झाडांचे, वृक्षांचे महत्त्व/झाडे लावा, झाडे जगवा/वृक्ष हेच आपले खरे मित्र/ Zadanche, Vrukshanche Mahatva/ Zade lava, Zade Jagava/ Vruksh hech Aapale khare mitra
झाडांचे, वृक्षांचे महत्त्व,
झाडे लावा, झाडे जगवा,
वृक्ष हेच आपले खरे मित्र.
झाडे लावा, झाडे जगवा. झाडे नाही लावली तर आपण जगूच शकत नाहीत, हे फक्त म्हणायलाच केलेलं आहे का? तर नाही. आपण नुसतीच चांगली चांगली बोधवाक्य लिहितो, वाचतो पण त्याचे मात्र अनुकरण करत नाहीत. मग पर्यावरण दिवस असला की मस्त गावामध्ये रॅली काढतो. नुसती गावामध्येच नाहीतर मोठमोठ्या शहरांमध्येही पर्यावरणासंबधीत कार्यक्रम आयोजित करतो. पण हे नुसतं त्या दिवसा पुरतच करतो. व बाकीचे दिवस आपणच पर्यावरणाचा ऱ्हास करत आलो आहोत. आज झाडे कमी करण्याचे कारण फक्त माणूसच आहे .
माणसाने आपल्या गरजेसाठी झाडे तोडली. आज घरामध्ये लाकडापासून बनलेली फर्निचर ठेवली आहेत. या कारणासाठी माणसाने कित्येक झाडे तोडली असतील. हे तर एक उदाहरण म्हणून झालं. पण माणसाने स्वतःच्या गरजेसाठी झाडांची संख्या कमी केली आहे. माणूस हा एक सेकंदही श्वासाशिवाय जगुच शकत नाही. यासाठी तरी झाडे लावणे गरजेचे आहे. कारण माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि ती गरज झाडे भागवतात. आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, म्हणून ऑक्सिजन पाहिजे मग झाडे का नको? हा प्रश्न माणसाने स्वतःलाच विचारायला पाहिजे.
जास्त झाडे असणे ही काही वाईट गोष्ट नाही. जास्त झाडे लावल्याने काहीही दुष्परिणाम होणार नाहीत. उलट आपल्याला शुद्ध वातावरण मिळेल. एवढेच नव्हे तर सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हायलेट रे ला सुद्धा झाडे रोखून ठेवतात. व आपल्याला सुरक्षित ठेवतात. पहा जेथे जंगल व दाट झाडी असते, तेथे वातावरण ही शुद्ध व प्रदूषण विरहित असते.
एवढे झाडाचे महत्व लक्षात घेता आपण एक तरी झाड नक्कीच लावले पाहिजे. नुसते लावलेच नाही तर त्याला भक्कम होईपर्यंत त्याची व्यवस्थित काळजीही घेतली पाहिजे. झाडे हे माणसाचे खरेच खरे मित्र आहेत. नुसते माणसाचेच नव्हे तर पशु, पक्षी, प्राणी, गुरे-ढोरे या सर्वांचेच एकदम जिवलग मित्र आहेत. कारण झाडे आपल्याला अन्न, सावली तर देतातच पण पक्षांना राहायला घर सुद्धा देतात. अगदी कसलाही स्वार्थ न ठेवता दुसऱ्याला सतत मदत करतात. झाडे हे एकाच जागेवर उभा राहतात पण सर्वांना आनंदी ठेवतात.
एवढेच नाही तर झाडांमुळे पृथ्वीवरती हिरवळही राहते. पृथ्वीवरील हिरवळ ही आकर्षणाचे मुख्य कारण आहे आणि ते आकर्षण आपल्याला झाडांमुळेच मिळते. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे असतात, तेथे राहणे अगदी आनंददायक असते. संतुलित वातावरणासाठी झाडे लावणे खूप महत्त्वाचे आहे. झाडांपासून विविध प्रकारचे औषधेही तयार होतात. जे की माणसाला आजारापासून दूर ठेवण्यास मदत करतात. झाडांमुळेच पाऊसही पडतो. झाडांमुळेच वायू प्रदूषणही कमी होते. झाडांचे विविध प्रकारचे चांगलेच फायदे आहेत. त्यामुळे झाडे न तोडता झाडे वाचवले पाहिजेत.
जसे एखाद्या महान पुरुषाबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच असते, तसेच झाडाबद्दलही आपण जेवढे फायदे सांगतोय तेवढे कमीच आहेत. खरोखरच झाडे हे मानवी जीवनाला खूपच महत्त्वाचे आहेत. वृक्षतोड करून आपण आपले जीवन धोक्यात टाकत आहोत. झाडे वाचवण्यासाठी सर्वांनी झाडांचे रक्षण केले पाहिजे. आणि सर्वांनी हाच निश्चय केला पाहिजे की-
झाडे लावू व पर्यावरणाचे रक्षण करू,
आणि समृद्ध जीवन जगू.
Post a Comment