचे आहे. असं मला वाटतं, पण हे तुम्हाला कळायलाच तयार नाही तुम्ही ठरवले तर मला वाचू शकता. पण हे सर्व तुमच्याच हातात आहे की मला जगवायचं की मारायचं?
"झाडे हेच आपले जीवनदायी मित्र आहेत"
Post a Comment