चक्रवर्ती सम्राट अशोक/Chakravarti Samrat Ashok
जगातील सर्व सम्राटांपैकी चक्रवर्ती सम्राट अशोक हे एक महान सम्राट होते. त्यांना असेच सम्राट म्हटले जात नाही. त्यांची कामगिरी व बुद्धिमत्ता त्यांना सम्राट बनवते. त्यांचे साम्राज्य उत्तरमध्ये हिंदूकुश, दक्षिणेमध्ये म्हैसूर, पूर्वमध्ये बांगलादेश पासून पश्चिमेमध्ये अफगाणिस्तान, इराण मध्येही पसरलेले होते. वर्तमान मध्ये पाहिले तर त्यांचे साम्राज्य भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूटान, म्यानमार, बांगलादेश यांच्या जास्तीत जास्त भागात व्यापलेले होते. त्या काळापासून आजपर्यंतच्या भारतीय राजांच्या काळात सर्वात जास्त साम्राज्य हे सम्राट अशोकचे राहिलेले आहे, त्यामुळे मौर्य साम्राज्याचे हे तिसरे सम्राट भारताचे आजपर्यंतचे सर्वात शक्तिशाली आणि महान सम्राट राहिलेले आहेत. एवढ्या विशाल साम्राज्याला कुशलतापूर्वक सांभाळून घेणारे सम्राट अशोक त्यांच्या कार्याच्या प्रशासनासोबत बौद्ध धर्माच्या वैश्विक प्रचारासाठी ही जगभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये गौतम बुद्धाच्या नंतर सम्राट अशोक यांनाही खूप महत्त्व आहे.
सम्राट अशोक यांना त्यांच्या सुरुवातीच्या जीवनामध्ये चंड (क्रूर) अशोक अशा कुख्यात नावाने लोक ओळखायचे पण नंतर ते धर्माच्या मार्गावर चालले व नंतर लोक त्यांना देवानाप्रिय अशोक म्हणले जाऊ लागले. सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा आणि सहिष्णुता या मूल्यांचा जगभर प्रसार करणारे सम्राट अशोक यांनी क्रूरते पासून करुणापर्यंतचा प्रवास कसा केला? त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
सम्राट अशोक हे सम्राट बिंदुसार व राणी (शुभद्रांगी) धर्मा यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 304 मध्ये पाटलीपुत्र येथे झाला. अशोक सम्राट यांचा जन्म झाल्याबरोबर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून अनुमान लावला होता की, तो पुढे चालून आपल्या साम्राज्याला विस्तारित करेल. पुढे चालून त्या मुलाचे नाव अशोक ठेवण्यात आले. अशोक म्हणजेच अशोक सम्राट होय.
ऐतिहासिक माहितीनुसार राजा बिंदुसारच्या 16 उपराण्या होत्या आणि त्यांचे 101 पुत्र होते. त्यामधलेच एक अशोक होते. अशोकचा एक मोठा भाऊ होता व त्याचे नाव सुसिम हे होते. राज परंपरेनुसार जो मुलगा मोठा असतो, त्यालाच राजा बनवले जात होते. राजाचे शासन हे सुसिमला देण्यात आले. पण काही माहितीनुसार पूर्ण राज्य हे सुसिमला देण्यात आले नव्हते. तरीही सुसिम हा प्रजेवर खूप अन्याय करायचा. त्याच्या अकुशल प्रशासनामुळे विद्रोह ही झाला होता. राजदरबारामध्ये सर्वांना माहीत होते की राजपुत्र अशोक सम्राट शिवाय या विद्रोहाला कोणीच कमी करू शकत नाही. त्यामुळे विद्रोह कमी करण्यासाठी अशोकला बोलवण्यात आले. अशोक येताच कोणती समस्या उभा न राहता विद्रोह आपोआप संपला. यामुळे राजपुत्र अशोकची जनतेने खूप प्रशंसा केली व ते खूप प्रसिद्ध झाले. पण राजा सुसिमला भीती वाटू लागली, कारण जर अशोक हा पूर्ण साम्राज्य मध्ये प्रसिद्ध झाला, तर माझा राजगादीवरचा हक्क जाईल.
