लालची राणी/ lalchi Rani

        


            एक राजा होता. तो आपल्या राजमहलात त्याच्या दोन पत्नी सोबत राहत होता. तो त्यांना म्हणजे मोठ्या बायकोला मोठी राणी आणि छोटीला छोटे राणी म्हणून हाक मारायचा. 

            मोठी राणी ही दिसायला खूप सुंदर होती, केस अगदी दाटसर व गोरी होती. तर छोटी राणी दिसायला एवढी काही सुंदर नव्हती, केस पण थोडेच होते व तिचा रंग काळा होता. राजा पण मोठ्या राणीवरच प्रेम करायचा. सर्व काम छोट्या राणीलाच करायला सांगायचा. मोठी राणी व राजा गप्पा मारत बसायचे.

            एके दिवशी मोठी राणी झोपेत असल्यामुळे तिने राजाची हाक ऐकलीच नाही. तो आवाज छोट्या राणीच्या कानावर गेला व ती राजाकडे गेली -काय हवं आहे का तुम्हाला? अशी ती भीत भीत म्हणाली. तेवढ्यात मोठी राणी तिथे आली व तिच्यावर ओरडू लागली. काय सांगत आहेस माझ्याबद्दल? राजाला माझी तक्रार करत आहेस का! आणि काम सोडून काय करत आहेस इथे, जा तिकडे काम काय चालू आहे ते बघ आणि काम कर अशी तिच्यावर ओरडली. हे ऐकून छोटी राणी रडू लागली. व रडत रडत दूर एका जंगलात निघून गेली. तिथे तिला एक साधुसंत भेटले. तिने घडलेले सगळे त्यांना सांगितले. त्या साधूने तिला सांगितले जा त्या नदीमध्ये एक डुबकी मारून ये. जेव्हा राणी नदीमध्ये डुबकी घेऊन बाहेर येते त्यावेळेस ती खूपच सुंदर, गोरी झालेली असते व खूप पैसे सोने घेऊन घरी जाते. तिला पाहून मोठी राणी आश्चर्यचकित होते व म्हणते हे एवढं सोन कुठून आणलं आहेस तू? आणि एवढी माझ्यापेक्षा ही गोरी कस काय झालीस. छोट्या राणीने तिला जंगलातील सगळी गोष्ट सांगितली. त्यानंतर मोठी राणी पण साधूकडे गेली व पाण्यात डुबकी मारली. पहिल्या वेळेस सुंदर पाहून तिला वाटले की जर पहिल्या डुबकीत एवढं सुंदर होत आहे तर दुसऱ्या मध्ये किती होईल? व तिने आणखी एक डुबकी मारली. पण पाहते तर काय! तिचा रंग सगळा काळा झाला होता, केस पण अगदी थोडेच राहिले होते हे पाहून ती खूप रडू लागली आणि साधूकडे गेली. तिला साधू म्हंटले तू फक्त लालचीच नाहीतर त्यासोबत अहंकारी पण आहेस. त्याची शिक्षा तर तुला मिळणारच होती शेवटी राहिलेल आयुष्य सगळे जंगलातच काढते आणि छोटी राणी राजासोबत राजमहलात आनंदाने राहू लागते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.