मदर तेरेसा/ Mother Teresa

 


       या जगामध्ये जवळजवळ सगळेच व्यक्ती हे आपल्या स्वतःसाठी जगतात. पण काही असेही व्यक्ती असतात की, जे आपले सर्व जीवन परोपकारांमध्ये व दुसऱ्यांसाठी जगत राहतात. मदर तेरेसा या पण अशाच महान व्यक्ती होत्या, ज्यांनी की आपले पूर्ण जीवन हे दुसऱ्यांसाठीच घालवले. ज्यांचे हृदय हे संसारातील दिन- दलितांसाठी, आजारी व्यक्तींसाठी, असाह्य आणि गरिबांसाठी तळमळ करायचे. यामुळे त्यांनी त्यांचे पूर्ण जीवन त्यांच्या सेवा व  भलाई मध्येच घालवले. मानवता आणि त्याच्या शांतीसाठी स्वतःला समर्पित केले. त्यांना बरेच पुरस्कार देऊन सन्मानित ही केलेले आहे. ज्यामध्ये त्यांना नोबेल पीस प्राईस हा पुरस्कार मिळाला होता. त्या सोबतच कोलकत्याची भाग्यवान तेरेसा या नावाची उपाधी ही भेटली होती.

     मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 स्कोप्जे, मॅसेडोनिया या शहरात मध्ये झाला होता. त्यांचे खरे नाव अगनेस गोंझा बोयाजीजू हे होते. त्यांचे वडील निकोला बोयाजू हे साधारण व्यापारी होते. जेव्हा मदर तेरेसा या आठ वर्षाच्या होत्या त्यावेळेस त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी ही त्यांची आई द्रोणा बोयाजु यांच्या वरती आली. लहानपणापासून त्यांना धार्मिक व सामाजिक प्रचाराबद्दल गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. त्यामुळे फक्त बारा वर्षाच्या असताना त्यांनी निर्णय घेतला होता की- मी माझे पूर्ण जीवन हे समाजासाठीच समर्पित करेल आणि अठरा वर्षाच्या असताना त्यांनी sister of Loretto यामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. 15 ऑगस्ट 1928 मध्ये त्यांनी या क्रांतिकारी अभियानाची सुरुवात केली होती. त्यानंतर 1929 मध्ये मदर तेरेसा या भारतामध्ये आल्या आणि त्यांनी दार्जिलिंग येथे शिक्षण मिळवले. तेथेच हिमालयातील डोंगराजवळ संत तेरेसा स्कूलमध्ये बंगाली शिकल्या आणि मुलांना शिकवायला लागल्या. शाळेत शिकवत असताना त्यांची सारखी नजर ही खिडकीतून बाहेर असलेल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब लोकांकडे जात असत. हे सर्व पाहून त्यांचे मन हे दुःखाने भरून जात असे. त्या लोकांची ही दशा पाहून त्यांच्या मनात सेवेचा भाव उत्पन्न होत होता.

          मदर तेरेसा या 24 वर्षाच्या असताना 1931 मध्ये अग्निसनन बनल्या आणि त्यावेळेस त्यांनी आपले मूळ नाव बदलून मदर तेरेसा हे नाव ठेवले. त्यांनी स्वतः लिहिले आहे की - तो दहा सप्टेंबर 1940 चा दिवस होता, जेव्हा मी वार्षिक सुट्टीसाठी दार्जिलिंगला चाललेले होते. त्याच वेळेस माझ्या अंतर्मनातून एक आवाज आला की, मला सगळे काही सोडून या गरिबांची सेवा केली पाहिजे आणि सेवा करता करता शरीराला त्यागलं पाहिजे. सन 1943 मध्ये शहरांमध्ये मोठ्या संख्येने लोक मारले गेले. लोक तसेपण गरीबीमुळे बेहाल होते की, काही वर्षानंतर 1946 मध्ये हिंदू- मुस्लिम दंगलीने कोलकत्ता शहराची स्थिती अधिकच भयानक बनली होती. अशा परिस्थितीत मदर तेरेसा यांनी लोकांची खूप सेवा केली. 07 ऑक्टोबर 1950 रोजी त्यांना व्हॅटिकल मधून Missionaries of Charity ची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश भुकेलेल्या, निवस्त्र असलेल्या, बेघर लोकांसाठी, आंधळ्यांसाठी सेवा करणे हाच होता. ज्यांना समाजामध्ये काही जागा नव्हती अशा लोकांना स्थान देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी निर्मळ हृदय व निर्मळ शिशु भवन या नावाचे आश्रम उघडले. निर्मळ हृदय याचा उद्देश रोगांनी पिढीत असलेले लोक व गरिबांची सेवा करणे हा होता. तर निर्मळ शिशु भवन याची  स्थापना अनाथ आणि  बेघर असलेल्या मुलांसाठी केली होती. भारत सरकारने त्यांना 1962 मध्ये "पद्मश्री" व नंतर भारतीय सर्वोच्च नागरीक सन्मान "भारतरत्न" देऊन सन्मानित केले. मानवी कल्याणासाठी केलेल्या कार्यामुळे मदर तेरेसा यांना 1979 मध्ये नोबेल शांती सन्मानही देण्यात आला होता. परंतु नोबेल पुरस्काराची एक लाख 92 हजाराची राशी त्यांनी गरिबांसाठी फंड म्हणून वापरली.

          45 वर्षापर्यंत गरीब, आजारी, अनाथ आणि मरत असलेल्या लोकांची मदत त्यांनी केली आणि सोबत Missionaries Of Charity चा प्रचार ही केला. गरिबांसाठी त्या रस्त्यावरती बिना चपलीच्याच चालायच्या. हार्ट अटॅक आल्यामुळे 05 सप्टेंबर 1997 रोजी त्यांचे निधन झाले. मदर तेरेसांनी Missionaries Of Charity चे काम शेवटपर्यंत चालूच ठेवले होते. आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी 610 मिशन 123 देशांमध्ये नियंत्रित केलेल्या होत्या. मिशनरी ऑफ चॅरिटीची सुरुवात फक्त 13 लोकांसोबत झालेली होती परंतु त्यांच्या मृत्यूच्या वेळेस 4000 पेक्षाही जास्त बहिणी जगभर गरज असलेल्या लोकांची मदत करत होत्या. स्वतःच्या स्वागतासाठी दिलेल्या भाषणांमध्ये मदत तेरेसा यांनी स्पष्ट म्हटले आहे की-शब्दांमधून मानवसेवा होत नाही, त्यासाठी पूर्ण मन लावून काम करणे गरजेचे आहे. त्यांनी ही पण घोषणा केली होती की -कोणत्याही प्रकारच्या स्वागत समारंभामध्ये मी भाग घेणार नाही आणि सतत सेवा कार्यामध्येच व्यस्त राहील. आणि त्या म्हटल्या होत्या की-

"खूबसूरत लोग हमेशा अच्छे नही होते,
लेकिन अच्छे लोग हमेशा खूबसूरत होते है!

        म्हणजे सुंदर असणारे लोक चांगलेच असतील असं काही नाही, पण चांगले असणारे लोक मात्र नक्कीच सुंदर असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.