प्रदूषण-एक हानिकारक समस्या/Pradushan Ek Hanikarak Samasya



            आज या धावपळीच्या युगात नुसती धावपळच नाही तर अनेक समस्या वाढल्या आहेत. उदा. लोकसंख्यावाढ, बेरोजगारपणा, लिंग-गुणोत्तर अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याबरोबरच प्रदूषण  ही पण एक खूप हानिकारक समस्या निर्माण झालेली आहे. दिवसेंदिवस प्रदूषण हे वाढतच चालले आहे. नेमके प्रदूषण म्हणजे तरी काय?  निसर्गातील स्वच्छ वातावरण खराब करणे. आपल्याला जगण्यासाठी स्वच्छ अन्न व पाणी न मिळणे, श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा न मिळणे, आणि शांत वातावरणाचा आस्वाद न घेता येणे ही प्रदूषणाची काही लक्षणे आहेत. प्रदूषण हे मानवासाठी किती हानिकारक आहे हे माणसाला माहीत असूनही माणूस या प्रदूषणाला थांबवण्याचा प्रयत्नही करत नाही. खरं पाहता तर या गोष्टीला माणूसच जबाबदार आहे. प्रदूषण हे एकच प्रकारचं नाही तर वायु प्रदूषण, जल प्रदूषण,  हवा प्रदूषण अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहे. 

        

            मुख्यतः वायू प्रदूषण हे गाड्यांमुळे जास्त होते. आज एका घरात चार-चार, पाच-पाच गाड्या आहेत. जर एका कुटुंबात एवढ्या गाड्या असतील तर या जगात असे किती कुटुंब आहेत. मग प्रदूषण होणं साहजिकच आहे ना. नुसत्या गाड्याच नाहीत तर कारखान्यातील निघणाऱ्या विषारी धुरामुळे श्वास घेणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. शहरांमध्ये तर ही समस्या जास्तच आढळून येते.  गाड्यांमध्ये वापरले जाणारे पेट्रोल, डिझेल अशा इंधनामुळे हवा ही दूषित होत चालली आहे. 
           

         वायु प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषणही एक मोठी समस्या आहे. आभाळातून येणार पाणी हे स्वच्छच असते. पण ते जमिनीवर पडल्यानंतर घाण होते. कारण वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची साठवण होते. जसे की तळे, नदी, विहीर, समुद्र, एखादे छोटे किंवा मोठे तळे अशा विविध ठिकाणी पाणी साठवले जाते. गावी माणसे नदीवरच धुणे धुतात, जनावरांना पण पाण्यातच धुतात, मुले पण पाण्यातच पोहतात या सर्व कारणांमुळे पाणी दूषित होते. गावागावातील नालीचे पाणी ते सुद्धा नदीतच सोडले जाते. तर मोठे-मोठ्या शहरात कारखान्या मधून येणारे घाण पाणी नदीत सोडले जाते. हे पाणी पिल्याने माणसांना अनेक प्रकारचे रोग होतात. खरोखर ही एक खंताची समस्या आहे. 

            

            ध्वनी प्रदूषणाचे सांगायचं झालं तर मोठमोठ्या लग्न समारंभात, कार्यक्रमात डीजे, स्पीकर लावून कार्यक्रमाचा आनंद घेतात. या कारणामुळे त्यांनाच नाही तर आजूबाजूंच्या लोकांनाही आवाजाचा त्रास होतो. एवढ्या मोठ्या आवाजामुळे काहींना तर बहिरेपणाही येतो. सतत एवढा मोठा आवाज ऐकल्याने मानसिक तणाव वाढतो. जर  ध्वनी प्रदूषण कमी करायचे असेल तर याचा विचार स्वतः माणसांनीच केला पाहिजे. जर मासे ऐकत नसतील तर सरकारने मोठ मोठ्या प्रकारचे दंड दिले पाहिजेत. 

            या तिन्ही प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जाऊ शकतात. निसर्गात जास्तीत जास्त झाडे लावले पाहिजेत. झाडे लावल्यामुळे हवा शुद्ध राहील तसेच खाजगी वाहनांचा वापर कमी केला पाहिजे. असे चांगले उपाय केले तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व मानवाच्या जीवनाबरोबरच पशु-पक्षी, प्राणी यांसारख्या निष्पाप जीवांचेही संरक्षण होईल. खरोखरच प्रदूषण कमी करणे खूप गरजेचे आहे. जर प्रदूषण कमी नाही झाले तर जीवन जगणे अवघड होईल त्यामुळे निसर्गाला आपला मित्र बनवणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.