शिक्षक दिवस का साजरा केला जातो?/शिक्षक दिन/ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन/ Sikshak Divas ka sajara kela jato?/Sikshak Divas/ Dr. Sarvepalli Radhakrishnan


      शाळेतील शिक्षणापासून तर कॉलेजच्या शिक्षणापर्यंत आपण सगळ्यांनी बऱ्याच वेळा शिक्षक दिन साजरा केला असेल. हा एक असा दिवस आहे की ज्या दिवशी मुलांमध्ये एक वेगळाच प्रकारचा आनंद पाहायला मिळतो. जसे की आपल्या शिक्षकांना गिफ्ट द्यायचे असेल, वर्गाला सजवायचे असेल किंवा संस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणे असो इत्यादी. या दिवशी मुले-मुली स्वतः शिक्षक बनून  मुलांना शिकवतात व त्या दिवशी त्यांना एका शिक्षकाचा मानही दिला जातो.



       आपण दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षण दिवस साजरा करतो, परंतु 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा का केला जातो? याचे कारण म्हणजे आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाची आठवण म्हणून आपण दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती बरोबरच एक शिक्षकही होते. त्यांनी 40 वर्षे शिक्षक म्हणून काम केले होते.

        डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक प्रसिद्ध दार्शनीक, शिक्षाविद्वान आणि राजनीतीतज्ञ होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शिक्षणाच्या प्रती एवढी आवड होती की ते सारखे म्हणायचे शिक्षेशिवाय माणूस अपूर्णच आहे आणि तो त्याच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. तसच शिक्षकाविषयी ही त्यांचा एवढा खोलवर विचार होता की ते म्हणायचे एक चांगला शिक्षक तोच असतो, जो आपल्या शिष्याच्या डोक्यामध्ये तथ्याला जबरदस्तीने नाहीतर भविष्यात येणाऱ्या आव्हानांना तयार करत असतो.

           डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या राष्ट्राच्या प्रेमाबद्दल खूप प्रचलित होते, परंतु तरीही इंग्रज सरकारने त्यांना सर ही उपाधी देऊन सन्मानित केले होते. आपल्या देशामध्ये शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा त्यावेळेस चालू झाली होती जेव्हा सन 1962 मध्ये आपल्या देशाचे राष्ट्रपती हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे झाले होते. जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्याकडून परवानगी मागितली होती. यावरती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांना म्हटले की, परवानगी तेव्हा दिली जाईल जेव्हा तुम्ही माझा जन्मदिवस साजरा करण्याऐवजी देशातील सर्व शिक्षकांचा एक दिवस आयोजित करताल, आणि त्याच वर्षी म्हणजे 05 सप्टेंबर 1962 या रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता. त्यानंतर पूर्ण देशभर हा शिक्षक दिन आनंदाने साजरा करण्यात आला व आजही  आपण अगदी उत्साहाने हा शिक्षक दिन साजरा करतो.

       डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तमिळनाडू येथील चेन्नईच्या जवळ तिरुतनी या गावामध्ये सन 1888  मध्ये झाला होता. ते लहानपणापासून शिक्षणामध्ये खूप हुशार होते. त्यांनी फिलोसोफी मध्ये एम.ए. केले आणि 1916 मध्ये मद्रास रेजीडेन्सी कॉलेजमध्ये फिलोसोफीचे असिस्टंट प्रोफेसर बनले आणि तसेच काही वर्षानंतर प्रोफेसर ही बनले. काही भारतीय युनिव्हर्सिटी सारख्याच कोलंबो व लंडन यूनिवर्सिटीने त्यांना त्यांची माननीय उपाधी देऊन सन्मानित केले होते.

