रवींद्रनाथ टागोर/Rabindranath Tagore
रवींद्रनाथ टागोर हे जगप्रसिद्ध कवी, नाटककार, चित्रकार आणि देशभक्त ही होते. त्यांना गुरुदेव या नावाने ओळखले जात असायचे. त्यांना भारतीय साहित्याच्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. ते नोबेल पुरस्कार मिळवणारे आशिया खंडातील पहिलेच व्यक्ती होते. ते एकटेच असे व्यक्ती होते की यांच्या दोन मांडलेल्या रचना दोन देशांचे राष्ट्रगान बनलेले आहे. त्यांची पहिली रचना ही "जन गण मन" हे आपल्या देशाचे राष्ट्रगान बनले व दुसरी रचना " आमार शोनार बांग्ला" हे बांग्लादेशाचे राष्ट्रगान बनले.
रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 07 मे 1861 मध्ये कोलकत्ता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ टागोर व आईचे नाव शारदा देवी हे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे सेंट जेवियर शाळेमध्ये झाले. नंतर त्यांनी लंडनमधील विश्वविद्यालयामध्ये अभ्यास केला. परंतु 1880 मध्ये ते डिग्री न घेताच भारतामध्ये परतले. 1883 मध्ये त्यांचा विवाह मृणालिनी देवी यांच्या सोबत झाला. रवींद्रनाथ टागोर यांनी ड्रॉइंग, शरीर विज्ञान, भूगोल आणि इतिहास साहित्य, गणित, संस्कृत व इंग्रजी इत्यादी विषयांचा अभ्यास केला.
रवींद्रनाथ टागोरांना लहानपणापासूनच कविता लिहायला आवडायच्या. त्यांनी फक्त आठ वर्षाचेच असताना पहिली कविता लिहिली होती. तसंच सोळा वर्षाचे असताना त्यांची छोटीशी गोष्ट ही प्रकाशित झाली होती. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये निबंध, लहान कथा, यात्रावृत्त, नाटक आणि हजारो गाणेही लहिली होती. ते पद्य कवितांसाठीही ओळखले जात होते गद्य मध्येही त्यांच्या छोट्याशा गोष्टी लोकप्रिय होत्या. त्यांच्या काही प्रसिद्ध रचना जसे की गीतांजली, पूरबी परिवहन, शिशु भोलनाथ, महुआ, वन वाणी, परिशेष, गितिमल्य हे इत्यादी आहेत. टागोर यांनी जवळजवळ 2230 गाण्यांची रचना केलेली आहे. रवींद्रनाथ टागोर हे संगीत बांग्ला संस्कृतचे ही एक अंग आहेत. गुरुदेव यांनी जीवनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये चित्र बनवायला चालू केली. ज्यामध्ये त्यांनी युगाचा संशय, मोह, क्लानिती व निराशाचे स्वर प्रकट केले. टागोर व महात्मा गांधी यांच्यामध्ये राष्ट्रीयता व मानवतेसाठी सारखाच वैचारिक मतभेद होता. परंतु दोघेही एकमेकांचा खूप सन्मान करायचे. टागोर यांनीच गांधीजींना महात्मा म्हटले होते. वडिलांच्या ब्राह्मण समाजामुळे तेही ब्राह्मण समाजाचेच होते.
1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या काव्यरचनेला म्हणजे गीतांजली साठी साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. सन 1915 मध्ये राजा जॉर्ज पंचम यांनी टागोर नाईट हुड ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते .परंतु 1919 मध्ये जालनियावाला बाग हत्याकांडच्या विरोधात त्यांनी या पदवीला माघारी दिले.
07 ऑगस्ट 1941 मध्ये 80 वर्षाचे असताना त्यांचा मृत्यू झाला. रवींद्रनाथ टागोर हे खूप धार्मिक आणि अध्यात्मिक पुरुष होते. कठीण परिस्थितीमध्येही त्यांनी दुसऱ्यांची मदत केली. ते एक महान शिक्षा विद्वान होते, त्यामुळे त्यांनी शांती निकेतन या नावाने एका युनिव्हर्सिटीची स्थापना केली. आज पण जेव्हा आपण राष्ट्रगानाचे मधुर स्वर ऐकतो, त्यावेळेस गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची आठवण आपोआपच येते. भारताच्या इतिहासात रवींद्रनाथ टागोर यांना युगा-युगा पर्यंत स्मरणात ठेवले जाईल.
Post a Comment