योग्य निर्णय/ Yogya nirnay
एका जंगलात दोन कबूतर राहत होते. ते त्यांचे जीवन आनंदात जगत होते. कारण त्या जंगलात पिण्यासाठी भरपूर पाणी होते, आणि खाण्यासाठी वेगवेगळ्या झाडांची फळेही होती. कबुतरांचे जीवन मस्त मजेत चाललेले होते. कबूतरही त्या जंगलात खूप खुश होते.
पण त्यावर्षी जरा पाऊस कमीच पडला होता. त्या पावसामुळे पाण्याची कमतरता व अन्नाची ही गरज कबुतरांना भासायला लागली. काही दिवसांनी तर ते पूर्ण जंगलच नष्ट झाले व सर्व झाडेही सुकली.
ते दृश्य पाहून कबुतरांनी विचार केला की, आता आपल्याला हे जंगल सोडून गेल्याशिवाय काहीच पर्याय नाही. ते दुसऱ्या जंगलाच्या शोधात निघाले. जंगल शोधत असताना त्यांना दोन जंगल दिसले. त्यांना नेमके कोणत्या जंगलात जावे हेच कळेनासे झाले होते. एक जंगल खूप हिरवेगार होते, आणि त्यात अन्न व पाणीही भरपूर प्रमाणात होते. ते पाहून एक कबूतर म्हणाले की, चल आपण या जंगलात जाऊया. पण दुसरे कबूतर म्हटले की, नाही नको, यात सगळे काही आपल्याला पाहिजे तसे आहे, परंतु हे जंगल खूप मोठे असल्यामुळे आपल्याला यामध्ये मोठमोठ्या प्राण्यांची भीतीही असेल. नुसतीच प्राण्यांची नाही तर त्याबरोबर शिकारी ही आपली शिकार करतील. त्यापेक्षा आपण त्या छोट्या जंगलात जाऊन राहू, त्यात आपल्याला काहीच भीती नसेल व पाणीही तेथे भरपूर प्रमाणात आहे. आणि आपल्याला पाहिजे तेवढे अन्नही तेथे मिळेल, जर कधी गरज पडलीच तर आपण जाऊनही अन्न आणू शकतो. त्या कबुतराचा हा निर्णय ऐकून दोघेही त्या छोट्या जंगलात राहण्यासाठी गेले व तेथेच आनंदाने आपले जीवन जगू लागले.
या गोष्टीचा बोध असा होतो की-जर आपण योग्य निर्णय घेऊन पाऊल उचलले, तर तो निर्णय आपल्यासाठी फायद्याचाच ठरतो. जर योग्य निर्णय घेण्यात चुकला तर, आपण आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी गमवू शकतो.
Post a Comment