विसरलेले आई-वडील/Visarlele Aai-Vadil




            आजच्या जगात माणूस नेमके अधोगती कडे चालला आहे की, प्रगतीकडे हेच कळेनासं झालेलं आहे. प्रगतीकडे म्हणावे तर-आज माणसाने शहरात एवढ्या मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या आहेत. संगणकामुळे तर माणसाचे सर्व कामे अगदी सोपे झालेली आहेत. मोबाईल मध्ये पण एवढे नवनवीन एप्लीकेशन आहेत की ,सगळं काही आपण सहजरीत्या प्राप्त करू शकतो. खरं पाहता तर माणूस एवढा हुशार झाला आहे की, त्याच्या वरच्या पायरी वरती फक्त देवच आहे, बाकी सगळेजण खालच्याच पायरी वरती आहेत. काळ बदलला, जग बदलले, त्याचबरोबर माणूसही बदलला.

            पण आपण कधी विचार केला आहे का? आज शहरात माणूस एवढ्या मोठमोठ्या इमारतीमध्ये राहत आहे. मग त्याच्यासोबत राहिला फक्त" हम दो हमारे दो". मूळ- बाळ व नवरा -बायको बस एवढेच जण. बाकी आई-वडील, सासू-सासरे यांना मात्र सगळी विसरली. क्वचित काही जणच असे असतील जे की, आपल्या आई-वडिलांना सांभाळत असतील. खरं पाहता तर, तीच खरी श्रीमंत माणसे असतात ज्यांच्या घरी आई-वडिलांचा आदर असतो. 

            जर शहरातील माणसांना कोणी विचारले आई -वडील कुठे आहेत? आहेत गावी मस्त मजेत. एवढे म्हणून मग मोकळे होतात. घरात दोन-दोन लाखांची फर्निचर ठेवायला जागा असते, पण आई-वडिलांची अडचण मात्र घरामध्ये होते. दिवसभर फोनवरती बॉसला बोलायला वेळ मात्र असतो, पण खऱ्या अर्थाने जे फोनची वाट पाहत असतात, त्यांना बोलायला वेळ नसतो. माझा मुलगा नोकरीला लागावा म्हणून, जी आई दिवसभर शेतात काम करते. राबराब राबते. वडील मजुरी करून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कमवतात. तोच मुलगा पैसे कमवायला लागल्यानंतर हे सगळे विसरतो. अस का? आपण कितीही मोठे झालो तरी, आई-वडिलांसारखी संपत्ती आपल्याला कोणीच देऊ शकत नाही.

            आपल्याला या जगात आणणारे, प्रत्येक परिस्थितीत आपल्या सोबत असणारे ते म्हणजे - आपले आई-वडील आपल्यासाठी देवच असतात. ते आपल्याला देवा द्वारे दिलेले एक वरदान आहे. आपण आपल्या जीवनाची कल्पना त्यांच्या शिवाय करूच शकत नाहीत. मुलांच्या सुखासाठी ते काही पण करायला तयार असतात. पण मुले मात्र नोकरी लागली की, लग्न करून शहरात राहिला जातात. गेल्यानंतर पुन्हा हे ही विचारत नाहीत की, तुम्ही बरे आहात का?  आई-वडिलांना विसरून शहरातच आपला संसार चालू करतात. फोनवरती मुलांचा आवाज जरी ऐकला ना, तर त्यातच ते आनंदी असतात. पण मुलांकडून तेवढे पण करणे अवघडच असते. 

        खरोखरच माणूस हा मोठा तर झाला आहे, तो पैशाने, नोकरीने, नवनवीन प्रकारांच्या कपड्यामुळे. असे माणसांना वाटते. परंतु तो मोठा नाही तर लहान झाला आहे. जो आई-वडिलांना आपली संपत्ती मानतो तोच खरा मोठा आहे. 

            झोपडीत राहून जर आई-वडील सोबत असले ना, तर ते मोठ्या बंगल्यामध्ये राहिल्यासारखेच वाटते. या जगात तोच खरा श्रीमंत आहे किंवा त्यानेच प्रगती केली आहे, ज्यांनी आई-वडिलांचा आदर केला आहे. आई-वडिलांच्या आनंदासाठी स्वतःला दुःख झाले तरी चालेल, असा जो वागतो त्या व्यक्तीला आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही. आज या जगात ज्यांच्या जवळ आई-वडील आहेत, त्यांचेच कुटुंब आनंदित व सुखाचे जीवन जगत आहे. आई-वडिलांची सेवा करणे, हे आपले कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपण आनंदात पार पाडायला हवे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.