पी.वी. सिंधु/ P.V. Sindhu
पी.वी. सिंधूचे पूर्ण नाव पुसरला वेंकट सिंधू हे आहे. त्यांचा जन्म 5 जुलै 1995 मध्ये आंध्रप्रदेशातील हैदराबाद येथे झाला होता. त्या एक भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू आहेत. त्यांचे आई-वडील हे व्हॉलीबॉल खेळाडू होते. पी.वी. सिंधूच्या वडिलांचे नाव पी.वी. रमना हे आहे. ज्यांनी 1896 मध्ये सीयोल एशियाई खेळामध्ये कांस्यपदक जिंकलेले आहे. सिंधूची आई पी. विजया या पण एक प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर होत्या. याच कारणामुळे पी.वी. सिंधूला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच बॅडमिंटन खेळायला चालू केले होते .सिंधूला एक बहीण पण आहे, ज्यांचे नाव पी.वी. दिव्या हे आहे. पी.वी. सिंधू या दोन ओलंपिक पदक जिंकणाऱ्या एकमेव भारतीय खेळाडू आहेत.
पी.वी. सिंधुने आपले सुरुवातीचे शिक्षण हो ऑक्सिलियम हाईस्कूल मधून पूर्ण केलेले आहे. पुढचे शिक्षण त्यांनी सेंट एन्स कॉलेज फॉर वुमेन मेद्धीपट्टनम येथून एम.बी.ए. केलेले आहे.
आई-वडील व्हॉलीबॉलचे खेळाडू होते. पण पी.वी. सिंधूला मात्र बॅडमिंटन खेळायला आवडायचे. त्या पुलेला गोपीचंद यांच्या यशापासून प्रभावित झालेल्या होत्या. पुलेला गोपीचंद हे ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियन होते.
पी.वी. सिंधू यांनी बॅडमिंटनची ट्रेनिंग सिकंदराबाद मध्ये इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेली कम्युनिकेशन मध्ये मेहबूब अली यांच्या नजरेखाली चालू केली. नंतर पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. कोचिंग कॅम्प हा सिंधूच्या घरापासून 56 किलोमीटर होता. परंतु तरीही त्या दररोज वेळेवरती कोचिंग ग्राउंड वरती पोहोचत असायच्या.
पी.वी. सिंधू यांनी अखिल भारतीय रँकिंग चॅम्पियनशिप आणि सब ज्युनियर नॅशनल यासारखे ज्युनियर बॅडमिंटन किताब जिंकलेले आहेत. त्याच्यानंतर त्या आंतरराष्ट्रीय खेळाडू बनल्या. स्वतःच्या मेहनतीच्या बळावर व शानदार प्रदर्शन दाखवून त्या लवकरच आंतरराष्ट्रीय खेळाडू बनल्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळणाऱ्या चॅम्पियनशिपमध्ये अनेक पदके आपल्या नावावरती केलेली आहेत. वर्ष 2009 मध्ये सिंधू यांनी सब ज्युनियर एशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये कांस्यपदक मिळवले. एक वर्षानंतर इराण मध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज मध्ये एकल रजत जिंकले. हे सर्व पी.वी. सिंधू यांच्या मेहनतीचे व चिकाटीचे फळ होते की, वर्ष 2012 मध्ये एशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिप मध्ये त्यांनी एक वेळेस आणखी यश प्राप्त केले. ज्या मंचावरती त्यांनी एक वर्षापूर्वी कांस्यपदक जिंकले होते तेथेच त्यांनी त्यांचे पहिले सुवर्णपदकही प्राप्त केले.
पी.वी. सिंधू यांना या कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांना सर्वोच्च खेल सन्मान "राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार" व "अर्जुन अवार्ड" देऊनही सन्मानित केलेले आहे. तसेच वर्ष 2020 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणजे "पद्मभूषण" देऊनही सन्मानित केलेले आहे. त्याच्या अगोदर 2015 मध्ये "पद्मश्री" हा पुरस्कार ही त्यांना भेटलेला आहे.
पी.वी. सिंधु आपल्या देशाच्या युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. पी.वी. सिंधूने आपल्या देशाचे नाव रोशन केलेले आहे. अशी आशा आहे की, पुढे पण आपले उत्कृष्ट प्रदर्शन दाखवून सर्व पुरस्कार त्या आपल्या नावावरती करतील व देशाला सन्मान प्राप्त करून देतील.
Post a Comment