सायना नेहवाल/ Saina Nehwal

  


                खेळ हा सगळ्यांचाच आवडता असतो. मग तो खेळ कोणता पण असो. सर्व माणसांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ हा खेळलाच पाहिजे. आजच्या काळात खेळ हा फक्त खेळच राहिला नाही तर एक पैसा कमविण्याचे व प्रसिद्ध होण्याचे साधन बनलेला आहे. खेळ हा करिअरच्या  नवनवीन संध्या निर्माण करत आहे.

            आपल्या देशाबद्दल बोलायचे झाले तर सर्वांचा आवडता खेळ हा क्रिकेटच आहे. परंतु आजकाल खेळाच्या सर्व क्षेत्रांमध्ये लोकांची उत्सुकता ही वाढत चाललेली आहे. मागील काही वर्षापासून  क्रिकेटनंतर बॅडमिंटन खेळामध्ये सर्वांचे उत्सुकता पाहायला भेटलेली आहे. बॅडमिंटन खेळाचे खेळाडू पण खूप आपले शानदार प्रदर्शन दाखवून लोकांसमोर आलेले आहेत. एक वेळ अशी होती, ज्यावेळेस बॅडमिंटन हा खेळ गल्ली व मोहल्यामध्ये रात्रीच्या वेळेस एक मज्जा म्हणून खेळला जात असायचा. परंतु देशाच्या काही विशेष खेळाडूंनी या खेळाला एक नवीन ओळख निर्माण करून दिलेली आहे. जसं की सायना नेहवाल, पी व्ही सिंधू, श्रीकांत इत्यादी. ज्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती होणाऱ्या प्रतियोगिता मध्ये खूप पदके जिंकून देशाचा मान, सन्मान वाढवला आहे. यांना पाहून देशाचे हजारो मुले प्रेरित झालेली आहेत आणि त्यांच्यासारखेच बॅडमिंटन खेळाडू बनण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका बॅडमिंटन खेळाडू विषयी आपण माहिती पाहणार आहोत आणि त्या बॅडमिंटन खेळाडू म्हणजे सायना नेहवाल या होय.

            17 मार्च म्हणजे तो दिवस ज्या दिवशी या देशाच्या इतिहास एक सुसंगत अशी घटना घडली होती. त्यादिवशी या देशाने जगाला अशा दोन कन्या दिल्या ज्यांनी पूर्ण जगामध्ये कीर्ती स्थापित केली. 17 मार्च 1962 मध्ये अंतरिक्ष यात्री कल्पना चावला व 17 मार्च 1990 मध्ये सायना नेहवाल यांचा जन्म झाला आणि आणखी एक संयोग म्हणजे दोघींचा जन्म हा हरियाणामध्ये झाला होता. कल्पना चावला यांचा जन्म करनाल मध्ये व सायना नेहवाल यांचा जन्म हिसार मध्ये झाला होता. आज आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे सायना नेहवाल यांच्याबद्दल होय. फक्त त्यांच्या उपलब्धी वरती आपण माहिती पाहणार नाहीत ती तर आपल्याला कुठे पण सहजरित्या भेटेल. आज आपण त्यांच्या संघर्षावरती माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये सायना नेहवाल यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान "पद्मभूषण" हा पुरस्कार भेटलेला आहे.

                सायना नेहवाल यांचा जन्म 17 मार्च 1990 मध्ये उषाराणी आणि व हरवीर यांच्या घरी झाला. उषा राणी व हरवीर सिंह हे सायनाचे आई-वडील आहेत. सायना या त्यांच्या दुसरी कन्या होत्या. दुसरी पण मुलगीच जन्माला आली या कारणाने सायनाच्या आजीने एक महिना सायनाचे तोंडही पाहितले नाही. पण आता या घटनेला पण ऐका, आज याच साईना नेहवालला भारताने 'गर्ल चाइल्ड चॅम्पियन ऑफ इंडियाचे' ब्रँड अँबेस्टर बनवले आहे आणि या सायन नेहवाल यांना पीएम मोदी ने 'डार्लिंग डॉटर ऑफ इंडिया' असेही म्हटले आहे. 

                हरियाणा मध्ये बॅडमिंटन ऐवजी कबड्डी, कुस्ती या खेळाला जास्त महत्त्व दिले जाते. परंतु तरीही सायनाने कराटे खेळायला चालू केले व त्याच्यामध्ये ब्राऊन मेडल मिळवले. नंतर वडिलांचे ट्रान्सफर हे हैदराबादला  झाले. त्यावेळेस हैदराबाद मध्ये सगळीकडे बॅडमिंटन व पी. गोपीचंद यांची चर्चा होती की, त्यांनी नॅशनल टायटल व ऑल इंग्लंड क्राऊन जिंकले होते. स्पोर्ट  साउथरीटी ऑफ आंध्रप्रदेशचे बॅडमिंटन कोच Mr.B.S.S नानी प्रसाद राव यांची नजर आठ वर्षाच्या सायना नेहवाल यांच्या वरती पडली. व त्यांनी काही अंदाजही लावले, जे की पुन्हा सत्यातही उतरले. त्यांनी सायनाला दररोज सहा वाजता प्रॅक्टिस साठी ग्राउंड वरती बोलावले. व तेथूनच सायनाच्या खेळाची सुरुवात झाली.

