नको असलेलं मुल- "मुलगी"/ nako aslel mul- mulagi


म्हणायला तर लक्ष्मी आहे मुलगी, 
पण खरं पाहता नको असलेलं मुल आहे मुलगी. 

बापाची लाडकी लेक असते मुलगी, 
आईचं सौंदर्य असते मुलगी, 
पण तरीही नको असते ती मुलगी. 

कपडे धु, पुस्तक नीट ठेव,
अभ्यास राहू दे, स्वयंपाक कर, 
स्वतःचे स्वप्न मनातच ठेवून दुसऱ्यासाठी जगणारी ती मुलगी. 

सासरी काम नाही आल्यावर, 
आई-वडिलांनी काय शिकवलं,
हे टोमणे ऐकून घेणारी ती मुलगी.

मनातलं दुःख मनातच ठेवून, 
चेहऱ्यावर हस्य ठेवणारी ती ही मुलगीच,
एवढं करूनही नको असलेलं मुल आहे मुलगी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.