शांत मन../Shant Man..
एक छोटेसे गाव होते. गाव छोटे असल्यामुळे त्या गावात माणसेही मोजकीच होती. त्या गावात एक राजू नावाचा माणूस राहत होता. तो सर्व माणसांपासून जरा वेगळाच होता .वेगळा म्हणजे भांडखोर होता .गावांमध्ये एखादी गोष्ट घडली की तो कायमच आघाडीवर असायचा .सर्व माणसांवर स्वतःचे नियम लागू करायचा .जरी चुकी त्याची असली तरी तो ,दुसऱ्यांना चुकीचा ठरवायचा .या त्याच्या वागण्याला माणसे कंटाळून गेली होती.
त्याच गावात एक साधू राहत होते. त्यांना पण राजूच्या या वागण्याबद्दल कल्पना होती. एके दिवशी साधू सर्व गावातील लोकांना एका ठिकाणी जमा होण्यास सांगतात. ठरल्याप्रमाणे सर्व गावातील लोक एका ठिकाणी जमा होतात. त्या लोकांना साधू सांगतात की-सर्व लोकांनी आज एक संकल्प करायचा. व तो केलेला संकल्प एका महिन्यात पूर्ण करायचा. यावरती राजू साधू कडे जातो व म्हणतो की-मी सगळ्यांपेक्षा वेगळाच आहे त्यामुळे मला तुम्हीच संकल्प सांगा. व तो मी पूर्ण करेल. त्याचा स्वभाव माहित असल्यामुळे साधूने त्याला सांगितले की-तू फक्त एक महिना शांत राहून दाखव .यावरती राजू म्हणतो की -ठीक आहे.
त्यादिवशी पासून राजूने शांत बसायला चालू केलेले होते. एक दोन दिवस तो शांत बसला. पण नंतर त्याला ते कठीण वाटू लागले .चौथ्या ,पाचव्या दिवशी तो कसे बसे शांत बसला ,परंतु सतत मनात विचार चालूच राहायचे. पुन्हा तो साधूंकडे गेला व बोलायचे नसल्यामुळे त्याने लिहून दाखवले की, मला शांत बसवतच नाही आणि कसेबसे बसलो तरी सतत मनात विचार चालू राहतात. त्यावर साधू त्याला म्हणतात की- हे बघ संकल्प हा कधीच मोडायचा नसतो .एकदा ठरवले की तो संकल्प पूर्ण होईपर्यंत थांबायचे नसते. आणि जे व्यक्ती संकल्प पूर्ण करतात तेच आयुष्यात यशस्वी होतात.
साधूंचे हे शब्द ऐकून तो पुन्हा वापस येतो. आणि लांब जंगलात निघून जातो.काही दिवसांनी लोक राजूची वाट पाहायला लागतात कारण महिना पूर्ण होत आला होता. आणि तरीही राजू वापस आला नव्हता. काहीजण तर म्हणायला लागले की- त्याला जंगलात मोठ्या प्राण्यांनी खाऊन टाकले असेल .हीच चर्चा सगळीकडे चालू होती.
राजू हा त्याचा संकल्प पूर्ण करूनच परतला होता. गावातील सर्व लोक त्याच्याकडे पाहत होती. पण या वेळेस जरा वेगळाच नजरेने पाहत होती. कारण त्याचा शांतपणा आणि बोलण्यातला समजदारपणा पाहून लोक हैराण झाली होती. त्याच अवस्थेत तो साधूंकडे गेला व त्यांचे चरण स्पर्श केले. राजू साधू पुढे बसला. साधूने त्याच्याकडे पाहताच ओळखले होते की ,तो आता पूर्णपणे बदलला आहे. म्हणजेच खूप शांत, स्वजवळ अगदी त्याच्या डोळ्यात एक वेगळाच तेजस्वीपणा दिसून येत होता.
राजू साधूंना म्हटला की-मी जेव्हा जंगलात गेलो होतो, तेव्हा एका ठिकाणी शांत मन लावून एकाग्रतेने बसलो होतो. एका ठिकाणी शांत बसल्यामुळे कोणतेही विचार मनात येत नव्हते. फक्त वेगवेगळे आवाज कानावरती पडत होते. यामुळे मन अगदी शांत झाले होते. कोणतेही विचार मनामध्ये गर्दी करत नव्हते. खरंच शांत बसल्यामुळे मन तर शांत झालेच ,पण माझ्या मध्ये बदल पाहून मला माझ्यावरच विश्वास बसत नाही. राजू हा आता एक गावातला चांगला व्यक्ती म्हणून परिचित झाला होता.
खरोखरच आपण ठरवले तर काही पण करू शकतो. माणसाने नेहमी मोजकेच बोलले पाहिजे .थोडे पण चांगले बोलले पाहिजे आणि शांत मनाने गोष्टींचा विचार करायला पाहिजे. मन शांत ठेवल्यामुळे, नको ते विचार मनामध्ये येत नाहीत. त्यामुळे शांत मन ठेवलेच पाहिजे.
Post a Comment