चंद्रशेखर आझाद/ Chandra Shekhar Azad
भारत देशात होऊन गेलेल्या अनेक क्रांतिकारांपैकी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणारे एक महान क्रांतिकारी म्हणजे चंद्रशेखर आझाद होय. ते भारतीय स्वातंत्रता संग्रामाचे एक प्रमुख क्रांतिकारी होते. ते खूप लहान असल्यापासून स्वातंत्र्याच्या लढाईत आले. ते खूप निडर आणि स्वाभिमानी होते. त्यांना आपल्या भारत मातेला इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र करायचे होते आणि यासाठी त्यांनी खूप संघर्षही केले. त्यांनी त्यांचे पूर्ण जीवन आपल्या देशासाठी समर्पित केले.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्यप्रदेश मधील झाबुआ जिल्ह्यातील बाबरा या गावामध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सिताराम तिवारी आणि आईचे नाव जगरानी दवी हे होते. त्यांनी लहानपणीच खूप धनुष्यबाण चालवायला शिकले होते. याबरोबरच ते निशानबाजी मध्येही खूप चालाक होते. चंद्रशेखर आझाद खूप इमानदार, साहसी आणि बहादूर होते. त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना ही अतूट होती. ते ब्राह्मण कुटुंबांमधून येत होते. त्यांचे खरे नाव चंद्रशेखर तिवारी हे होते.
चंद्रशेखर आझाद यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्याच गावी केले. नंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी ते बनारस येथील काशी या विद्यापीठात गेले व तेथेच शिक्षण घेतले. ते संस्कृतचे महान विद्वानही होते, आणि खूप बुद्धिमान होते.
ते आपल्या देशासाठी काहीतरी करण्याच्याच प्रयत्नात होते. त्यासाठी त्यांनी भारत देशाच्या स्वतंत्रता आंदोलनामध्ये भागही घेतला. त्यांनी 15 वर्षाच्या कमी वयातच गांधीजींच्या असहयोग आंदोलनात भाग घेतला होता. त्यावेळेस त्यांना एवढ्या कमी वयातच बंदिस्त करून तुरुंगात टाकले होते. ब्रिटिशांनी त्यांना स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि घरचा पत्ता विचारला. त्यावेळेस चंद्रशेखर यांनी आपले नाव चंद्रशेखर तिवारी हे न सांगता चंद्रशेखर आझाद हे सांगितले. आपल्या वडिलांचे नाव स्वतंत्रता सांगितले, आणि घराचे नाव तुरुंग हे सांगितले होते. इंग्रजांनी त्यांना खूप मारले परंतु तरीही त्यांनी वंदे मातरमचाच नारा लावला. ते खूप कमी वयातच हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य ही बनले. त्यांनी रामप्रसाद बिस्मिल, राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांसारख्या महान क्रांतीकारांसोबत काम केले. या असोसिएशनचा मुख्य उद्देश हा होता की -आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र बनवायचे व स्वतंत्र राष्ट्र बनवायचे. त्यांना देशाला स्वातंत्र्य करण्याची जिद्द होती. ते खूप चांगले निशानबाज होते, आणि त्यांना व्यायाम, कुस्ती व पोहण्याचा खूप छंद होता. सगळ्या क्रांतीकारांनी देशाच्या स्वतंत्र्यासाठी खूप कष्ट केले, व तुरुंगवासही भोगला.
चंद्रशेखर आझाद यांचे नाव गांधीजींच्या असयोग आंदोलनात, काकोरी ट्रेन, डकैती असेम्ब्ली मध्ये बॉम्बचा विस्फोट, लाहोर मधील पोलीस अधिकारी सॉडर्स याला मारणे आणि लाला लजपतराय यांचा बदला घेण्यासाठी केलेले अफाट प्रयत्न यांसारख्या कामांमध्ये ते सामील झाले होते. त्यांनी शपथ घेतली होती की- ते आपल्या जीवनात कधीच इंग्रजांच्या हातून मरणार नाही 27 फेब्रुवारी 1931 रोजी इलाहाबाद येथे अल्फ्रेड पार्कमध्ये ब्रिटिश सेनाने त्यांना चारीही बाजूने घेतले होते. ते इंग्रजांचा निडरपणे सामना करत होते, परंतु शेवटी त्यांच्याजवळ एकच गोळी राहिली होती आणि त्यांना इंग्रजांच्या हाती जायचे नव्हते. त्यामुळे त्या राहिलेल्या गोळीने त्यांनी स्वतःलाच मारून घेतले व ते शहीद झाले. आज पण त्या अल्फ्रेड पार्कला चंद्रशेखर आझाद पार्क या नावाने ओळखले जाते. त्या पार्कमध्ये त्यांचा एक पुतळा पण बनवला आहे. चंद्रशेखर आझाद हे आपल्या नावाप्रमाणेच आझादच राहिले व आझादच शहीद झाले. भारताच्या आजादीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. ज्यांना की आज पण भारतीय लोकांद्वारे स्मरण करण्यात येते. भारत देशाच्या या महान सुपत्राचे नाव इतिहासाच्या स्वर्ण अक्षरात कायम राहील.
वंदे मातरम!
Post a Comment