मैत्री एक हक्काचं घर../ Maitri Ek hakkach Ghar...

 


            मैत्री म्हणजे दुसरं काही नसून, दोन अनोळखी माणसांचं अतूट नातं होय. नातं हे रक्ताच नसतं, पण रक्तहूनही काही कमी नसतं. यालाच तर म्हणतात मैत्री. 

                "मैत्री म्हणजे एक सुंदर हृदय असतं, 

                     जे कधीच दुःखवत नसतं."

            कोणासोबतही भांडण झालं, कधी मन दुखावलं, एवढेच नव्हे तर घरातही काही झालं तर सगळं मित्राला सांगून मोकळं व्हायचं. तिथेच सगळं दुःख विसरून जायचं आणि हसत हसत पुन्हा आहे ते चालू करायचं. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण सगळं काही आपल्या मित्रालाच सांगत असतो. मित्रच असतात जे एकमेकांना सांभाळून घेतात. 

            मित्र जर सोबत असला तर आनंद सोबत असतो. त्यामुळे मैत्री खास असते. मित्र जर लांब असतील तरीसुद्धा मैत्री कमी होत नाही. याउलट बऱ्याच दिवसांनी मित्र भेटल्यानंतर सगळ्या नव्या जुन्या आठवणी आठवतात. आणि मग काय नुसत्याच गप्पा सुरू होतात. 

            छोट्या छोट्या गोष्टींवरून खरी मैत्री कधीच तुटत नसते आणि जर तुटत असेल ना तर ती खरी मैत्री नसते. नुसतच काहीतरी केलेला टाईमपास असतो. कितीही कठीण परिस्थिती असली तरी खरा मित्र कधीच नाराज होत नाही, कधीच साथ सोडत नाही. जर मित्रावर संकट आले तर त्याच्यासोबत ठामपणे उभा राहतो.

        आज माणूस आप-आपल्या कामात व्यस्त आहे, कोणी घर सांभाळण्यात व्यस्त आहे तर कोणी पैसे कमावण्यात व्यस्त आहे. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त आहे. परंतु एवढ्या व्यस्त कामातूनही वेळ काढून  मित्राबरोबर गप्पा मारण्याची मज्जा काही वेगळीच असते. खरोखर मैत्री ही अनमोलच असते. लहानपणी मैत्रीचा अर्थही माहीत नव्हता, पण तरीही एकमेकांच्या गळ्यात हात टाकून कोठेही जायचं. मित्राशी कोणी भांडलं की त्याला भांडू लागायचं. जर दोघा मित्रांचे भांडण झाली तर लगेच भांडण सुटायची कारण दोन बोट एकमेकाला जोडले की संपली कट्टी म्हणजे झाले लगेच मित्र यालाच तर म्हणतात निस्वार्थ मैत्री. आज खऱ्या अर्थाने कळत आहे मैत्री म्हणजे काय? मैत्री एक हक्काचं घर असतं, तेथे कोणतेही हट्ट चालतात व ते हट्ट पुरवले पण जातात. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.