मुंगी व फुलपाखरू/ Mungi ani Phulpakharu

 



            पावसाळ्याचे दिवस चालू होते. धो धो पाऊसही येत होता. पण त्या परिस्थितीही मुंग्या आपलं काम चालूच ठेवायच्या. फुलपाखरू मात्र झाडांवरती राहून मज्जाच करायचं, आनंद घ्यायचं, गाणी गायच. उलट मुंग्यांना काम करताना पाहताना त्यांवर हसायचं. 

            एके दिवशी सर्व मुंग्या आपल्यासाठी खाद्य गोळा करत होत्या. बिचाऱ्यांना एक गहू उचलणं अवघड होत होतं. पण तरीही त्या उचलत होत्या. हे काम करता करता एक मुंगी पाय घसरून पडली व तेथे फुलपाखरू आले. तिला मदत करण्याऐवजी तिच्यावरती हसू लागले. तिला म्हणले बघ मी किती मज्जा करतो आहे फक्त खाणं-पिण आणि झोपण. तू कशाला एवढं काम करत आहेस. हे ऐकून मुंगी म्हणाली- तू शांत बस. तू तुझी काळजी कर कारण आता उन्हाळा येणार आहे. हे सांगून मुंगी तेथून निघून गेली. फुलपाखरू मात्र हसतच होतं. 

            थोड्या दिवसांनी पाणी कमी पडले, अन्नही कमी पडू लागले. कारण उन्हाळ्याचे दिवस चालू झाले होते. फुलपाखरू मात्र रडू लागले. त्याला निवाराही राहिला नाही. आणि खायला अन्न राहिले नाही. त्याने एक दिवशी मुंग्यांना जेवण करताना पाहितले. त्याला मग आठवलं जर आपण अगोदर अन्न गोळा केले असते तर आज ही परिस्थिती आली नसती. ते फुलपाखरू मुंग्यांकडे जेवण मागण्यासाठी गेले. त्यातील जी मुंगी पाय घसरून पडली होती ती त्याच्या समोर आली आणि त्याला म्हटली-जेव्हा मी पडल्यानंतर तू हसत होतास, मज्जा करत होतास त्यावेळेस तू उन्हाळ्याचा विचार करायला हवा होता. त्यामुळे तू आता इथे रडत बसू नकोस, दुसरीकडे जा. तुला येथे आता काहीच मिळणार नाही. एवढे म्हणून मुंगी त्याच्या समोर दरवाजा बंद करते आणि तिथून निघून जाते. आता फुलपाखराकडे रडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.