श्री गणेश (गणपती बाप्पा)/श्री गणेश उत्सवाची माहिती/श्री गणेश निबंध/ Shri Ganesh (Ganpati Bappa) Chi Mahiti/ Shri Ganesh Nibandh

 


तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता,
आणि तूच विघ्नहर्ता.

रिद्धी - सिद्धीचा तूच आहेस दाता, 
दिन दुबळ्यांचा तूच आहेस विधाता. 

सर्वांचा लाडका आहेस तू, 
व सर्वांपेक्षा वेगळाच आहेस तू. 

सगळेजण पूजतात तुला भक्ती भावाने, 
प्रत्येक कर्याची सुरुवात होते बप्पा तुझ्याच नावाने.

        कोणत्याही शुभ कर्याची सुरुवात आपण ही श्री गणेशापासूनच करतो. श्री गणेश हे बुद्धीचे खूप मोठ्या स्वरूपाचे प्रतीक आहेत. त्यांच्यामध्ये अशी बुद्धी आहे की, जी सगळ्या संकटांना दूर करू शकते त्यामुळे त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. या जगात जगण्यासाठी सर्वात बुद्धिमान मार्ग हा आहे की, प्रत्येक गोष्टी सोबत एकत्र येणे म्हणजे एकत्व, आणि या युगामध्ये जगणे होय. युगामध्ये जगणे याचा अर्थ हा होतो की- सर्वात महान बुद्धी तीच आहे, ज्या बुद्धीचा वापर हा या जगात वेगळे होण्यासाठी नाहीतर एकत्र येण्यासाठी केला जातो.

          श्री गणेश चतुर्थी येण्याच्या अगोदर पासूनच आपण अगदी आतुरतेने गणपती बाप्पाची वाट पाहत असतो. नुसती लहान मुलेच नाही तर वडीलधारी माणसेही या दिवसाची खूप वाट पाहत असतात. गणपती बाप्पा आल्यानंतर सर्वजण आपो-आपली कामे सोडून गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागतात. सार्वजनिक गणपती असो वा घरात बसवलेला गणपती असो, सर्वजण अगदी दहा/अकरा दिवस बाप्पाची मन लावून पूजा करतात. आनंदाने मोदकाचा प्रसाद बनवून देवाला ठेवतात. गणपतीच्या आगमनाने आपण आपले सर्व दुःख विसरून जातो व आनंदाने बाप्पाची सेवा करतो. सुखकर्ता, दुखहर्ता वार्ता विघ्नाची.... अशी आरती म्हणून देवाला प्रणाम करतो. आपली परंपरा ही आहे की, आपण ओल्या मातीचे बाजरीच्या किंवा तांदळाच्या पिठापासून मूर्ती बनवतो व त्याची पूजा करतो. गणेशउत्सव हा आपण अगदी मनमेळावूपणे आनंदाने साजरी करतो.

           श्री गणपती बाप्पा आल्यानंतर आपले जेवण, आपली आवड असं सगळं काही बाप्पाच्याच संबंधित असते. परंतु जेव्हा दहा दिवसानंतर वेळ येते ती गणपती बाप्पाच्या जाण्याची त्यावेळेस आपण त्यांना पाण्यामध्ये विसर्जित करतो. एक आठवड्यानंतर किंवा दहा दिवसानंतर आपण गणपती बाप्पाला एका समुद्रात केव्हा नदीत विसर्जित करतो आणि गणपती बाप्पा आपल्या मधून विलुप्त होतात. बाप्पांना विसर्जित करताना आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर दुःखच असते. कारण दहा दिवस बाप्पाची एवढी सवय आपल्याला लागलेली असते की, त्यांना विसर्जित करायला नकोच वाटते. खरोखरच बाप्पाच्या येण्याने आनंद येतो पण बाप्पाच्या जाण्याने दुःख हे त्यापेक्षाही जास्तच होते. शेवटी बाप्पाला आपण विसर्जित करतो. पण पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीची मनापासून वाट पाहतो.

           सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा गणपती बाप्पाला विसर्जित करतो, त्यावेळेस आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीला तर पाण्यात टाकतो, पण त्यासोबत आपण गुलाल पाण्यात उधळतो, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ हे पाण्यात टाकून देतो. काहीजण तर मोठ-मोठे डीजे लावून गणपती बाप्पाचे विसर्जन करतात. हे सर्व करताना आपण पर्यावरणाला खराब करतो. आपण सगळ्यांनी ही गणेश चतुर्थी पर्यावरणाचा विचार करूनच साजरी केली पाहिजे. हे खूप महत्त्वाचे आहे. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे प्रतीक आहेत आणि त्यांच्या नावावरती पर्यावरणाला खराब करणे हे चुकीचे आहे. कारण आपल्या या मायभूमी पृथ्वीच्या विरोधात जाणे हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. 

          आपल्याला देवच बनवतो आणि आपण त्यांच्या अवतीभवती उत्सव साजरी करत राहतो. ते आपल्या जीवनामधील सर्वात महत्त्वाचा वाटा आहेत. त्याबरोबरच आपला आधारही आहेत. ही एकटीच अशी संस्कृती आहे-जी आज पण याबाबत जागृक आहे की, देव पण आपणच बनवले आहेत. जे सर्व लोक या विधानाला मानतात, तसेच देवाला आव्हान करतात, देवांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या सोबत राहतात व नंतर त्यांना विसर्जित करतात. या सर्वांनी हेच केले पाहिजे की - या गणेशोत्सवामध्ये पूर्णपणे भक्तीभावाने मिसळले पाहिजे. तसेच या गणेशोत्सवाला सर्वांनी मनात भक्ती ठेवून आणि उत्साहाची भावना ठेवूनच साजरी करायला हवे.

श्री गणेश उत्सवाची सुरुवात कधीपासून झाली होती?

           श्री गणेश उत्सव हा पूर्ण देशामध्ये उत्साहाने साजरा केला जातो. परंतु आपल्याला माहित आहे का? गणेश उत्सवाची सुरुवात ही कधीपासून झाली होती? तर गणेश उत्सवाची सुरुवात सर्व प्रथम ही महाराष्ट्रामध्ये  झाली होती. गणेशचतुर्थी पासून गणेश उत्सवाचा आरंभ होतो, आणि अकराव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. अशाप्रकारे गणेशोत्सव हा समाप्त होतो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षामधील चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून साजरी करण्यात येते. शिवपुरानामध्ये या गोष्टीचा उल्लेख मिळतो की-या उत्सवाला साजरी करण्याची परंपरा ही खूप शतकांपासून आलेली आहे. भारतातील दक्षिण व पश्चिम भागात हा उत्सव एका विशेषतेनेच साजरा केला जातो. भारतामध्ये जेव्हा पेशव्यांचे शासन होते त्यावेळेस पासून येथे गणेश उत्सव साजरा केला जातो. सवाई माधवराव पेशवा यांच्या शासनामध्ये पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा या राजमहालात प्रचंड असा गणेशोत्सव साजरा केला जात होता. पण जेव्हा इंग्रज सरकार भारतामध्ये आले, त्यावेळेस त्यांनी पेशव्यांचे राज्य प्राप्त केले व इंग्रजांनी त्यांचा अधिकार चालू केला आणि त्यावेळेस पासून हा सण साजरा करण्याचे कमी होऊ लागले. परंतु कोणीच या उत्सवाला थांबू शकले नाही. 

         इंग्रजांमुळे हिंदू लोकांवरती विविध प्रकारच्या पाबंदी होऊ लागल्या. इतिहासामध्ये असे सांगितले आहे की-काही शासकांच्या चुकीच्या निर्णयामुळे हिंदूमध्ये आपल्याच धर्माबद्दल एक वाईटपणा निर्माण झाला होता आणि लोकांमध्ये आपल्या धर्माबद्दल उदासीनता वाढतच गेली. त्यावेळेस महान क्रांतिकारी नेता व जनसेवक लोकमान्य टिळक यांनी विचार केला की, हिंदू धर्माला कसे संघटित करायला हवे? मग त्यांनी विचार केला की - श्री गणेश हे एक असे देव आहेत की, जे समाजातल्या सर्व स्तरांमध्ये पूजनीय आहेत. त्यांनी हिंदूंना एकत्र येण्याच्या उद्देशाने पुण्यामध्ये सन 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्याच वेळेस हे ठरवले की- भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीपासून भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्दशी पर्यंत गणेशउत्सव साजरा केला जाईल. आणि तेव्हापासून नुसते महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभर हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.