कावळ्यांचे दुःख/ kavalyanche dukh
एक मोठे जंगल होते. त्यामध्ये खूप मोठे प्राणी, पक्षी राहत असायचे. व त्यासोबत काही कावळे पण राहायचे. पण सर्वजण प्राणी ,पक्षी कावळ्यांसोबत बोलत नसायचे, कावळे जवळ आले की त्यांना सोडून त्यांच्या जवळून लांब पळून जायचे. बिचारे कावळे नुसते एकटीच त्यांचे जीवन जगत असायचे.
एके दिवशी तेथे जंगल तोडायला काही माणसे आले. हे पाहून सर्व प्राणी घाबरून गेले व रडू लागली ,आता आपण कोठे राहणार ?काय करणार? याच्याच विचारात सगळी शांत बसली होती.
पण तेवढ्यात सर्व कावळे एकत्र आली. व काव काव करत स्वतःच्या चोचीने माणसांना मारायला लागली. कावळ्यांचे हे दृश्य पाहून माणसेही घाबरून तेथून पळून गेली. यामुळे जंगल तोडायचेही वाचले. नुसते जंगलच नाही तर सर्व प्राण्यांचे जीवही वाचले. जंगलातील सर्व प्राणी व पक्षानी कावळ्यांना मनापासून धन्यवाद म्हंटले. नुसते धन्यवाद नाही तर सर्वांनी कावळ्यांची माफी ही मागितली. कावळ्यांनी ही त्यांना सर्वांना माफ केले. व सर्वजण आनंदाने जंगलात आपले जीवन जगू लागले.
Post a Comment