     भारतीय स्वतंत्रता नंतरही डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवरती काम केले. तसेच पॅरिसमधील युनेस्को नावाच्या संस्थानाचे कार्य समिती अध्यक्ष ही त्यांनाच बनवले गेले होते. सन 1949 ते 1952 पर्यंत डॉ. राधाकृष्णन हे रूसची राजधानी मास्को मध्ये भारताचे राजदूत या पदावरती राहिले. भारताची आणि रुसची मित्रता बनवण्यासाठी त्यांचे खूप मोठे योगदान होते. त्यांना सन 1952 मध्ये भारताचे उपराष्ट्रपती बनवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान म्हणजेच "भारतरत्न" हा देऊन सन्मानित केले गेले.

           13 मे 1962 रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले. सन 1967 पर्यंत त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम केले. त्यांनी स्वतःला जीवनभर एक शिक्षकच मानले होते. त्यांना लहानपणापासून पुस्तक वाचायला खूप आवडायचे व ते स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी खूप प्रभावित होते. त्यांचे निधन हे चेन्नईमध्ये 17 एप्रिल 1975 मध्ये झाले.

        गुरु व शिष्य यांच्यामधील संबंधाची परंपरा ही भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र वाटा आहे. असं म्हणतात की, आपले पहिले गुरु हे आपले आई-वडील असतात आणि दुसरे गुरु हे आपले शिक्षक असतात. आई वडील जे आपल्याला जन्म देतात आणि हे सुंदर जग दाखवतात तसेच शिक्षक हे जीवन जगायला शिकवतात व योग्य मार्गदर्शनाची प्रेरणा देतात.

जीवनाचा रस्ता जेथून चालू होतो, 
तो मार्ग दाखवणारा गुरुच असतो.

ज्यांच्या मनात गुरूंसाठी सन्मान असतो, 
तोच व्यक्ती खरा महान असतो. 

          जर इमारतीचा पाया पक्का असेल तर कोणीच त्या इमारतीला सहजासहजी तोडू शकत नाही त्याच प्रकारे शिक्षक पण असेच व्यक्ती असतात जे की, शिष्याच्या शिक्षणाचा पाया पक्का बनवतात व उज्वल भविष्याच्या रुपात इमारत उभी करण्यासाठी स्वतःची भूमिका बजावतात. एक चांगला शिक्षक माळी प्रमाणेच असतो. शिक्षकाच्या रूपात असलेला माळी आई-वडिलांकडून सोपवलेल्या एका छोट्याशा बिजाला एक मजबूत झाड बनवतो. त्याच्यावरती शिष्याच्या रूपात रंगबेरंगी फुलांचा सुगंध आणि सुंदरता ही पूर्ण घराला, अंगणाला व पूर्ण विश्वाला महकुन टाकते. त्याच्यामुळे शिक्षकाचा सन्मान सदैव आपल्या हृदयात विराजमान असायला पाहिजे. शिक्षा व शिक्षकाच्या संबंधित सर्वात चांगली गोष्ट ही आहे की धन, दौलत यासारख्या गोष्टी तर आपल्याकडून हिसकावून घेतल्या जाऊ शकतात परंतु प्राप्त केलेली शिक्षा ही कधीच आपल्याकडून कोणीच हिसकावून किंवा चोरून घेऊ शकत नाही. या गोष्टीचे पूर्णपणे श्रेय शिक्षकालाच जाते. शिक्षकाचा सन्मान हा एका क्षणाचा किंवा एका दिवसाचा नसतो. पण शिक्षकांना सन्मान देण्यासाठी आपल्या भारत देशामध्ये 05 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिवस साजरा केला जातो.

        सर्वात खंताची बाब ही आहे की, आज या आधुनिक युगामध्ये शिक्षक आणि शिष्याचा संबंध बिघडत चाललेला आहे. या येणाऱ्या दिवसात शिष्याचा शिक्षकाविषयी व शिक्षकाचा शिष्य विषयी दुर्व्यवहार वाढत चाललेला आहे. त्यामुळे आपण भारतातील गुरु-शिष्येच्या या परंपरेला मनात उतरून ही शपथ घेतली पाहिजे की- शिक्षा या क्षेत्रामध्ये भारताच्या निर्माणतेसाठी आपण आपले पूर्णपणे योगदान दिले पाहिजे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.