झाशीची राणी महाराणी लक्ष्मीबाई/Jhashichi Rani Laxmibai

 




           राणी लक्ष्मीबाई 


        टोपणनाव :-    मनिकर्निका, मनू, बाईसाहेब, छबिली 

        जन्म:-    19 नोव्हेंबर 1828 काशी, भारत. 

        मृत्यू:-    17 जून 1858 ग्वालियर,मध्यप्रदेश.


"मैं मेरी झांसी नही दूंगी", अशाच जोशात ब्रिटिशांसोबत लढणारी मर्दानी म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई होय. 

                झाशीची राणी म्हणजेच राणी लक्ष्मीबाई. यांचा जन्म काशी येथे 19 नोव्हेंबर 1828 रोजी झाला होता. त्यांचे खरे नाव मनिकर्निका असे होते व त्यांना लाडाने मनुबाई असेही म्हणत. लहानपणापासूनच त्या धाडसी होत्या. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याचा पेशव्यांच्या आश्रयात राहिलेले होते. तांबे कुटुंब हे मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. त्यांच्या आईचे नाव भगीरथी बाई हे होते. पेशव्यांसोबत राहिल्यामुळे राणी लक्ष्मीबाई लहानपणापासूनच तलवारबाजी, घोडसवारी, धनुर्विद्या यात पारंगत होत्या. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांसारख्या वीरांमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या.

            इसवी सन 1842 मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला, परंतु चार महिन्यांचा असताना तो मृत्यू पावला. आपल्या मुलाबरोबरच वारस गमावलेल्या गंगाधरराव व लक्ष्मीबाई दोघांनाही या गोष्टीने मोठा धक्काच बसला होता. या दुःखातून सावरून नंतर त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेतले व त्याचे नाव दामोदर हे ठेवण्यात आले. 

            इसवी सन 1853 मध्ये गंगाधररावांचेही निधन झाले. लक्ष्मीबाईंना शोकातून बाहेर पडणे अवघडच होते. परंतु झाशीला सांभाळणे हे त्यांना तेवढेच महत्त्वाचे होते. झाशीला सुदृढ बनवायला त्यांनी सुरुवात केली, आणि एक स्वयंसेवक सेना स्थापन ही केली. त्या काळात महिलांना घराच्या बाहेर पडण्यासही बंदी होती. परंतु लक्ष्मीबाईंनी महिलांना प्रोत्साहित करून आपल्या सेना मध्ये दाखल केले आणि प्रशिक्षणही दिले.  1857 साली जवळच्याच राजाने झाशी वरती आक्रमण केले परंतु लक्ष्मीबाईने त्यांना सफलतापूर्वक मात दिली. 

            राणी लक्ष्मीबाई ला स्वतःचे मुल नसल्यामुळे इंग्रजांनी राणीला झाशी सोडून देण्याचा आदेश चालू केला. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौजीने झाशीला आपल्या ताब्यात घेतले आणि राणीला राजगादीवरून काढण्याचा आदेशही दिला. परंतु राणीचा निश्चय दृढ होता की, "मी माझी झाशी इंग्रजांना देणार नाही". राणी लक्ष्मीबाई याच निश्चयावर ठाम होत्या. जेव्हा इंग्रजांचा दूत राणीकडे किल्ला खाली करण्याचा संदेश घेऊन आला, त्यावेळेस राणी लक्ष्मीबाई गर्जना करत म्हणाल्या की " मै अपने झाशी, नही दूंगी".

            जानेवारी 1858 मध्ये इंग्रजांनी झाशी वरती हमला करण्यास सुरुवात केली. लक्ष्मीबाई व त्यांच्या सेनानी इंग्रजांना पुढे येऊन न देता मागे जाण्यास भाग पाडले. लढाई ही दोन आठवडे चालूच होती. पण इंग्रजी सेना ही सारखेच आपल्या ताकतीने पुन्हा वापस येत होती. झाशीचे सैन्य लढून लढून कंटाळले होते. शेवटी एप्रिल 1858 मध्ये इंग्रजांनी झाशीला पूर्णपणे वेढा मारला व झाशी आपल्या ताब्यात घेतली. लक्ष्मीबाई त्यांच्या काही विश्वासू साथीदारांसोबत इंग्रजांना फसवून किल्ल्यामधून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्या. नंतर राणी लक्ष्मीबाई आणि त्यांचे सैन्य कालपिला जाऊन पोहोचले व ग्वालियर किल्ला ताब्यात घेण्याची योजना बनवली. ग्वालियरचे राजा कोणत्याच लढाईच्या तयारीत नव्हते. 

            30 मे 1858 रोजी राणी लक्ष्मीबाईंनी त्यांच्या सैन्यासोबत अचानक ग्वालियरला पोहोचल्या आणि लढाई करत ग्वालियर किल्ला ताब्यात घेतला. ग्वालियर हे इंग्रजांच्या सत्तेसाठी खूप महत्त्वपूर्ण होते. ग्वालियर किल्ल्यावरती लक्ष्मीबाईंचा अधिकार असणे ही इंग्रजांची खूप मोठी हार होती. याच कारणामुळे इंग्रजांनी ग्वालियर वरती हमला केला. विजा सारख्या चमकणाऱ्या कडकडाट आवाजात राणी लक्ष्मीबाईंनीही इंग्रजांचा सामना केला. पूर्ण धैर्याने, शौर्याने आपल्या मुलाला पाठीशी बाळगत इंग्रजांशी झुंज देत होत्या. ग्वालियरच्या लढाईचा दुसरा दिवस होता, पण त्यावेळेस इंग्रजांनी राणीला चारही बाजूने घेरून टाकले होते. लक्ष्मीबाई या एका मोठ्या नाल्याजवळ येऊन पोहोचल्या. पण त्या नाल्याद्वारे येण्या-जाणचा कोणताच मार्ग नव्हता. त्यांचा घोडाही त्या नाल्याला पार करू शकत नव्हता. लक्ष्मीबाई या एकट्याच होत्या आणि बऱ्याच इंग्रजांनी त्यांच्यावरती वार करण्यास सुरुवात केली होती. राणी लक्ष्मीबाई घायाळ होऊन पडल्या, पण त्यांनी इंग्रजांना सोडले नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांसोबत लढत राहिल्या. 

            इंग्रजांनी आपल्या शरीराला स्पर्शही करू नये असे लक्ष्मीबाईंना वाटत होते. तेथे जवळच एक साधूची झोपडी होती. साधूने लक्ष्मीबाईला आपल्या झोपडीपर्यंत आणले. लक्ष्मीबाई ने साधूंना विनंती केली की, माझं शरीर इंग्रजांच्या हाती लागू देऊ नका. माझ्या शरीराला जाळून टाका, एवढेच बोलून राणीने आपले प्राण सोडले. अशाप्रकारे 18 जून 1858 रोजी ग्वालियर येथे राणी लक्ष्मीबाईंना वीर असे मरण आले. 

            राणी लक्ष्मीबाईचे जीवन आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. राणी लक्ष्मीबाई या खरंच आदर्श वीरांगणा होत्या. त्यांनी फक्त भारतातल्याच नाही तर पूर्ण जगातल्या महिलांना सन्मानाप्राप्त बनवले आहे. त्यांचे जीवन हे संघर्षमय होते. परंतु त्या संघर्षावर मात करून त्यांनी स्वतःला सक्षम बनवले. आज ही राणी लक्ष्मीबाईचे नाव आपण आदराने घेतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.