मांजर व उंदीर/ manjar va undir

 


       एका बिळात एक उंदीर राहत होता, पण त्या उंदरावरती एका मांजराचे सतत लक्ष असायचे. ती मांजर त्या बिळाच्या तोंडाशीच बसून राहायची. बिचारा उंदीर बाहेरच येऊ शकत नसायचा व तो भीतीपोटी बिळातच राहायचा. 

           एके दिवशी ती मांजर बिळाजवळ उंदराची वाट पाहत बसली होती. तेवढ्यात तिथे दुसरी मांजर आली त्या मांजरीला पाहून दोघींचे भांडणे लागली. की, मी खाणार उंदराला- एक मांजर म्हणाली. लगेच दुसरी म्हणाली- तू नाही, तर मी खाणार त्या उंदराला. दोघींचे एवढे भांडण लागले की त्यांना भानच राहिले नाही. उंदीर हे सर्व पाहत होता. उंदराला कळले यांचे आपल्याकडे लक्ष नाही. त्या संधीचा फायदा घेऊन उंदीर हळूच बिळातून पळून गेला.

तात्पर्य-दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.