लोकमान्य टिळक/बाळ गंगाधर टिळक/Lokmanya tilak/Bal Gangadhar Tilak

 


            "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच "ही सिंहगर्जना करणारे स्वतंत्र सेनानी म्हणजे लोकमान्य टिळक होय. लोकमान्य टिळक हे एक समाज सुधारक, प्रखर पत्रकार, राष्ट्रीय नेता याबरोबरच विद्वान शिक्षक, संस्कृतचे पंडित आणि गणित व खगोलशास्त्राची आवड ठेवणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.

            लोकमान्य टिळक हे स्वातंत्रता मोहिमेचे अग्रस्थानी होते. ते भारताच्या शांततेचे पिता म्हणूनही ओळखले जातात. त्यांचे विचार हे लोकांद्वारे स्वीकृत केलेले असायचे, त्यामुळे लोकमान्य हे आदरणीय शीर्षक त्यांना लोकांद्वारेच प्राप्त झालेले आहे.

            लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावामध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव केशव होते. लोक त्यांना लाडाने बाळही म्हणत आणि हेच नाव [लोकमान्य-बाळ गंगाधर टिळक] पुढे प्रसिद्ध ही झाले. लोकमान्य टिळक जेव्हा एक वर्षाचे होते, त्यावेळेस भारतामध्ये 1857 चे युद्ध झाले होते. त्यांचे आजोबा रामचंद्रपंत हे त्यांना युद्धाबद्दल गोष्टी सांगत असत. याच कारणाने लोकमान्य टिळक हे लहानपणापासून स्वातंत्र्याच्या विचारणे प्रभावित झालेले होते. ते एक प्रभावशाली विद्यार्थी होते. त्यांना गणित विषय तर खूपच आवडायचा. जेव्हा टिळक मॅट्रिकमध्ये शिक्षण घेत होते, त्यावेळेस त्यांचे लग्न सत्यभामा या मुलीशी लावून दिले. सन 1872 मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याच कॉलेजमधून त्यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने आकार भेटला आणि चिंतन करण्याची क्षमताही वाढली.

            1877 मध्ये त्यांनी गणित विषयात पदवी प्राप्त केली. आणि नंतर एल .एल .बी ची डिग्रीही प्राप्त केली. त्या काळात इंग्रज सरकार फक्त त्यांच्या स्वार्थासाठीच इंग्रजी शिक्षण हे लोकांना देत होते. त्यांचा उद्देश हा त्यांच्या स्वार्थासाठीच होता. परंतु लोकमान्य टिळकांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घेऊन ,राष्ट्रभक्तीच्या योगदानासाठी, सुशिक्षित लोकांचा हेतू वाढवण्यासाठी त्यांचे मित्र गोपाळ गणेश आगरकर ,विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि नाम जोशी यांच्या साह्याने पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि त्याच्याच अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज यांचाही विचार मांडला. त्यांचे मित्र आगरकर यांच्यासोबत त्यांनी पत्रकारते मध्येही प्रवेश घेतला. आणि जंग आजादीची ही सुरुवात केली. त्यांनी मराठीमध्ये केशरी व इंग्रजीमध्ये मराठा हे वृत्तपत्रे छापली. आणि इंग्रजांच्या क्रूरतेबद्दल  वृत्तपत्राद्वारे आपले विचार लोकांसमोर मांडले. याच्याबरोबर त्यांनी सामाजिक कार्यावरही खूप लक्ष दिले. नशाबंदी, बालविवाह ,विधवा पुनर्विवाह यासारख्या सामाजिक समस्यावर जोर दिला. दलित व मागासलेल्या वर्गांना समाजामध्ये आणण्याचा प्रयत्नही केला. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव ,शिवजयंती उत्सव यांचीही स्थापना केली. श्री गणेश हे आस्थेचे प्रतीक आहेत आणि शिवाजी महाराज हे व्यवस्थेचे प्रतीक आहेत. आणि व्यवस्था कोणती ?तर ती स्वराज्याची . यांचाच आदर्श घेऊन त्यांनी राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यास सुरुवात केली. या दरम्यान बंगालचे बिपिन चंद्र पाल व पंजाबचे लाला लजपतराय यांनी टिळक यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांच्यासोबत मैत्रीचा हात मिळवला .आणि यांचा दल "लाल, पाल व बाल" म्हणूनही प्रसिद्ध झाला. या दलाने प्रत्येक घराला प्रत्येक वर्गाला स्वराज्याबद्दल प्रभावित केले. आणि नंतर स्वराज्य हा शब्द प्रत्येकाच्या तोंडातून अधिकार व स्वाभिमानानेच निघत होता. लोकमान्य टिळक हे एक इतिहासकार ही होते. त्यांना जेव्हा जेव्हा कामातून वेळ मिळायचा त्यावेळेस ते ऐतिहासिक माहिती घेण्यास व्यस्त असायचे. त्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला व सांगितले की- सहा हजार वर्षांपूर्वी वेदांची निर्मिती झाली आहे. लोकमान्य टिळक हे अत्यंत बुद्धिमान व तेजस्वी होते.

            स्वतंत्र चळवळीत असताना त्यांना अनेकवेळा तुरुंगवासही भोगावा लागला. ते तुरुंगात मात्र अडकून राहिले पण दुःखात कधीच अडकले नाहीत. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी "गीतारहस्य "हा ग्रंथ लिहिला. लोकांच्या कल्याणासाठी अनेक सामाजिक कार्यही केली. अखेर, 1 ऑगस्ट 1920 रोजी 65 वर्षाचे असताना मुंबईच्या सरदार गृहामध्ये लोकमान्य टिळक या महान महापुरुषाने शेवटचा श्वास घेतला. आणि टिळकयुग समाप्त झाले. महात्मा गांधी हे लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर लोकांना संबोधित करत म्हणाले की-"लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नाही राहिले. हा विश्वासच बसत नाही की, ते आपल्याला सोडून गेले आहेत. ते तर आपल्या देशाचे प्राण बनले होते. एक महान व्यक्ती आपल्या मधून गेले, म्हणजे सिंहगर्जना शांत झाली. येणाऱ्या पिढ्या ना पिढ्या या त्यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हणून सतत आठवणीत ठेवतील. अशा व्यक्तीला मृत समजणं हे चुकीच आहे. त्यांचा आत्मा सदैव आपल्या सोबत राहील."अशा या महान मानवाला कोटी कोटी प्रणाम!






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.