यश../ Yash.





तु कधीच हार मानू नकोस,
जरी आयुष्य तुला हरवण्याच्या प्रयत्नात असेल,
तरीही हारू नकोस.

तु अपयशी हो, 
पण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात कर, 
कारण यश तुझीच वाट पाहत आहे. 

कितीही अडचण येतील जीवनामध्ये, 
कधी कधी आपलेच माणसे अनोळखी होतील,
आणि अनोळखी आपली होतील. 
यामध्ये तु फसू नकोस, कारण यश तुझीच वाट पाहत आहे. 

लाखो जन तुला हरवण्याच्या प्रयत्नात असतील, 
पण तु जिंकण्याची तयारी ठेव, 
मनही दुखवल, अपेक्षाही संपतील,
पण एक नवीन इतिहास तयार होईल. 

मनात दृढ निश्चय ठेव, 
स्वतःवर विश्वास ठेव, 
प्रयत्नावर आशा ठेव आणि 
मनात जिंकण्याची ताकद ठेव 
कारण यश तुझीच वाट पाहत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.