व्यसनाधीन कुटुंबाची व्यथा/ Vyasanadhin kutumbachi vyatha
तेवढ्यात बाबांचा आवाज येतो. बाबांच्या हातात खाऊ पाहून मुले पळतच जातात. पण अचानक थांबतात व मागे जाऊन आईच्या कुशीत बसतात. व आईला म्हणतात आई आज पण बाबांनी औषध (दारू)घेतलं का ग! म्हणजे आज पण मारणार तुला. (चिमुकल्या आवाजात आईला म्हणतात) आई लेकरांना कुरवळत म्हणते-नाही बाळांनो. झोपा आता, उशीर झाला आहे. शेवटी काय सांगणार मुलांना ती?
लगेचच बाबा मोठ्याने बोलायला चालू करतात. तो आवाज ऐकून मुले भिऊन आईच्या मागे जाऊन लपतात. आजूबाजूंच्या लोकांना तमाशा नको म्हणून, ती मुलांना आपल्या खुशीत घेऊन झोपी लावते. मुले तर झोपतात पण आईची झोप मात्र उडते.
त्या एकाच आईची नाही तर या जगात अशा कित्येक आई, बायको आहेत की, ज्यांच्या झोपीच नाहीतर पूर्ण आयुष्य उध्वस्त झालेले आहे. घरातील एका माणसामुळे त्याचे स्वतःचेच नाही तर पूर्ण कुटुंबाचेही नुकसान होते. ज्या मुलांना शिक्षणासाठी पैशाची गरज असते, ते पैसे व्यसनाधीन माणसाला दारू पिण्यासाठी द्यावे लागतात. जर नाही दिले तर हाणमार ही केली जाते. ही खूप दयनीय अवस्था आहे.
खरोखरच व्यसनमुक्ती ही एक काळाची गरज आहे. व्यसन हे एक शाप आहे, वरदान नाही. व्यसन जर करायचं असेल ना तर मेहनतीचं केलं पाहिजे. नंतर आजार हा यशाचाच होईल. वाईट व्यसनाने सुखाच्या नाहीतर दुःखाच्या अधीन जावे लागते. वाईट व्यसन कुठलंही असो मग ते वाईटच असतं. आणि हे माणसाला कळणे खूप गरजेचे आहे. व्यसन करणाऱ्या एका माणसामुळे त्यालाच नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबाला खूप त्रास होतो. या कारणामुळे मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होतो. व्यसनामुळे अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते या सर्व कारणामुळे प्रत्येक कुटुंबाने व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे.
Post a Comment