गाई व त्यांचा मालक/Gai va Tyancha Malak
एका मालकाकडे खूप मोठ्या गाई होत्या. तो त्यांना दररोज चारा, पाणी खायला देत असायचा व त्यांचे दररोज दूध काढून बाजारात नेऊन विकत असायचा. दुधातून त्याला खूप पैसे मिळत असायचे पण पैशाच्या लालचामुळे तो कित्येक निष्पाप गायांचे जीव पण घेत असायचा.
जर एखाद्या गायीने दूध द्यायचे बंद केले, तर तो त्या गाईला विकायचा. पण गाय दूध देत नसल्यामुळे कोणीही त्यांना विकत घेत नसायचे. मग तो गायांना कसायाकडे नेऊन देत असायचा. असा तो प्रत्येक गाई सोबत करायचा. एके दिवशी एका गायने दूध देणे बंद केले. मालकाने गाईला बाजारात विकण्यासाठी चालले होते. पण गाईने त्या मालकाला जोरात आपल्या शिंगाने मारले व पळून जाऊन आपला जीव वाचवला.
तात्पर्य-काही माणसे स्वतःची गरज भागवूपर्यंत दुसऱ्यांचा उपयोग करून घेतात आणि गरज संपल्यानंतर त्यांना मारायलाही कमी करत नाहीत.
Post a Comment