मिल्खा सिंग एक आदर्श व्यक्तिमत्व/ Milkha Singh Ek Aadarsh Vyaktimatva

           

    


        जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस  घरातील मोठी माणसे मिल्खासिंग यांच्या बद्दल आम्हाला माहिती सांगत की, कसे ते ऑलम्पिक ॲथलेट मध्ये भारताला मेडल मिळून देण्यासाठी थोड्या सेकंदामुळे नाबाद झाले होते. हे ऐकून वाईट पण वाटायचे, पण प्रेरणाही  मिळायची. प्रेरणा यामुळे की त्यांनी एवढ्या मोठ्या पातळीवर देशाला फक्त प्रदर्शितच केले नाहीतर गौरव पण हे मिळून दिलेला आहे. बऱ्याच जणांना त्यांच्या जीवनामधून प्रेरणा घेण्यासारखे नक्कीच काहीतरी मिळालेले आहे.

          मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1931 रोजी पंजाबमधील गोविंदपुरा येथे झाला होता. जे की वर्तमान काळात पाकिस्तान मध्ये येते. त्यांचे खूप भाऊ-बहीण होते. त्यांच्यातील आठ हे भारताच्या विभाजन पूर्वी जगाला सोडून गेले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्या विभाजनामध्ये ते अनाथ झाले होते, कारण यादरम्यान त्यांच्या आई-वडिलांची हत्या करण्यात आली होती.  मिल्खा सिंगने हे घडताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते आणि पुढे येणारे काही वर्ष मिल्खा सिंगला याच गोष्टीचा त्रासही झाला.पंजाबमध्ये सतत चालणाऱ्या हिंसेमुळे मिल्खा सिंग १९४७ ला दिल्लीला आले आणि काही दिवस ते त्यांच्या बहिणीजवळ राहिले. यादरम्यान त्यांना बीना तिकिटाचा रेल्वेचा प्रवास केल्यामुळे तुरुंगातही जावे लागले होते. त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या बहिणीला स्वतःची काही दागिनेही विकावे लागले होते. या व्यतिरिक्त ते काही दिवस पुराना किल्ला, रिफ्यूजी कॅम्पमध्ये राहिले होते.

         मिल्खा सिंग हे जीवनाला खूप कंटाळून गेले होते. त्यामुळे त्यांनी डकैत बनण्याचाही निर्णय घेतला होता, परंतु त्यांच्या भावाने त्यांना समजून सांगितले व भावाच्या सांगण्यावरून त्यांनी इंडियन आर्मी जॉईन करण्याचा निर्णय घेतला. आपल्या चौथ्या भरतीत त्यांनी सफलतापूर्वक आर्मीची भरती काढली. सन 1951 मध्ये ते पहिल्या वेळेस सिकंदराबाद येथे धावपटू (ॲथलीटिक) मध्ये उतरले. यापूर्वी त्यांना ऑलिंपिक व ॲथलीट याबद्दल काहीच माहित नव्हते. त्यांच्या जोरदार रनिंगमुळे आर्मीने त्यांना धावपटूची ट्रेनिंग देण्यासाठी निवडले आणि तेथूनच त्यांचे "द फ्लाईंग सिंग" बनण्याचे प्रयत्न चालू झाले. त्या काळात धावपटूसाठी नव्हे तर कोणत्याच खेळासाठी सुविधा उपलब्ध नव्हत्या. परंतु मिल्खा सिंग यांनी स्वतःच्या हिमतीने खूप मेहनत केली आणि 1956 मध्ये झालेल्या मेलबॉर्न ऑलम्पिकमध्ये भारताकडून धावले. परंतु अनुभव कमी असल्यामुळे ते सुरुवातीच्या स्तरावरती ही पोहोचले नाहीत. त्यावेळी शर्यतीत त्यांनी 200 मीटर व 400 मीटर सामन्यात भाग घेतला होता. त्यावेळेस त्यांची मुलाखत ही चार्ल जेनगेस यांच्यासोबत झाली. जे की 400 मीटर शर्यतीचे विजेता होते. त्यांनी मिल्खा सिंगला फक्त प्रेरितच केले नाही तर ट्रेनिंग साठी काही टिप्स पण दिल्या आणि त्या टिप्सला त्यांनी खूप मेहनतीने करायला चालू केले. मेलबर्न ऑलिम्पिक नंतर ठीक दोन वर्षानंतर म्हणजे 1958 ला सगळीकडे मिल्खा सिंगचे नाव गाजत होते. त्यांनी 200 मीटर व 400 मीटर रेस मध्ये नॅशनल गेम ऑफ इंडियामध्ये रेकॉर्ड बनवले होते. त्यानंतर एशियन गेम मध्ये ही गोल्ड मेडल मिळवले होते.