राजा सुसिमने राजा बिंदुसारला बोलून अशोकला आश्रमामध्ये पाठवण्यात आले. याचे पालन करून अशोक कलिंग येथे गेले. अशोक हे खूप क्रूर स्वभावाचे होते, पण बौद्धगुरू सोबत राहून रागावर नियंत्रण ठेवण्याचे शिकले होते. तिकडे सुसिमच्या हाताखाली प्रजा खूप त्रासून गेली होती. जेव्हा अशोक आश्रमामध्ये त्यांचे जीवन जगत होते, त्यावेळेस त्यांना माहिती मिळाली की त्यांच्या सावत्र भावाने त्यांच्या आईची हत्या केली आहे. ही बातमी ऐकताच अशोकचे रागावरचे नियंत्रण हटले आणि त्यांना खूप राग आला. या रागातच त्यांनी त्यांच्या 99 भावाला मारून टाकले आणि इसवी सन पूर्व 270 मध्ये राजगादीवरती बसले आणि सत्ता सांभाळायला सुरुवात केली. सत्ता सांभाळत असताना पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूस आपले साम्राज्य विस्तारायला चालू केले. केवळ आठ वर्षातच त्यांचे साम्राज्य सगळीकडेच विस्तारले गेले आणि भारताचा एकमेव चक्रवर्ती सम्राट बनले. पण सकुशल आणि वीर शासक असूनही एक असे राज्य होते की ते त्यांच्या पूर्ण राजवंशाला कलंक म्हणून होते आणि ते राज्य म्हणजे कलिंग राज्य. कलिंग एक एकमेव असे राज्य होते की मौर्य वंशाने त्याला कधीच जिंकले नव्हते. आणि हाच कलंक काढण्यासाठी सम्राट अशोक त्यांच्या सैन्यासोबत निघाले. कलिंग मध्ये एक भयानक उध्वस्त करणारे असे युद्ध झाले आणि या युद्धालाच कलिंगचे युद्ध असे म्हणले जाते. एवढ्या युद्धानंतर सम्राट अशोक हेच युद्ध जिंकले आणि त्यांच्या राजवंशाचे एकमेव असे शासक बनले की, ज्यांनी कलिंगला ही त्यांच्या ताब्यात घेतले होते. या युद्धामध्ये एक लाख शिपाई मारले गेले व दीड लाख घायाळ झाले होते. त्याचीच आकडेवारी लावण्यासाठी सम्राट अशोक हे युद्धभूमीमध्ये उतरले होते. तेवढ्यात त्यांना दूर एका जागेवर बौद्ध भिक्षू उभे असलेले दिसले. ते बौद्ध एक भिक्षू सारखेच अशोककडे सामान्य भावनेनेच पाहत होते. सम्राट अशोक त्यांच्या जवळ आले. भिक्षूने सम्राट अशोकची प्रशंसा करायला चालू केली व म्हणाले-तुम्ही तर एवढे मोठे सम्राट आहात, की सगळ्यांना आपल्या मुठीत करून घेतले आहे. खरंच तुम्ही खूप महान आहात. तुम्ही एवढे महान आहात का? या निर्दोष बाळामध्ये जीव आणू शकता का? एवढे म्हणून भिक्षू ने मृत बाळाला सम्राट अशोक समोर ठेवले. तो भिक्षू शांत होता, पण त्याचे डोळे प्रश्न विचारत होते की, या लहान बाळाची काय चुकी होती? ज्यामुळे त्याला त्याचा जीव गमावला लागला. सम्राट अशोक बरेच वेळ त्या भिक्षूच्या डोळ्यात पाहत होते. त्यांच्या मनात एक वेगळेच भांडण चाललेले होते. त्यांना समजत नव्हते की या भिक्षूला मी काय उत्तर देऊ. काही वेळानंतर सम्राट अशोकच्या डोळ्यांमधून करूनेचा अश्रू आला आणि त्या क्षणी त्यांचे मनही पूर्णपणे बदलले.
जे सम्राट अशोक रागाने राजगादीकडे आले होते, त्याच रागाच्या/क्रोधाच्या प्रशासकला त्यांनी आणखी एकदा शेवटचा निरोप दिला आणि शांतीच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला व युद्धालाही कायमचे संपून टाकले. एक भिक्षू सारखेच सम्राट अशोकने बौद्ध धर्माच्या उपदेशाला जगातल्या विविध भागात पोहोचवत आपल्या जीवनाचे शेवटचे काही वर्ष घालवली. सम्राट अशोकचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्राने पण बौद्ध धर्माचा प्रचार केला आणि जगभर अहिंसेचा संदेश दिला. साधारणत: इसवी सन पूर्व 232 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर मौर्य राजवंश पन्नास वर्षे चालू राहिले आणि शेवटी मौर्य राजवंश ही समाप्त झाले.
Post a Comment