छत्रपती संभाजी महाराज/Chatrapati Sambhaji Maharaj
शिवछत्रपतींचा छावा म्हणून ओळखले जाणारे संभाजी महाराज यांचे पूर्ण नाव छत्रपती संभाजीराजे शिवाजी राजे भोसले होते. छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. ते छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई यांचे थोरले चिरंजीव होते. 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदरावर त्यांचा जन्म झाला होता. लहानपणीच ते आपल्या आईच्या प्रेमाला मुकवले. नंतर त्यांची आजी राजमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासून त्यांच्या संघर्षाची सुरुवात झाली होती. अवघ्या 13 वर्षातच 13 प्रकारच्या विविध भाषा त्यांनी शिकल्या होत्या. तलवार चालवणे ,घोड्याची सवारी करणे, दांडपट्टा चालवणे यात तर ते खूपच माहिर होते. शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही मध्येही ते खूपच चालाक होते. खरं पाहता तर जे शस्त्र चालवतात त्यांना शास्त्रामध्ये काहीच आवड नसते आणि ज्यांना शास्त्रामध्ये आवड असते त्यांना शस्त्र चालवण्यात काहीच आवड नसते. पण छत्रपती संभाजी महाराज शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही मध्येही निपुण होते. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला होता.
आत्ताच्या काळात मुलांना वाटते की, आई-वडिलांनी आपल्या सोबत रहावे, खेळावे, आणि आजच्या आई वडिलांनाही मुलांना थोडंफार लागले की काय करू आणि काय नाही असे होते. पण संभाजी महाराजांचा काळ हा वेगळाच होता. वडिलांसोबत खेळायचे मन झाले ,तर आठवायचे की आपले वडील मुघलांसोबत लढाया करत आहेत, प्रजेसाठी जीवनाचा खेळ खेळत आहेत.याच विचारांनी संभाजी महाराजांच्या जीवनाची आणि मराठ्यांच्या हक्काची लढाई लहान वयातच चालू झाली.अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी रामनगर येथे पहिले युद्ध जिंकले.
जसे एका शिष्याला गुरुची गरज असते त्याचप्रमाणे संभाजी महाराजांना कवी कलश यांची गरज असायची. जेव्हा जेव्हा ते दुःखी असत , किंवा जीवनाचा कोणताही पाठ ते कवी कलश यांच्याकडून शिकत. कवी कलश हे त्यांच्या कविता द्वारे त्यांना प्रेरित करत. संभाजी महाराज असे एकमेव राजे असतील की ज्यांनी जीवनातील कोणतीच लढाई हारली नाही. त्यांच्या याच वागण्याला औरंगजेब परेशान झाला होता. नऊ वर्ष संभाजी महाराजांनी औरंगजेबला सळो की पळो करून सोडले होते. औरंगजेबने कितीही कठीण योजना आखून युद्ध ठरवले तरीही ते जिंकणं अवघडच असायचे. कारण संभाजी महाराजांच्या रक्तात जिंकण्याची ओढ असायची, आणि ती ओढ त्यांना कधीच हरू देत नव्हती. औरंगजेबच्या लक्षात आले की संभाजी महाराजांना हरवणे एवढे काही सोपे नाही. म्हणून औरंगजेबने छळ करून संभाजी महाराजांना पकडले.
ते म्हणतात ना आपलीच माणसे आपल्याला धोका देतात. तसेच संभाजी महाराजांसोबतही झाले होते. कारण दुसऱ्यांमध्ये एवढी हिंमत नव्हती की ,ते संभाजी महाराजांना पकडू शकतील. संभाजी महाराजांचे मेहुणे म्हणजेच येसूबाईंचे भाऊ गणोजी शिर्के यांना वतन न दिल्यामुळे त्यांनी याच रागात औरंगजेब सोबत हात मिळवला. व संभाजी महाराजांना छळद्वारे फसवून त्यांना कारागृहात टाकले.
औरंगजेब महाराजांना म्हणायचा की, मी तुम्हाला सोडून देतो, पण तुम्ही आत्तापर्यंत जिंकलेले मराठी साम्राज्य, धन मला देऊन टाका. पण संभाजी महाराज देण्यास नकार द्यायचे. औरंगजेब 40 दिवस महाराजांना हाच प्रश्न विचारायचा. संभाजी महाराज त्याच जोशामध्ये नाही हेच उत्तर त्याला द्यायचे. या उत्तराला औरंगजेब कंटाळून गेला होता. शेवटी औरंगजेबने महाराजांचे एवढे हाल केले की, ते ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. महाराजांच्या डोळ्यात सळाया घातल्या, अंगावरती मारलेल्या ठिकाणी मीठ लावले, बोटे कापले, हात कापले एवढेच नाही तर शरीराचे तुकडे करून मराठ्यांना पाठवले. पण एवढं सगळं करताना महाराजांच्या तोंडातून एकही भयभीत शब्द आला नाही. शेवटपर्यंत महाराज कधीच झुकले नाहीत. उलट दुसऱ्याला आपल्यासमोर झुकायला लावले. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू 11 मार्च 1689 रोजी महाराष्ट्रातील तुळापूर येथे झाला. त्यांनी आपल्या अवघ्या 31 वर्षाच्या जीवनात खूप मोठा पराक्रम केला. त्यांचे जीवन हे थोडेच होते पण महान होते. एवढं धैर्य, शौर्य, साहस तोच व्यक्ती करू शकतो, ज्या व्यक्तीमध्ये हरण्याची नाहीतर जिंकण्याची जिद्द असते.
असे महान योद्धा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याच्या स्वप्नातच आयुष्य जगले. भलेही आज ते आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचा इतिहास, शौर्य आपल्याला प्रेरित करतो.
01. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला?
-संभाजी महाराज यांचा मृत्यू 11 मार्च 1689 रोजी महाराष्ट्रातील तुळापूर येथे झाला.
02. छत्रपती संभाजी महाराजांनी किती लढाया केल्या?
-त्यांनी केलेल्या १२७ लढायांपैकी संभाजींनी एकही लढाई गमावली नाही.
03. संभाजी महाराजांना किती भाषा येत होत्या?
-छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषा अवगत होत्या.
04. संभाजी महाराजांवर किती दिवस अत्याचार झाले?
-संभाजी महाराजांना पकडल्यानंतर 40 दिवस त्यांचा छळ करण्यात आला.
Post a Comment