स्वप्नातील जग/ Swapnatil Jag
संध्याकाळी आठ वाजता मस्त टीव्ही चालू होता, व माझ्या आवडतीचा कार्यक्रम छोटा भीम पण चालू होता. पण अचानक लाईट गेली आणि पाऊस चालू झाला, विजांच्या कडकडाट आवाजामुळे भीती वाटू लागली. मग मी आईच्या कुशीत जाऊन झोपलो.
पाहतो तर काय पुढे दिसला तो म्हणजे चॉकलेट चा बंगला, चॉकलेटची गाडी, चॉकलेटचे कपडे, अगदी सगळं काही चॉकलेटचच. मन नुसतं उड्याच मारत होतं. मी हात लावणार की तेवढ्यात एक परी आली आणि तिने विचारलं कोण तू? मी म्हटलं मी चिंटू. का आलास इथे? काय पाहिजे तुला? असं परीने विचारले. मी म्हटलं मला हे सगळं पाहिजे जे की चॉकलेटच आहे. हो का! परी म्हणाली. मग तुला माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. ठीक आहे मी म्हटलं.
मग परी म्हंटली, जर तुला हे सगळं भेटलं तर तू काय करशील? मी उत्तर दिलं की- मी माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रासोबत या चॉकलेटच्या दुनियेत मज्जा करत राहील. बरं चल हे सगळं तुझं असं परी म्हटली. मी खूपच आनंदी झालो. मला काय करावं हेच कळेनास झालं. मी ते सगळं माझ्याकडे घेतलं. पण पुढे काय झालं हे मलाच कळलं नाही. कारण उठल्यानंतर कळलं, हे सगळं स्वप्न होतं. पण किती चांगलं झालं असतं ना, सगळंच काही चॉकलेटच असतं तर.....
Post a Comment