अनमोल जीवन/ Anmol Jivan
अनमोल जीवन
जीवन शब्द ऐकताच,
मन कसं भरल्यासारखं वाटतं,
पण कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं.
हे माझं आहे, ते तुझ आहे करत,
भांडणा भांडणातच जीवन निघून जात,
आणि जीवनाचा आनंद घेण राहूनच जातं.
जे रुसले त्यांना हसवायला शिका,
काही गोष्टी नव्याने करायला शिका,
विनाकारण जीवनाचा आनंद घ्यायला शिका,
स्वतःलाच स्वतःशी समजवायला शिका.
दोन क्षणाच जीवन असतं,
आज असतं तर उद्या नसतं,
त्यामुळे हसत जगा आणि मोकळ्या मनाने जगा,
कारण जग इतकंही वाईट नसतं.
Post a Comment