स्वातंत्र्यवीर सावरकर/Swatantrya Veer Savarkar

 


            आपल्या मातृभूमीत हजारो वीर पुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. स्वाभिमानाचे आणि आपल्या आत्मगौरवाचे पंख आपल्या मुकुटामध्ये सजवून ही भारतभूमी आपल्या वीर सुपुत्रांमध्ये आत्मबलिदानाचे साहस भरत आहे. अशाच एका भारत मातेच्या वीर सुपुत्राबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.  आपल्या उपाधिला सत्य करून दाखवणारे, आपल्या राष्ट्रवादी विचारांनी करोडो भारतीयांमध्ये साहस भरणारे आणि इंग्रजांच्या सरकारमध्ये भीती दाखवणारे असे थोर व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होय.

            विनायक दामोदर सावरकर हे एक असे नाव आहे ,की ज्याचे खूप सारे पैलू आहेत. त्यांना वकील, चिंतक, प्रखर क्रांतिकारी, सिद्ध हस्तलेखक, कवी, तेजस्वी वक्ता, दूरदर्शी राजनेता तसेच इतिहासकार म्हणूनही ओळखले जाते. वीर विनायक सावरकर यांचा जन्म 28 मे 1823 मध्ये नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला होता. हे गाव पूर्वी ब्रिटिश सरकारकडे होते. त्यांना दोन भाऊ होते, आणि एक बहीण होती. त्यांचे मूळ नाव विनायक दामोदर सावरकर हे होते. आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव दामोदरपंत असे होते. सावरकर जेव्हा नऊ वर्षाचे होते त्यावेळेस एका भीषण आजाराने त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. आईनंतर सात वर्षांनी प्लेगच्या आजाराने वडिलांचाही मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्यांच्या मोठ्या भावाने म्हणजे बाबाराव यांनी कुटुंबाचे पालन पोषण केले. दुःख व कठीण परिस्थितीत कसे जगायचे, हे त्यांनी त्यांच्या मोठ्या बंधूकडे पाहून आत्मसात केले. त्यांच्या जीवनावर बाबारावांचा खूप प्रभाव पडतो.

            सावरकरांचे प्राथमिक शिक्षण हे नाशिकच्या शिवाजी विद्यालयमध्ये झाले. याच वयात त्यांचे लग्न यमुनाबाई यांच्यासोबत झाले. नंतर 1902 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते बी.ए करायला गेले. आणि तेथूनच सुरुवात झाली- ती कधीच न थांबणाऱ्या क्रांतिकारी प्रवासाची. ते तेथे राष्ट्रभक्तीवरती प्रखर भाषण देत असायचे. त्यांचे विचार ऐकून लोक त्यांच्याकडे आकर्षितही व्हायचे. त्यांनी 1904 ला पुण्यामध्ये अभिनव भारत नावाचे क्रांतिकारी संघटन संघटित केले. भारताचे स्वतंत्र्य हेच या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट होते. सन 1905 मध्ये बंगाल प्रांताचे विभाजन झाले. याचा विरोध करतानी त्यांनी अनेक लेख लिहिली. सन 1906 मध्ये पुढच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले.

            लंडनला इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारताचे क्रांतीपर्व चालू होते. 1909 साली जॅक्सन नावाचा एक जुलमी ब्रिटिश अधिकारी विनाकारण भारतीयांना त्रास देत होता. अशा त्रास देणाऱ्या ब्रिटिशांना त्रास देण्यासाठी अनंत कानेरी यांनी 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनची हत्या केली. जॅक्सनची हत्या झाली तेव्हा सावरकर हे लंडनला होते. जॅक्सनच्या हत्येमध्ये सावरकरांनाच ब्रिटिशांनी अटक केले. पुढील खटला हा भारतात चालावला जावा म्हणून, ब्रिटिश सावरकरांना भारतात घेऊन येत होते. भारतात येताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलीस बंदराच्या समुद्रात उडी मारली. पण त्यांचा तो प्रयत्न हा अयशस्वी ठरला. नंतर ब्रिटिश सरकारने त्यांना अटक करून भारतात आणले. व पुढचा खटला चालू केला. त्यांना जन्मठेप म्हणून काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. मातृभूमीचे स्वतंत्र मिळवण्यासाठी त्यांनी तब्बल अकरा वर्ष छळ सहन करून देखील, त्यांच्यात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द ही कायम राहिली. त्यांनी काळ्यापाण्याच्या  शिक्षेत असतानाही तुरुंगाच्या भिंतीवरती महाकाव्य लिहिली. त्यांनी तुरुंगात "काळे पाणी" असे पुस्तकाचे लेखन देखील केले. त्यांचे गीत "ने मजसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला" हे आजगायत लोकांच्या मनात अजरामर आहे. तुरुंगातील वेळ हा सावरकरांनी आपल्या सहकैद्यांना वाचन व लेखन शिकवण्यात घालवला. कारागृहात माफक ग्रंथालय स्थापन करण्यास अधिकृत मान्यता मिळवली. सावरकरांनी तुरुंगात असताना "हिंदुत्व: हिंदू कोण आहे" हे वैचारिक पुस्तक लिहिले. माझी जन्मठेप, कोश, कमला व द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस या त्यांच्या महत्त्वपूर्ण साहित्य कृती प्रसिद्ध आहेत. "जो स्तुते" आणि "सागरा प्राण तळमळला" या कवितांसाठी साठी त्यांची विशेष ओळख आहे.

        26 फेब्रुवारी 1986 मध्ये शेवटचा श्वास घेऊन त्यांनी आपल्या मातृभूमीला निरोप दिला. यांचे जीवन सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. अशा वीर सावरकरांना आपला सुपुत्र म्हणताना भारत मातेला ही गौरव वाटतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.