सोशल मीडियाचा वापर चांगला की वाईट? Social Media cha Vapar Changala ki Vait?

 


            आजच्या युगात गुगल, युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम हे नावे तर सगळ्यांनाच माहीत आहेत. आज या जगात कोणीच असे नसेल की, ज्यांना याबद्दल काहीच माहीत नाही. कारण सध्या तर सर्वात जास्त ट्रेडिंगला हेच एप्लीकेशन आहेत. 

            खरोखरच यामुळे आपले जीवनही अगदी सोपे होऊन गेलेले आहे. असं काहीच नाही की, जे गुगल, युट्युब वरती सर्च केल्यानंतर मिळत नाही. सगळं काही अगदी सहजासहजी उपलब्ध होत आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे माणूसही अगदी नाविन्यपूर्ण झाला आहे. युट्युब वरती व्हिडिओ बनवून स्वतःचे चैनल तयार करून आपण घरबसल्या पैसेही कमवू शकतो. तसेच ऑनलाईन व्यवसायातही या गोष्टींचा खूप वापर होत आहे. यामुळे व्यवसाय करायलाही सोपे झालेले आहे. इंस्टाग्राम वरती आपण नवनवीन मित्र बनू शकतो. मित्र बनल्यामुळे आपण जुन्या मित्रांच्याही संपर्कात राहू शकतो. एवढेच नव्हे तर गृहिणींना पण याचा खूप फायदा होत आहे. एखादी भाजी किंवा नवीन पदार्थ बनवायचा असेल तर, लगेचच युट्युब त्याची रेसिपी सांगून आपल्याला मदत करते. विद्यार्थीही ऍडव्हान्स नॉलेजसाठी या सोशल मीडियाचा वापर करत आहेत. असे विविध प्रकारचे चांगले फायदे आपल्याला या प्लॅटफॉर्म द्वारे मिळत आहेत.

            पण याचे चांगले फायदे जेवढी आहेत त्याबरोबरच तोटेही तेवढीच आहेत. जे याचा चांगला वापर करतात, त्यांच्यासाठी चांगलेही आहे. आणि जे वाईट वापर करतात त्यांच्यासाठी वाईट पण आहे. ते आपल्यावर अवलंबून असते की ,आपण त्याचा कसा वापर  करत आहोत.

            सोशल मीडियाचे वाईट परिणाम सांगायचे झाले तर, त्यामध्ये जास्त तरुण पिढीचाच समावेश आहे. मुले दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे कसलेही व्हिडिओ बनवून अपलोड करतात. ज्या मुलांना अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे ,ते या कामात व्यस्त झालेली आहेत. या कारणामुळे दिवसेंदिवस मुलांचे लक्ष इंटरनेटच्या दुनियेकडे खेचत चाललेले आहे. मोबाईल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम डाउनलोड करून घेतात व दिवसभर गेम खेळत बसतात. या गोष्टीची एवढी घाण सवय लागली आहे की ,याच कारणामुळे मुलांचा मानसिक तणावही वाढत चाललेला आहे. लहान वयातच मुलांना डोकेदुखी ,चष्मे लागण्याची कारण फक्त हेच आहे. अगदी चौथ्या व पाचव्या महिन्याचे मूल रडू लागले की ,त्याला शांत बसवण्यासाठी  मोबाईलचाच वापर केला जातो. लहान मुलांचे आई- वडील मूल शांत बसावे म्हणून, मोबाईल वरती काहीतरी मनोरंजक गोष्टी लावून देतात व त्याला त्याच्यात पाहायला लावतात. हीच सवय लहान मुलांना खूप महागातही पडते. या गोष्टीमुळे लहान वयातच मुलांचे डोळे खराब होतात. 

            ऑनलाइन कामामुळे कितीही फ्रॉड होत आहेत. अशा अनेक वाईट गोष्टी  माणूस इंटरनेटच्या माध्यमातून करत आहे. सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे व सोशल मीडियाचा वापर वाईट न करता चांगला केला पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीचा वापर करणे हे त्याच्या वापरकर्त्यावर अवलंबून असते. जर माणसाने सोशल मीडियाचा वापर चांगला केला तर त्याचे परिणाम ही चांगलेच होतील.

            सोशल मीडियामुळे आपण जगातील कोणतीही माहिती अगदी सहजरीत्या प्राप्त करू शकतो. आणि आपले ज्ञान अवगत करू शकतो. यामुळे सोशल मीडियाचा वापर वाईट न करता चांगलाच करायला हवा. जर योग्य प्रकारे आपण सोशल मीडियाचा वापर केला तर ते आपल्यासाठी एक वरदानच आहे.


        "सोशल मीडिया एक ज्ञानाचे भंडार आहे, 

        व चांगल्या वापरकर्त्यांसाठी एक वरदान आहे".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.