स्वामी विवेकानंद/ Swami Vivekananda

 


     आपण आज डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम, सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय यांना आदर्श मानतो. पण यांचेही सर्वांचे आदर्श दुसरे कोणीतरीच होते. आणि ते आदर्श म्हणजे स्वामी विवेकानंद होय. नरेंद्र पासून ते स्वामी विवेकानंद कसे बनले हे आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

      स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकत्ता येथे झाला. त्यांचे लहानपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त हे होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्री विश्वनाथ दत्त हे होते. ते कोलकत्ता हायकोर्टचे प्रसिद्ध वकील होते. आणि त्यांच्या आईचे नाव श्रीमती भुवनेश्वरी होते. त्या खूप धार्मिक विचारांच्या होत्या. त्यांचा जास्त वेळ भगवान शंकराच्या पूजेमध्येच जायचा. लहानपणापासूनच नरेंद्र बुद्धिमान आणि नटखट होते. त्यांच्या घरात नियमानुसार दररोज देवाची पूजा व्हायची. त्यांच्या घरातल्या धार्मिक आणि अध्यात्मिक विचारांनी त्यांच्यावर धार्मिकतेचा आणि अध्यात्मिकतेचा खूप चांगला परिणाम झाला होता. त्यांच्या मनात देवाला माहित करून घेण्याची आणि देवाला प्राप्त करण्याची इच्छा निर्माण झाली. ईश्वराबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ते कधीकधी एवढे कठीण प्रश्न त्यांच्या आई-वडिलांना व कथा वाचकांना विचारायचे की- त्यांना त्यांचे उत्तरच येत नसायचे. आई-वडिलांनी लहानपणापासून खूप लाडाने त्यांचे पालनपोषण केले. नरेंद्र पाच वर्षाचे असताना त्यांच्या शिक्षणाची तयारी त्यांनी त्यांच्याच घरी केली. नरेंद्रनेही मन लावून शिकायला चालू केले होते. शिक्षणाबरोबरच ते घरात किंवा आजूबाजूला होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत असत. हळूहळू ईश्वराला जाणून घेण्याची त्यांची इच्छा वाढू लागली. यासाठी ते ब्राह्मणांच्या पण कार्यक्रमाला जाऊ लागले, तसेच काही साधुसंतांकडेही गेले. पण त्यांच्या मनाला काही शांती भेटली नाही. काही काळानंतर नरेंद्रच्या वडिलांचे निधन झाले. घराची सर्व जबाबदारी नरेंद्र वरतीच आली होती. घराची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती. याच दरम्यान ते त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडे गेले. म्हणजेच स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य त्यांना प्राप्त झाले. त्यांची भक्ती पाहून स्वामी विवेकानंद खूप प्रभावीत झाले. आणि महाकाली यांच्या मंदिरात येणे जाणे चालू केले. स्वामी विवेकानंद रामकृष्ण यांना सतत हेच विचारायचे की देव कुठे आहे? आणि त्यांना मिळवण्यासाठी काय करावे लागेल? नंतर त्यांनी संन्यासही घेतला. त्यांचा जास्त वेळ ध्यान, तपस्या व भक्ती याच मध्ये जात असे. त्याच वेळेस त्यांना त्यांच्या अंतरमनात सर्वव्यापी देवाचेही दर्शन झाले.

      त्याकाळी आपला देश गुलामीत होता. नरेंद्रचे मन सारखेच देशाच्या हालावर व्यस्थित असायचे. ते एक भविष्यकारही होती. त्यांनी एक नव्या समाजाची कल्पना केली होती की-एक असा समाज की ज्यामध्ये धर्म, जात यामध्ये कसलाच भेदभाव होता कामा नये आणि सर्वांना समान भावाने एका देवाच्या नात्याने ओळखले जावे. नरेंद्र यांना देशाच्या युवकांकडून खूप आशा होती. ते युवकांकडे आदरपूर्वक पाहायचे. त्यांच्या जीवनामध्ये खूप अद्भुत घटना घडल्या. चमत्कार आणि दिव्य विचार यानेच त्यांचे जीवन भरलेले होते. सन 1890 मध्ये त्यांनी लांब लांब अशा यात्राही केल्या. जवळ जवळ पूर्ण देशात ते फिरले. त्यांच्या यात्रेच्या दरम्यान ते वाराणसी, अयोध्या, आग्रा, वृंदावन अशा ठिकाणी गेले.

     यामुळे त्यांच्या नावाचे परिवर्तन हे स्वामी विवेकानंद मध्ये झाले. त्यांचे चांगले व वाईट विचार ठेवण्याची पद्धत पाहून त्यांना हे नाव खेतरी च्या महाराजांनी म्हणजे  राजा अजित सिंह बहादुर यांनी त्यांना दिले होते. या यात्रेमध्ये ते महाराजाच्या महलामध्येही राहिले व गरिबांच्या झोपडीमध्येही राहिले. यामुळे त्यांना भारतातील विविध क्षेत्रांची व लोकांची ही माहिती प्राप्त झाली. त्यांना समाजात पसरलेल्या जाती, धर्म याबाबतच्या भेदभावाबद्दल माहिती मिळाली. त्यावेळेस त्यांच्या हे लक्षात आले की जर आपल्याला विकसित भारत निर्माण करायचा असेल तर, या वाईट विचारांना मुळापासून संपवावे लागेल. सन 1893 मध्ये स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या शिकागो या शहरांमध्ये पोहोचले. तेथे संपूर्ण जगातील धर्माचे संमेलन आयोजित केले गेले होते. त्या संमेलनामध्ये सर्व  धर्माच्या लोकांनी आपोआपल्या धर्माचे पुस्तक ठेवले होते. तेथे आपल्या धर्माचे वर्णन करणारे एक छोटेसे पुस्तक ठेवले होते, आणि ते पुस्तक  म्हणजे श्रीमत भगवतगीता होय. या पुस्तकाची बरेच जण मजा करत होते. पण जशी स्वामी विवेकानंद यांची  बारी आली, व त्यांनी भाषण द्यायला चालू केले.  भाषण संपल्यानंतर सर्वजण टाळ्यांच्या आवाजाचा गजर करत होते. नंतर त्यांच्याद्वारे धर्माचे केलेले वर्णन पाहून सगळेजण अभिकृत झाले. आणि भगवतगीतेचा सर्वांनी सन्मान केला. स्वामी विवेकानंद हे फक्त एक संतच नव्हते तर एक महान देशभक्त, प्रखर व्यक्ता, विचारक व लेखकही होते. त्यांचा विश्वास होता की, पवित्र भारत देश हा धर्म आणि दर्शनाची भूमी आहे. त्या देशात मोठमोठ्या ऋषीमुनिंनी जन्म घेतलेला आहे. ही भूमी संन्यास व त्यागाची पण आहे. आणि हे अधिकाळापासून मनुष्यासाठी जीवन व मुक्तीचा दरवाजा उघडा करत आहे. स्वामी विवेकानंदने सन 4 जुलै 1902 मध्ये रामकृष्ण मठामध्ये ध्यानस्थ होऊन आपले प्राण सोडले. आणि एक महामानव आकाशामध्ये विलुप्त झाले. त्यांच्या शिष्याने स्वामी विवेकानंदाच्या स्मरणार्थ तेथे एक मंदिरही बांधलेले आहे. भलेही आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचे आशीर्वाद, त्यांचे संकल्प व त्यांची प्रेरणा आजही आपल्याला खूप मोठी शिकवण देत आहेत. आणि ती शिकवण आपल्याला यशाच्या मार्गावर जाण्यासाठी सदैव लक्षात राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.