डॉ. बाबासाहेब आंबेडकर/Dr. Babasaheb Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला होता. ते आपल्या आई वडिलांचे 14 वे आणि शेवटचे पुत्र होते. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाल हे होते. त्यांचे वडील ब्रिटिश सेना मध्ये सुभेदार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भीमराव म्हणूनही ओळखले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दोन वर्षाचे होते त्यावेळेस त्यांचे वडील सेवानिवृत्त झाले. आणि जेव्हा ते फक्त सहा वर्षाचे होते त्यावेळेस त्यांच्या आईचे म्हणजेच भिमाबाई चे निधन झाले. बाबासाहेबांचा जन्म महार (दलीत) जातीमध्ये झाला असल्याने त्यांना कोणीही बोलत नसायचे व स्पर्शही करत नसायचे. त्यामुळे त्यांना सामाजिक व आर्थिक परिस्थितीला ही सामोरे जावे लागले. जेव्हा बाबासाहेब शाळेत जात होते त्यावेळेस त्यांना दुसऱ्या विद्यार्थ्यांपासून लांब ठेवले जात असायचे. जर कधी त्यांना तहान लागली तर त्यांच्यापेक्षा उच्च जातीच्या माणसांकडून पाणी त्यांना देण्यात यायचे. कारण त्यांना पाणी ठेवलेल्या भांड्याला स्पर्श करण्याची ही परवानगी नव्हती. हे काम शाळेतले चपराशीद्वारे आंबेडकरांसाठी केले जात असे. आणि जर चपराशी अनुपस्थित असेल तर त्यांना बिना पाणी पिल्याचेच राहावे लागत असे. नंतर बाबासाहेबांनी आपल्या लेखनामध्ये याचे वर्णन "नो चपरासी, नो वॉटर" असे केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच खूप हुशार होते व महत्वकांक्षी पण होते. ते आपल्या शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत असत. त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक साह्याने परदेशात जाऊन अर्थशास्त्र विषयात एम. ए., पी.एच.डी. या पदव्या मिळवल्या व बॅरिस्टर बनले. बाबासाहेब विदेशात अर्थशास्त्रामध्ये डायरेक्ट पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. त्यांनी त्यांचा अंदाज लावला आणि सांगितले की औद्योगिकरण आणि कृषी विकास भारताच्या अर्थव्यवस्थेला वाढू शकतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, मनुस्मृति दहन, हिंदू कोड बिल अशी इतर अनेक सामाजिक कार्य केली. स्री वर्ग, शेतकरी, मजूर व दलित समाजाला त्यांनी समतेची वाट दाखवून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जाती व्यवस्थेविरुद्ध जोरदार लढा दिला.
इसवी सन 1950 मध्ये त्यांनी भारतीय बौद्ध जनसंघ स्थापन केला. त्याचे रूपांतर त्यांनी 1954 मध्ये भारतीय बौद्ध महासभेत केले. तसेच गौतम बुद्ध व त्याचा धर्म हा ग्रंथ लिहिला. पुढे त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लक्षावधी अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. नागपूर मधील हे ठिकाण दीक्षाभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हा मौल्यवान संदेश समाजाला दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांचा भारताच्या संविधानात खूप महत्त्वाचा वाटा आहे. अशा या थोर महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे म्हणजे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. हा दिवस महापरिनिर्वाणदिन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार स्थळास चैत्यभूमी म्हणतात, कारण तेथे त्यांचे स्मृती म्हणून चैत्य बांधलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातले एक महान व्यक्तिमत्व होते आणि आपल्या राष्ट्राचे खरे नायक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्याबद्दल मरणोत्तर "भारतरत्न" ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.
Post a Comment