स्वच्छतेचे महत्व/Swachhateche Mahattva

     

   
    
                        स्वच्छ जीवन,
                               स्वस्थ जीवन.
            
            स्वच्छ ठेवणे व स्वच्छ राहणे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जसे की अन्न, पाणी, निवारा आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ राहणे हे देखील आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. स्वच्छतेमुळे मन प्रसन्न राहते आणि जीवनही समृद्ध होते.

            स्वच्छता ही सर्व माणसांनी आपल्या दररोजच्या दिनचर्यामध्ये मिळवली पाहिजे व दररोज स्वच्छ राहिले पाहिजे. नुसते आपण स्वतः नव्हे तर आपले घर, घरासमोरचा परिसर ही स्वच्छ ठेवला पाहिजे. 

            महात्मा गांधी असे म्हणले होते की-स्वच्छता ठेवणे हीच एक सेवा आहे. आपल्या देशासाठी व जीवनासाठी स्वच्छ राहणे खूप गरजेचे आहे. जवळ असलेली घाण वातावरणालाच नाही तर आपल्या जीवनावरही परिणाम करते. आपल्याला स्वतःची आणि परिसराची सच्छता ठेवायला पाहिजे आणि दुसऱ्यालाही यासाठी प्रेरित केले पाहिजे. अगदी योग्य तो संदेश महात्मा गांधींनी आपल्याला दिलेला आहे. 

        गावोगावी, तसेच शहरांमध्ये स्वच्छतेचे महत्व तर माहीतच आहे पण आपण त्याचे पालन करत नाहीत. उदा. एखाद्या ठिकाणी लिहिलेले असते की "येथे थुंकू नये" हे पाहून न पाहिल्यासारखे करायचे व तेथेच थुंकायचे. "येथे कचरा टाकू नये" उलट तेथेच कचरा टाकायचा. म्हणजे माहीत असूनही मुद्दाम केल्यासारखे करायचे. बऱ्याच ठिकाणी ही सत्य परिस्थिती चालू आहे. याला कुठेतरी थांबवायला पाहिजे, तरच कुठेतरी स्वच्छता राहण्यास चालू होईल. 

        सर्वांनी आपोआपल्या घरात एक कचरापेटी ठेवली पाहिजे. याबरोबरच गावात जागोजागी कचरापेटीची सोय केली पाहिजे. जेणेकरून जास्त कचरा होणे टाळेल. गावातील सरपंचाने याबरोबरच शहरातील मुख्य प्रमुखाने दर महिन्याला स्वच्छतेबद्दल अभियान चालू करून लोकांना त्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. यामुळे लोकांना स्वच्छते बद्दल जागरूकता मिळेल.

        जर स्वच्छता नसेल तर कित्येक प्रकारचे आजार माणसांना होऊ शकतात. फक्त कचऱ्याबद्दलच नाही तर पाणीही स्वच्छ ठेवले पाहिजे. गावोगावी फिल्टरची सोय केली पाहिजे. तसेच आपल्या घरामध्ये सुद्धा फिल्टर लावून पाणी प्यायला पाहिजे. यामुळे स्वच्छ पाणी प्यायला मिळेल व माणूसही निरोगी राहील. 

        मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक प्रत्येक प्रकारे निरोगी राहण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. माणसाने स्वतःही स्वच्छ राहिले पाहिजे व त्याचबरोबर आपल्या परिसराची स्वच्छता ठेवायला पाहिजे. 

        ते म्हणतात ना -"जेथे स्वच्छता असते तेथेच लक्ष्मी वसते". स्वच्छता ठेवल्याने मनही प्रसन्न राहते व आजारही होत नाहीत.  स्वच्छतेबाबत असलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी समाजातील लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे यासाठी शिक्षणालाही महत्त्व दिले पाहिजे यामुळे माणूस स्वच्छतेचे महत्त्व समजू शकेल व स्वच्छता ठेवू शकेल.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.