मेरी कोम - एक आदर्श व्यक्तिमत्व/ Mary Kom - Ek Aadarsh Vyaktimatva

          



       "जेवढा कठीण संघर्ष असतो, यश तेवढेच मोठे असते" हे वाक्य ज्या व्यक्तीवरती अगदी बरोबर बसते आणि ती व्यक्ती म्हणजे एका गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेली मुलगी म्हणजे "मेरी कोम" होय. मेरी कोम यांनी आपल्या अप्रतिम कामगिरीने पूर्ण भारताचे नाव रोशन केले आहे. त्यांनी वर्ल्ड चॅम्पियन्स मध्ये सहा गोल्ड मेडल मिळवलेले आहेत आणि असे करणाऱ्या पहिल्या बॉक्सर बनल्या आहेत. तीन मुलांची आई मेरी कोम यांचा प्रवास हा खूप कठीण होता. मेरी कोम या एक गरीब घरात जन्माला आलेल्या होत्या आणि पुन्हा एक मुलगी होत्या. पण त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या व संघर्षाच्या बळावर जगाला हे दाखवून दिले की परिस्थिती ही कितीही कठीण असो, पण निश्चय हा दृढ असेल तर अशक्य असे काहीच नाही. 

      मेरी कोम यांचा जन्म 01 मर्च 1983 मध्ये मणिपूर येथील कांगथेई या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मंगते टोनपा कोम होते, जे एक गरीब शेतकरी होते व आईचे नाव अखम कॉम होते. मेरी कोम यांना एक छोटा भाऊ व बहीणही होती. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण लोकतक ख्रिश्चन मॉडेल स्कूल मधून केली आणि नववी व दहावीच्या शिक्षणासाठी इंफाळ या शहरांमध्ये गेल्या व तेथील आदिमजात या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. पण दुर्दैवाने हायस्कूलच्या परीक्षेमध्ये त्या नापास झाल्या. नापास झाल्यानंतर शाळा सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नंतर  National institute of open schooling मध्ये त्यांनी हायस्कूल आणि इंटरमीडिएट परीक्षा पास केली. मेरी कोमला लहानपणापासूनच खेळायला खूप आवडायचे. पण त्यांनी आतापर्यंत बॉक्सिंग मध्ये करिअर बनवायचा काही विचारही केला नव्हता. 

      सन 1988 मध्ये त्यांच्याच राज्यातील एका बॉक्सर मुळे त्यांना बॉक्सर या क्षेत्रांमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन भेटले आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी बॉक्सर बनायचे ठरवले. बॉक्सिंग ट्रेनिंगसाठी त्यांनी इंफाळ शहरातील एका स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये  ऍडमिशन घेतले आणि तेथे त्यांचे एम. नरजीत सिंग हे कोच बनले. परंतु मेरी कोम बाहेर राहून बॉक्सिंगची तयारी करत आहेत, हे त्यांच्या कुटुंबाला माहीत नव्हते. कारण मेरी कोम यांच्या आई-वडिलांना वाटत नव्हते की , त्यांनी बॉक्सिंग शिकावी. बॉक्सिंगमुळे खूप मारही खावा लागतो, आणि जर चेहऱ्यावर मार लागल्यामुळे चेहरा खराब झाला तर लग्नासाठी ही खूप अडचणी येतील. या कारणाने मेरी कोमने कुटुंबाला काहीच सांगितले नव्हते आणि सुरुवातीला कुटुंबाने तिला प्रोत्साहनही दिले नव्हते. परंतु काही वर्षानंतर 2000 या साली स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मेरी कॉम यांनी बॉक्सिंगचा सामना जिंकला. त्यावेळेस त्यांची बातमी T.V. वरती व वृत्तपत्रांमध्ये दाखवण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबांनी ही बातमी पाहितली व मेरी कोमचे प्रयत्न व जिद्द पाहून घरच्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्यास चालू केले.

       नंतर पुढच्या वर्षी लगेचच सन 2001 मध्ये त्यांची मेहनत जगपातळी पर्यंतही पाहायला मिळाली. जेव्हा त्यांनी AIBA women's world championships मध्ये सिल्वर पदक मिळवले. नंतर 2002 मध्ये याच चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडलही त्यांनी त्यांच्या नावी करून घेतले. आणि नंतर एशियन खेळामध्ये ही त्यांनी त्यांची ताकद दाखवली.  सन 2005 मध्ये फुटबॉल खेळाडू करुंग ओंखोलर यांच्याशी लग्न केले. लग्नानंतरही त्यांना त्यांच्या पतीने खूप साथ दिली आणि बॉक्सिंगमध्ये खूप मदतही केली. सगळ्यांच्या मदतीमुळे त्यांनी 2001, 2005, 2006, 2008, 2010, 2018 मध्ये  वेगवेगळ्या जागेवरती वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही गोल्ड मेडल मिळवून इतिहास बनवला. आणि काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 मध्ये न्यू दिल्ली येथे झालेल्या ए.आय.बी.ए . वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्येही गोल्ड पदक आपल्या नावावरती करून सहा वेळेस वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या जगातील पहिली महिला बॉक्सर बनल्या. याप्रकारे तीन मुलांची आई बनणाऱ्या मेरी कोमने हे कार्य करून इतिहास बनवला आहे. 

      मेरी कोम यांच्या या कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2009 मध्ये देशाचे सर्वोच्च खेळ सन्मान- राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. तसेच सन 2004 मध्ये त्यांच्या जीवनावरती एक चित्रपट ही प्रकाशित झालेला आहे. यासोबतच त्या प्राण्यांचे रक्षण करणारी संस्था PETA यासोबत मिळलेल्या आहेत. हे सोडता त्यांनी देशाच्या हितासाठी आणखी वेगवेगळी कामे केलेली आहेत. याप्रकारे मेरी कोमने त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे तर पूर्ण भारत देशाचे नाव रोशन केलेले आहे आणि नवीन पिढीसाठी एक आदर्श बनलेल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.