जशास तसे /Jashas Tase

 


      एका छोट्याशा तळ्यात एक बेडूक राहत होते. बेडूक त्या तळ्यात कोणालाच पाणी पिण्यासाठी येऊ देत नव्हते. कोणताही प्राणी, पक्षी तेथे आला तर त्यांना ते तिथून हाकलून लावत असायचे. बेडकाला वाटायचे की हे तळे फक्त माझेच आहे. याच्यावर फक्त माझाच हक्क आहे. 

      एके दिवशी एक कबूतर तेथे पाणी पिण्यासाठी आले. ते कबूतर खूप तहानलेले होते.  नेहमीप्रमाणे बेडकाने त्यालाही तेथून हाकलून लावले. कबुतराने पाणी पिण्यासाठी त्याला खूप विनंती केली पण बेडकाने काही ऐकले नाही.

         पण एकदा काय झाले! त्या तळ्यातील सर्व पाणी संपले. मग ते बेडूक दुसऱ्या तळ्याच्या शोधात निघाले. बेडकाला बऱ्याच ठिकाणी तळी दिसली मात्र  एकाही तळ्यात त्याला जाता आले नाही. कारण बेडकाच्या त्या वागण्याला सर्वजण त्रासले होते. त्यामुळे कोणत्याच प्राणी, पक्षाने बेडकाला तळ्यात येऊन दिले नाही. शेवटी ते बेडूक कबुतराकडे गेले व त्याला म्हटले की- कबूतर दादा मला माफ करा. आणि तुमच्याजवळ असलेल्या छोट्याशा तळ्यात मला जागा द्या. कबुतराने ही त्याला नकार दिला व म्हंटले की जर तू मला त्यादिवशी थोडेसे पाणी पिऊन दिले असते, तर आज मी तुला कदाचित मदत करू शकलो असतो. एवढे म्हणून कबूतर तेथून निघून गेले. आता बेडकाला त्याच्या वागण्याचा त्रास होऊ लागला व शेवटी ते रडू लागले. 

तात्पर्य-आपण दुसऱ्यांसोबत जसे वागतो तसेच लोकही आपल्या सोबत वागतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.