आयुष्याचे महत्त्व/आयुष्य म्हणजे काय?/Aaushyache Mahattv/Aaushy Mhanje Kay?
आपल्याला आयुष्य जगण्यासाठी अन्न ,वस्त्र ,निवारा ,आरोग्य शिक्षण या गरजा महत्त्वाच्या आहेत. हे तर सर्वांनाच माहित आहे. पण हे आयुष्य चांगलं ,यशस्वी आणि सफलतापूर्वक बनवायचं असेल तर या पलीकडेही काही गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. आणि हे जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
आयुष्य हे थोडेच असावे पण चांगले असावे. चांगले म्हणजे तरी कसे? तर आयुष्य हे आनंदमयी असायला हवे. आयुष्य जगण्याचा कंटाळा नाही आला पाहिजे. उलट कंटाळा दूर करण्यासाठी आयुष्य जगले पाहिजे. आयुष्यात टेन्शन म्हणजे -मानसिक तणावही नसला पाहिजे. एका एका सेकंदाचा आनंद घेत आयुष्याचा ही आनंद घेता आला पाहिजे. यालाच तर चांगले आयुष्य जगणे म्हणतात.
नाहीतर काही माणसे नुसतेच विनाकारण ताण-तणावाच्या आहारी जातात .उगाचच नको असलेल्या विचारांची मनात गर्दी करतात. विनाकारण छोट्याशा गोष्टीवरून कोणालाही भांडत बसतात आणि मग विचार करतात की आपलं तर आयुष्यच वाईटच आहे, त्याचं बघ किती सुंदर आहे, काहीच टेन्शन नाही, काम नाही, फक्त मज्जाच मज्जा आहे .ज्यांना आयुष्य व्यवस्थित जगता येत नाही ना, ते लोक विनाकारण आयुष्यालाच टोमणे देतात. त्यालाच बळीचा बकरा बनवतात. अगोदर स्वतःला त्याचा सदुपयोग करता येतो की, नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
आयुष्य हे सुंदर आहे. परंतु एवढं पण सुंदर नाही. त्यामध्ये खूप सार्या अडचणी पण येतात. आयुष्य जगतानाही खूप समस्या येत राहतात. समस्येला न घाबरता त्यांना सामोरे जाणे शिकायला हवे. प्रत्येक वेळी यश मिळेलच असे काही नाही, अपयशही मिळेल. पण त्या अपयशामुळे निराश न होता पुन्हा यशाच्या तयारीला लागले पाहिजे. आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत जिद्दीने प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत. सांगायचं झालं तर आयुष्य हे गुलाबासारखे सुंदर आहे. पण त्यामधले काटे हे आपली समस्या आहेत आणि जे या समस्या मधून बाहेर पडतात तेच आयुष्यात यशस्वी होतात.
आयुष्याची व्याख्या ही खूप मोठी आहे. ही दोन-चार पाने लिहून स्पष्ट करता येणार नाही. आयुष्य हे एक प्रकारचं खूप मोठं पुस्तक आहे. मग त्या पुस्तकात चांगले विचार लिहायचे का वाईट हे आपल्याच हातात असते. जन्म व मृत्यू या दरम्यानचा काळ म्हणजे आयुष्य. जन्म या शब्दात ज ला जोडून लगेच म आलेलं आहे म्हणजे जन्मानंतर मृत्यू निश्चितच आहे. पण या दरम्यानच्या आयुष्याच्या पुस्तकात काहीतरी चांगलेच करण्याचे विचार असले पाहिजेत. कोणाचे आयुष्य किती मोठं व किती छोटं याचा अंदाज आपण लावू शकत नाही. परंतु ही किती किमती व यशस्वी पूर्ण बनायचं हे आपल्याच हातात असते.
Post a Comment