इमानदार कुत्रा / Imandar Kutra
दामू नावाचा एक इमानदार कुत्रा होता. तो आपल्या मालकासोबत कधीच धोकेबाजली करत नव्हता. तो घरात सर्वांचाच लाडका होता. घरातील एका माणसाप्रमाणेच कुटुंबाचा भाग होता.
दररोजच्या प्रमाणे मालक आणि दामू बागेमध्ये फिरायला गेले होते. मालक बोलण्याच्या नादात असल्यामुळे दामूकडे त्याचे लक्षच गेले नाही. थोड्यावेळाने पाहिले तर दामू त्याच्या जवळ नव्हता. तो कावराबावरा होऊन सगळीकडे पाहू लागला. शेवटी तो निराश होऊन घरी आला. या घटनामुळे घरातील सर्वजण दुखी होते. सगळे दामूचाच विचार करत बसली होती. एवढेच नाही तर टीव्ही मध्ये त्यांनी बातमी पण दिली होती.
पण दामू होता कुठे? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. दामू सुंदर आणि हुशार असल्यामुळे तो सगळ्यांनाच आवडायचा. दामूला एक माणूस त्याच्या घरी घेऊन गेला होता. त्याने दामूला खूप छान छान खायला दिले, खूप जीव लावला, प्रेमही खूप केले पण दामू हुशार होता. तो त्या माणसाला फसवून त्याच्या मालकाकडे परतला. दामूला बोलता येत नव्हते पण तो इमानदार आणि प्रामाणिक असल्यामुळे तो त्याच्याच मालकाच्या घरी परतला आणि आपल्या मालकाजवळ जाऊन उड्या मारू लागला. कारण त्याला त्याच्या खऱ्या मालकाने एवढा जीव लावला होता की दामू आपल्या मालकाला विसरूच शकत नव्हता. मुळात दामू हा इमानदारच कुत्रा होता. दामूला पाहून सर्वजण आनंदी झाले.
Post a Comment