महात्मा गांधी / Mahatma Gandhi

 



          महात्मा गांधी यांचा जन्म 02 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी असे होते. व आईचे नाव पुतलीबाई हे होते. त्यांची आई या खूप धार्मिक विचारांच्या होत्या. त्यांच्या जीवनावर त्यांच्या आईंच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांनी पुढे चालून गांधीजी या स्वरूपात खूप मोठी भूमिका बजावली. त्यांचे पूर्ण नाव 'मोहनदास करमचंद गांधी' असे होते. गांधीजींचे वडील काठीयावाड राजकोट रियासत मध्ये दिवाण होते. त्यांना बापू या नावाने ओळखले जात असायचे. तसेच त्यांना "राष्ट्रपिता" हे नाव ही दिले होते. ते एक असे महान पुरुष होते जे की, अहिंसा आणि सामाजिक एकता यावर विश्वास ठेवत असायचे.  

           मे 1883 मध्ये साडे 13 वर्षाचे असताना त्यांचा विवाह कस्तुरबाबाई माखनजी यांच्यासोबत करण्यात आला. त्यावेळेस कस्तुरबाबाई या चौदा वर्षाच्या होत्या. गांधी आणि कस्तुरबा यांचे चार पुत्र होते-हरिलाल गांधी, मनीलाल गांधी, रामदास गांधी आणि देवदास गांधी हे होते.

            गांधीजींनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पोरबंदर येथे केले. तसेच मॅट्रिकची परीक्षा ते राजकोट येथे उत्तीर्ण झाले. त्याच्यानंतर ते बॅरिस्टर अर्थात वकिलीचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले. ते शाकाहारी होते. तसेच मांस,  दारू इत्यादी वाईट गोष्टींचे सेवन करत नव्हते.  या कारणामुळे त्यांना लंडनमध्ये खूप समस्यांना सामोरे जावे लागले होते. कारण लंडनमध्ये शाकाहारी जेवण भेटणे अवघड होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते भारतामध्ये परतले. परंतु त्यांना वकिलीमध्ये भारतामध्ये पाहिजे तसे यश भेटले नाही. १८९३ मध्ये एका वर्षासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये वकीलकी केली. परंतु तेथे गेल्यानंतर त्यांना भारतीयांवर झालेल्या  भेदभावांच्या समस्यांना तोंड द्यावे लागले.

             सुरुवातीला त्यांच्याकडे प्रथम श्रेणीचे तिकीट असूनही तिसऱ्या श्रेणीच्या डब्यामध्ये जाण्यासाठी त्यांनी नकार दिला यासाठी त्यांना ट्रेनमधून बाहेर काढण्यात आले होते. आफ्रिका मध्ये खूप सार्‍या हॉटेलमध्ये त्यांना जाण्यास बंदी होती. या साऱ्या घटनांनी त्यांच्या जीवनाला वेगळाच मार्ग भेटला. आणि त्यानंतर कित्येक वर्ष त्यांनी भारतीयांच्या सन्मानासाठी आणि अधिकारांसाठी कार्य केले. दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांवर झालेल्या अन्याय पाहून   इंग्रजांच्या विरोधात आपल्या देशवासीयांच्या सन्मानासाठी  त्यांनी प्रश्न उठवले. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रवासी भारतीयांच्या अधिकारांसाठी आणि  ब्रिटिश शासनाच्या रंगभेदनीतीच्या विरोधात सफल आंदोलन केले.

           सन 1915 ला भारतामध्ये परतल्यानंतर गांधीजीने सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. सन 1917 मध्ये आश्रमाचे स्थलांतर साबरमती नदीच्या किनाऱ्यावरती केले गेले. तेव्हापासून ते साबरमती आश्रम म्हणून ओळखले जाऊ लागले. गांधीजी यांनी सन 1917 मध्ये बिहारच्या चंपारण बिहार  तसेच गुजरातच्या खेडा जिल्ह्यामध्ये ब्रिटिश शासनाद्वारे शेतकऱ्यांवर लावलेल्या कराला समाप्त केले. सन 1919 मध्ये जेव्हा भारतीयांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला समाप्त करण्यासाठी ब्रिटिश सरकारद्वारे रॉलेट एक्ट बनवले होते, त्यावेळेस गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात असहयोग आंदोलनाची सुरुवात केली होती. परंतु चौरी- चोरा कांडच्या हिंसेनंतर गांधीजींनी असहयोग आंदोलनाला स्थगित करणेच योग्य समजले. गांधीजी सदैव सत्य आणि अहिंसा यांचेच समर्थन करत होते आणि ते एक शांत स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांनी त्यांच्या जीवनकाळामध्ये सदैव हिंसेचा विरोध केला.

           मार्च 1930 मध्ये मिठावर कर लावल्यामुळे गांधीजींनी त्याच्या विरोधात एक आणखी आंदोलन चालवले. जे 12 मार्च पासून सहा एप्रिल पर्यंत चालवले गेले. आंदोलनाला अहमदाबाद पासून दांडी गुजरातपर्यंत 400 किलोमीटर पायी चालून केले गेले होते. कारण मिठाचे उत्पादन स्वतः केले जावे. सन 1942 मध्ये गांधीजींनी इंग्रजी सरकारच्या विरुद्ध भारत छोडो आंदोलनाला सुरुवात केली होती. हे आंदोलन गांधीजीद्वारे इंग्रजांच्या विरोधात स्पष्ट विद्रोह होता. या विद्रोहाच्या दरम्यान गांधीजींना तुरुंगामध्ये ही जावे लागले होते. या विद्रोहाच्या शेवटी ब्रिटिशांनी स्पष्ट संकेत दिला होता की- सत्तेचे हस्तांतरण करून ते भारतीयांच्या हातामध्ये सोपवले जाईल. 

            जून 1947 मध्ये ब्रिटिशांनी वायसराय लॉर्ड लुई माउंटबेटन यांनी घोषणा केली होती की- 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य दिले जाईल. देश स्वातंत्र्य तर झाला परंतु, स्वातंत्र्यानंतर देश भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये विभाजन झाले.

            30 जानेवारी 1948 ला नवी दिल्ली येथे बिरला भवना मध्ये नाथूराम गोडसेद्वारा गांधीजींवरती गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली. गांधीजींच्या जन्मदिवसाला "आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस" म्हणून साजरी केले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.