खोडकर पोपट व गुणी माकड/Khodkar popat v guni makad
रामू नावाचा एक पोपट होता. त्याने रस्त्यावरच एका मोठ्या झाडावरती त्याचे घर बांधले होते. पण तो रस्त्यावरील येणाऱ्या माणसांना खूप त्रास द्यायचा व त्यांच्याकडे असेल ते हिसकावून घ्यायचा.
एक वेळेस त्या रस्त्याने एक आजोबा चाललेले होते. त्या आजोबांजवळ छोटे छोटे पेरू होते व ते पेरू घेऊन ते बाजारात विकायला निघाले होते. हे त्या पोपटाने पाहितले. व आजोबांकडचा एक पेरू हिसकावून घेऊन तो झाडावरती जाऊन बसला. पण तो एक पेरू हिसकावत असताना बाकीचे सर्व पेरू व आजोबाही खाली पडले. हे सर्व घडत असताना एका माकडाने ते पाहितले. ते माकड आजोबांजवळ आले व त्यांना पेरू उचलण्यात मदत केली. हे पोपटाने पाहितले व माकडाला म्हणाले की, तू त्या आजोबांची मदत का केलीस ? त्यावर माकड म्हणाले - हे बघ पोपटा स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्याला त्रास देणे हे योग्य नाही. त्यामुळे तू दुसऱ्याला त्रास देणे सोडून दे. माकडाचे हे बोलणे ऐकून पोपटाला आपल्या चुकीची जाणीव झाली व त्याने त्या आजोबांची माफी मागितली आणि तेव्हापासून पोपटाने चांगले वागायला सुरुवात केली.
Post a Comment