                सायना नेहवाल ही एक भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू आहे. ती भरपूर वेळ नंबर 01 आंतरराष्ट्रीय खेळाडू राहिलेली आहे. त्यांच्या खेळाच्या शैलीमुळे त्यांना जगभरात प्रसिद्धी भेटलेली आहे. 2004 मध्ये त्या बॅडमिंटन या खेळामध्ये सक्रिय झाल्या. या काळामध्ये या दरम्यान त्यांनी खूप पदक अवॉर्ड व पुरस्कार मिळवलेले आहेत. सन 2009 पर्यंत सायना नेहवाल या टॉप टेनच्या बॅडमिंटन खेळाडू राहिलेले आहेत. सन 2015 मध्ये सायनाने वालिया टॉप वन च् रँक मध्ये होत्या. या जागेवरती पोहोचणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. आणि प्रकाश पादुकोण यांच्यानंतर दुसऱ्या भारतीय   होत्या. सायना नेहवाल या तीन वेळेस भारताकडून ऑलिम्पिकमध्ये खेळल्या आहेत.

                 सायनाच्या घरापासून स्टेडियम वीस किलोमीटर दूर होते. पुन्हा सकाळी सहा वाजता स्टेडियम वरती पोहोचायचे होते, त्यांच्या वडिलांना त्यांच्या सरकारी नोकरीसोबत सायनाच्या प्रॅक्टिसचाही टाईम जुळवावा लागत असे. दररोज कमीत कमी 50 किलोमीटर येणे जाणे चालूच राहायचे ते पण स्कुटी वरती. अशा अनेक प्रकारच्या समस्या सायना व त्यांच्या वडिलांपुढे उभ्या होत्या. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. हे सर्व तीन महिने चालले. आत्ता स्टेडियम जवळ घर घेण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. नंतर काही दिवसांनी त्यांनी तेथे घरही घेतले परंतु तरीही स्टेडियम पासून सायनाची घर हे सात किलोमीटर दुर होते.

                सायनाच्या कोचने त्यांना रात्रंदिवस प्रॅक्टिस करण्यासाठी म्हंटले. मग सायनाने ही त्याची प्रॅक्टिस चालू केली. स्कुटी वरती येण्यासाठी दररोज त्यांना दीडशे रुपये लागत असत. तसेच सायनाच्या बॅडमिंटनच्या सामानावरतीही खूप खर्च होत असे. व पुन्हा शाळेचा ही खर्च लागत असे. फक्त एकट्या साईना नेहवाल यांच्यासाठी महिन्याचे 12000 रुपये लागत असायचे. म्हणजे त्यांच्या वडिलांचा निम्मा पगार हा सायनावरतीच खर्च व्हायचा. आठ वर्षाच्या साईनावरती एवढा खर्च म्हणजे कठीणच होते. त्यांचे वडील फंड मधून कधी 20000 ते  30000 रुपये तर कधी एक लाख रुपये काढत असायचे. व कधी गरज पडली तर ते नातेवाईकांकडून उधार पण घेत असायचे. परंतु या गोष्टीची चाहूल त्यांनी सायनला कधीच लागू दिली नाही. त्यांची दुसरी मुलगी म्हणजे सायनाची बहीण पण मेडिसिनची तयारी करत होती. त्याचा खर्च तर वेगळाच होता. 1999 ते 2002 पर्यंत असेच दिवस चालले होते. 2002 मध्ये जेव्हा Yonex Sunrise Sport ने सायनाच्या किटची स्पॉन्सरशिप घेतली त्यावेळेस कुठे हरवीर सिंह  यांच्या जिवात जीव आला. त्यावेळेस मोठमोठ्या चॅम्पियनशिप मध्येही पुरस्कार खूप छोटे मिळायचे. (Under 10 state level championship) अंडर टेन स्टेट लेवल चॅम्पियनशिप जिंकल्यानंतरही सायनाला फक्त तीनशे रुपये भेटले होते. 

                सायनाच्या वडिलांना त्यांचे शिक्षण सोडल्याचे पण खूप दुःख व्हायचे. दोन वेळेस तर सायनाला टूर्नामेंटमुळे परीक्षेला बसण्याचा टाईम पण भेटला नाही. 2003 पर्यंत Sport authority of India कडून फक्त सहाशे रुपये महिन्याला त्यांना मिळायचे. जे 2003 मध्ये वाढून 2500 रुपये झाले. नंतर हळूहळू लोक सायनाला ओळखू लागले व फोनवरती फोन त्यांना येऊ लागले.philiphion व world juniorship मध्ये जिंकलेली चाळीस ते पन्नास हजार रक्कम फोनच्या बिल देण्यातच निघून गेली.

                 2010 मध्ये सायनाला 'राजीव गांधी खेळरत्न' अवॉर्ड  व 'पद्मश्री' पुरस्कार भेटला आणि 2016 मध्ये 'पद्मभूषणही' पुरस्कार भेटला. आपल्या सर्वांना विश्वास नाही बसणार की, एक वेळेस मीडियावाले जेव्हा सायनाचा इंटरव्यू घेण्यासाठी त्यांच्या घरी आलेले होते, त्यावेळेस त्यांना मिठाई खाऊ घालण्यासाठी ही पैसे हरवीर सिंह यांच्या जवळ नव्हते. आणि ही पण आश्चर्याची गोष्ट आहे की, आत्तापर्यंत सायना नेहवाल या कोणत्याच पार्टीमध्ये हॉटेलमध्ये व सिनेमा हॉलमध्ये गेलेल्या नाहीत.

                सायनाचे लग्न हे पारूपाली कश्यप यांच्यासोबत झालेली आहे. जे की बॅडमिंटनचे खेळाडू आहेत व आणखी एक गोष्ट म्हणजे सायना नेहवाल यांच्यावरती एक चित्रपटही  बनलेल आहे. ज्यामध्ये परिणीती चोप्राने सायना नेहवालची भूमिका निभावलेली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.