एक लहानपण होतं,
त्यात फक्त आनंदच आनंद होता.
स्वप्न तर मोठ मोठी होती,
पण मन मात्र खेळायच्याच नादात होतं.
शाळेतून आल्यानंतर कंटाळा तर खूप यायचा,
पण मित्रांचा गोंगाट ऐकून पळून जायचा.
दिवस कसा गेला हे कळतच नसायचं,
मात्र संध्याकाळी आजीच्या गोष्टींची ओढ असायची.
चांदण्या मोजता मोजता झोप तर लागायची,
पण स्वप्नातील परी लगेचच उठवायची.
असं वाटतं लहानपण हे लहानपणच असतं,
प्रत्येकाच्या आयुष्यातील गोडपण असतं.
.jpeg)
Post a Comment