रागीट साधू/ Ragit Sadhu
एका जंगलात एक साधू राहत होते. ते खूप हुशार होते. त्यांनी तपश्चर्या करून सर्व शक्ती प्राप्त करून घेतल्या होत्या.
एके दिवशी साधू साधनेत असताना एका चिमणीने त्यांच्या अंगावर ती घाण केली. या गोष्टीचा साधूला खूपच राग आला. कारण त्या एका चिमणी मुळे त्यांना पुन्हा अंघोळ करावी लागली होती. त्यांना राग आल्यामुळे ते त्या उडणाऱ्या चिमणीला जागेवरच मारून टाकतात. त्यांना आनंद होतो, कारण आपल्या शक्तीचा काहीतरी वापर झाला.
असंच साधू जंगलात फिरत असताना, तेथे एक माकड येऊन त्यांच्या अंगावरती उड्या मारायला लागले, साधूने त्याला समजून सांगितले की, मला त्रास देऊ नकोस, तरीही माकडाने काही ऐकलेच नाही. तो त्यांच्या अंगावरती आणखी उड्या मारू लागले. साधूने रागात येऊन त्यालाही त्यांच्या शक्तीने मारून टाकले. साधू खूप आनंदित होते की, कारण त्यांच्या शक्तीचा वापर होत होता. पण त्यांना हे माहीत नव्हते की ते त्यांच्या शक्तीच्या नादात बिचार्या प्राण्यांना मारत होते. शक्तीचा वाईट वापर करत होते. हे असेच चालू होते.
एके दिवशी देवाने हे सगळे पाहितले. देवालाही रहावले नाही व देव एका मुंगीच्या रूपात साधू जवळ आले व साधूंना त्रास देऊ लागले. साधूने रागाच्या भरात त्यांनाही मारून टाकण्याचा प्रयत्न केला, पण या वेळेस उलट झाले. देव प्रकट झाले व साधू मुंगी बनले. देवाने त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली. साधू देवाची माफी मागू लागले परंतु देव म्हटले मी तुम्हाला चांगल्या कामासाठी शक्ती दिली होती, वाईट नाही. आता तुमची शिक्षा हीच आहे की, तुमचं उर्वरित जीवन हे मुंगी बनूनच राहील.
Post a Comment