शिक्षणाचे महत्त्व/Shikshanache Mahattv
मानवाला शारीरिक सुंदरतेसाठी जशी स्वच्छ कपडे घालने , नीट नाटके व्यवस्थित राहणे गरजेचे आहे. त्याचप्रकारे मनातील सुंदरतेसाठी ज्ञानाची गरज असते आणि हे ज्ञान आपल्याला शिक्षणामधून प्राप्त होते. सुशिक्षित असणे ही एक काळाची गरज आहे.
पुरुषांसोबत स्त्रियांनीही शिक्षित असलेच पाहिजे कारण एक स्त्री शिकली तर पूर्ण एक कुटुंब सुशिक्षित बनते. आजच्या या आधुनिक जगात शिक्षण एवढे प्रगत झाले की जो तो तडजोड करत आहे. जर शाळेतून मुलांना अभ्यास दिला तर तो अभ्यास घेण्यासाठी कुटुंबातील स्त्रियांना शिकलेच पाहिजे. स्त्री नोकरीला असली तर ठीक आहे. परंतु ग्रामीण भागात स्त्रियांना नोकरीही करू दिली जात नाही.मग मुलांचा अभ्यास कसा काय होणार. काही ठिकाणी तर पुरुषही शिकलेली नसतात मग आपलं मूल नेमकं काय शिकत आहे हे जाणून घेण्यासाठी तरी स्त्री ,पुरुष दोघांनाही सुशिक्षित होणे खूप गरजेचे आहे.
सांगायचं म्हटलं तर -जर एकाच घरातील दोन स्त्रियांपैकी एक नोकरी करत असेल व दुसरी घरकाम करत असेल तर घरातील जास्त निर्णय नोकरी करणारी स्त्री घेते. नुसती घरातच नाहीत तर समाजातही तिला तेवढीच प्रतिष्ठा मिळते. हे तर स्त्रियांच झालं ,पुरुषांचही याबाबतीत तसेच आहे ज्याला जास्त ज्ञान असेल, जो जास्त शिकलेला असेल त्यांनाच लोक विचारतात. अडाणी, न शिकलेल्या माणसांना कोणीही किंमत देत नाही. उलट शिकलेले नसल्यामुळे कधी कधी अपमानही सहन करावा लागतो.
प्रत्येकाने आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी अधिक चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे आपला आत्मविश्वास तर वाढतोच पण त्यासोबत स्वतःचे व्यक्तिमत्व, समाजाकडून मिळवणारा मानही वाढतो. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाचे खूप महत्त्व आहे.
शिक्षणामुळे प्रत्येक गोष्टीचे योग्य ते ज्ञान मिळते .आज-काल ऑनलाइन खरेदी विक्रीमुळे फसवणूक ही होतात. परंतु जर आपल्याला लिहिता ,वाचता येत असेल तर आपण त्याबाबत योग्य ती माहिती काढून तपासू शकतो ,आणि अशा गोष्टीपासून स्वतःला व कुटुंबाला वाचू शकतो .शिक्षणामुळे कित्येक तरी फायदे होतात.
शिक्षण ही जीवनाची एक कला आहे .जी आपले जीवन सोपे व चांगले बनवते. आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हे खूप आवश्यक आहे .शिक्षण असल्यामुळे आपण कोणत्याही समस्यांना सामोरे जाऊ शकतो. शिक्षणाद्वारे ज्ञान, संपूर्ण समाज आणि जागरूकता वाटते. गरिबी कमी करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्याला चालना देण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. शिक्षणामुळे माणूस कुशल आणि सक्षम पाया तयार करू शकतो. शिक्षण हा एक आपला मूलभूत अधिकार आहे. जो सर्वांसाठीच उपलब्ध आहे व सर्वांनी आपला हक्क बजावणे गरजेचे आहे. आजच्या या युगामध्ये सर्वांनी सुशिक्षित होणे काळाची गरज बनलेली आहे.
Post a Comment