लता मंगेशकर यांचे जीवनचरित्र/ Lata Mangeshkar Yanche Jeevancharitrya

           


        लता मंगेशकर या भारतातील सर्वात लोकप्रिय गायिका होत्या. त्या एक गायिका तर होत्याच पण त्यासोबतच संगीत निर्देशक आणि निर्माताही होत्या. अत्यंत मधुर आवाजाची मालकीण लता मंगेशकर या स्वर साम्राज्ञी, राष्ट्राची आवाज, भारताची गायन कोकिळा, स्वर कोकिळा यासारख्या नावाने ही ओळखल्या जात होत्या. लता मंगेशकर या अशा एकमेव होत्या की ज्या जिवंत असतानाही त्यांच्या नावाचे पुरस्कार देण्यात येत होते.

         लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये इंदोर, मध्यप्रदेश येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर एक शास्त्रीय गायक होते. प्रसिद्ध गायक अशा भोसले या लता मंगेशकर यांच्या बहिण आहेत. लता मंगेशकर यांचे जीवन हे महाराष्ट्रामध्येच गेले. त्या फक्त एकच दिवस शाळेत गेल्या होत्या, परंतु त्यांना न्यूयॉर्क विश्वविद्यालय मार्फत सहा विश्वविद्यालयाने  "डॉक्टररेट" ही उपाधी दिली होती.

        लता मंगेशकर यांचे बालपण खूप जबाबदारीने भरलेले होते. त्या जेव्हा फक्त तेरा वर्षाच्या होत्या त्यावेळेस त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. घरातील मोठी मुलगी असल्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या या त्यांच्या खांद्यावरती आल्या होत्या. त्यांची लहानपणापासूनच गायक बनण्याची इच्छा होती. वडिलांच्या मृत्यूनंतर लता मंगेशकर यांना पैशासाठी खूप संघर्ष करावा लागला यामुळे अभिनयामध्ये आवड नसतानाही त्यांना हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम करावे लागले. अभिनेत्रीच्या रूपात त्यांचा पहिला चित्रपट "पहिली मंगलागौर" हा होता. घरातल्या जबाबदाऱ्यामुळे त्यांनी लग्नही केले नाही.

      लता मंगेशकर यांनी जवळजवळ 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये 30,000 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये आणि चित्रपटाव्यतिरिक्त सुद्धा गाणे गायलेले आहेत. परंतु त्यांचे चित्रपटांमधील गाण्यांमध्ये जास्त योगदान राहिलेले आहे. त्यांनी भारतीय चित्रपटांमध्ये एक पार्श्वगायिकेच्या रूपामध्ये त्यांची मजबूत अशी ओळख बनवली होती. त्यांनी 1948 व्या वर्षी गायिकी मध्ये पाऊल टाकले होते. सुरुवातीला त्यांना खूप संघर्षातून ही जावे लागले. सन 1949 मध्ये लता मंगेशकर यांनी चित्रपट "महल" यासाठी "आयेगा आनेवाला" हे गाणे गायले होते. हे गाणे खूप सफल आणि प्रसिद्ध ही राहिले होते. त्याच्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. लता मंगेशकर यांनी गाणे गात असताना कधीच चप्पल घातली नाही. त्यांनी "आनंद घन बॅनरतले" हा चित्रपट निर्माण ही केला आहे व संगीत पण दिले आहे. 

         लता मंगेशकर यांनी गायनाच्या क्षेत्रामध्ये असिमित असे नावही मिळवले आहे. त्यांचा आवाज पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. त्यांना लोक आवडीने "लतादीदी" असे म्हणतात. लता मंगेशकर यांना भारतातील जवळजवळ सगळेच मोठे पुरस्कारही मिळालेले आहेत जसे की-

  • फिल्म फेअर पुरस्कार-1958, 1962, 1965, 1969, 1993, 1994. 
  • राष्ट्रीय पुरस्कार-1972, 1975, 1990.
  • पद्मभूषण-1969. 
  • महाराष्ट्र सरकार पुरस्कार-1966, 1967  
  • जगातील सर्वात जास्त गाणे गाणारे गिनीज बुक मधील रेकॉर्ड-1974.
  • दादासाहेब फाळके पुरस्कार-1989.
  • पद्मविभूषण-1999. 
  • महाराष्ट्र भूषण-1997.
  • भारतातील सर्वोच्च पुरस्कार "भारतरत्न"-2001.

इत्यादी असे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. 

       06 फेब्रुवारी 2022 ला 92 वर्षाच्या असताना लता मंगेशकर यांनी मुंबई येथील ब्रिज कैंडी हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या गेल्याने पूर्ण देश हा दुःखात डुबला होता. यामुळे सरकारकडून दोन दिवसाचे दुःखही व्यक्त करण्यात आले होते. लता मंगेशकर या भलेही आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचा आवाज आजही आणि येणाऱ्या भविष्यातही कायम जिवंत राहील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.