         मिल्खा सिंग यांच्या यशाचा प्रवास पुढे चालूच राहिला व त्यांनी नंतर ब्रिटिश अंपायर आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल मिळवले या यशानंतर ते भारताचे पहिले  ऍथलेट बनले होते की, ज्यांनी कॉमनवेल्थ गेम्स मध्ये ही गोल्ड मेडल मिळवले होते त्यांचे हे रेकॉर्ड खूप महत्त्वाचे होते. त्यावेळेसचे प्राईम मिनिस्टर जवाहरलाल नेहरू यांनी मिल्खा सिंग सोबत मीटिंग केली व त्यांना म्हटले की, तुम्ही पाकिस्तानच्या फाळणीला विसरून जा, व 1960 च्या ऑलिंपिक वरती लक्ष केंद्रित करा आणि मिल्खा सिंगनेही तसेच केले. ते गोल्ड मेडल मिळवण्याच्या खूप जवळ आले होते पण मिळवण्यात ते असफल राहिले. ज्या शर्यतीत ते धावले होते त्यामध्ये टॉप चार मध्ये ते आले होते आणि त्या चारही जणांनी ऑलम्पिकचे जुने रेकॉर्ड  तोडले होते. कदाचित दुसरा कोणता दिवस असता तर मिल्खा सिंगने हे मेडल मिळवलेही असते पण हे त्यांच्या नशिबातच नव्हते. या आठवणींना पण मिल्का सिंग यांनी खूप वाईट म्हटले आहे. त्यानंतर त्यांच्या रनिंगमध्ये कसलाच कमीपणा आला नाही. व एकानंतर एक मेडल ते मिळवत राहिले. पण एका गोष्टीची खंत वाटत होती की जर एखादे ऑलम्पिक मेडल असते तर किती छान झाले असते. जरीही त्यांना या गोष्टीची कमी वाटत असेल पण आपल्याला कधीच या गोष्टीची गरज भागणार नाही. कारण मिल्खा सिंग यांनी भारतासाठी एक दोन नाही तर खूप मेडल जिंकलेले आहेत .त्यामध्ये एशियन गेम व कॉमनवेल्थ गेम मध्ये मिळणारे मेडलही  सामील आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना 1959 मध्ये पद्मश्री हा पुरस्कारही दिला गेला होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज आपण यावरूनही लावू शकतो की- जेव्हा त्यांना 2001 मध्ये भारत सरकारने अर्जुन अवॉर्ड देण्याचे बोलले होते त्यावेळेस त्यांनी या पुरस्काराला नकार दिला होता व म्हटले होते की, हा पुरस्कार तरुण खेळाडू मुलांसाठी आहे माझ्यासाठी नाही. आज त्यांचे सर्व मेडल पटियालामधील म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत.  एवढेच नाही तर रोममध्ये त्यांनी जे बूट घातले होते, ते लोकांना पाहण्यासाठी म्युझियम मध्ये ठेवण्यात आले आहेत. 

          तसंच त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर 1962 मध्ये त्यांनी निर्मल कोर यांच्यासोबत विवाह केला होता व त्यांचा एक मुलगा ही आहे त्याचं नाव जीव मिलखा सिंग हे आहे.  ते पण एक सर्वांना माहीत असलेले गोल्फर आहेत. कौर सोबत मिल्खा सिंगचे वचन कदाचित आयुष्यभराचेच होते.त्यामुळे निर्मल कोर या जगाला सोडून गेल्यानंतर काही दिवसांनीच मिल्खा सिंगही आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यांचा मृत्यू 18 जून 2021 मध्ये कोविड-19 मुळे झाला होता.भलेही आज ते आपल्यामध्ये नाहीत पण त्यांची कामगिरी व जीवन परिचय हा आपल्याला खूप प्रेरित करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.