समजदार ससीण / सस्यांची आई/Samajdar Sasin /Sasyanchi Aai




          एकदा एक ससीण व तिचे पिल्ले त्यांच्या घरासमोर बसली होती. पिल्ले खेळत असल्यामुळे त्यांची आई म्हणजे ससीण त्यांच्याकडे लक्षच देत होती. त्यांच्या घरासमोर एक चिमणीही राहत होती. चिमणीची पिल्ले लहान असल्यामुळे ती तिच्या पिलांना उडवायला शिकवत होती. उडताना त्यातील एक पिल्लू खाली पडले. त्यावर सस्यांचे पिल्लू हसायला लागले व म्हणाले की- याला तर नीट चालता पण येत नाही, तो कस काय उडणार? त्यावर सस्यांची आई तिच्या पिल्लांना म्हणाली की हे बघा, जर तुम्हाला दुसऱ्यांना काही चांगले बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नका, व दुसऱ्यांची कधीच निंदा करू नका. यावर ससीणच्या पिल्ल्याने चिमणीच्या पिल्लाची माफी मागितली व त्याला उडण्यासाठी प्रोत्साहन दिले.


तात्पर्य-दुसऱ्याची कधीही निंदा करू नये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.