नेताजी सुभाष चंद्र बोस/Netaji Subhash Chandra Bose
"तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा" या प्रकारची घोषणा देऊन देशाच्या स्वतंत्र्यासाठी लढणारे महान देशभक्त म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस होय. नेताजी सुभाष चंद्र बोस हे असे महान व्यक्ती होते की, ज्यांनी भारतातल्या प्रत्येक देश वासियांच्या मनात स्वातंत्र्याची इच्छा निर्माण केली होती. आणि त्यांचे व्यक्तिमत्व एवढे तेजस्वी होते की, त्यांना फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगभरातही ओळखले जाते. सुभाष चंद्र बोस हे गांधीजींचे खूप मोठे समर्थक होते. पण त्यांची स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची वाट ही गांधीजींपेक्षा पूर्णपणे वेगळीच होती. कारण त्यांच्या विचारानुसार स्वातंत्र्यासारख्या मोठ्या युद्धाला अहिंसेच्या मार्गावर चालून मिळवणे अशक्यच होते. जर स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर बऱ्याच जणांना प्राण द्यावे लागतील, आणि बऱ्याच जणांचे प्राणी घ्यावेही लागतील आणि याच कारणामुळे जेव्हा भारताच्या स्वतंत्र्याचे नाव घेतले जाते, त्यावेळेस नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नाव आदराने घेतले जाते.
नेताजी सुभाष चंद्रबोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसाला कट्टक मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस हे होते. व आईचे नाव प्रभावती बोस हे होते. त्याचसोबत त्यांचे 13 भाऊ-बहीण ही होते. सुरुवातीपासून सुभाष चंद्र बोस यांना लिहायला, वाचायला खूप आवडायचे. त्यामुळे शाळेमध्ये सर्व शिक्षकांचे ते आवडते होते. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण प्रोटेस्टंट युरोपियन स्कूल मध्ये केले. नंतर सन 1913 मध्ये मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते स्वामी विवेकानंद व रामकृष्ण यांच्या विचारांपासून खूप प्रभावित व्हायचे. त्यांच्याच विचारांपासून प्रेरणा घेऊन त्यांना असे वाटले की, अभ्यासापेक्षा देशाचे हित हे सर्वात महत्त्वाची आहे. त्यावेळेस ब्रिटिश सरकारचे राज्य असल्यामुळे भारतीयांवर ते खूप जुलूम करत असायचे. जवळ होणारा अत्याचार पाहून त्यांच्या मनात स्वतंत्र्याची आग पेटली.जेव्हा एक शिक्षक भारतीय लोकांबद्दल वेडेवाकडे बोलत होता, त्यावेळेस ते त्यांच्यासोबत खूप भांडले होते. त्याचवेळेस त्यांच्या देशभक्तीबद्दलचे पहिले उदाहरण हे लोकांसमोर उभे राहिले.
1918 मध्ये त्यांनी स्टॉटिश चर्च कॉलेजमधून बी. ए ची डिग्री प्राप्त केली. सुभाषचंद्र बोस देशासाठी काहीतरी करण्याच्या प्रयत्नात होते. पण त्यांच्या वडिलांच्या दबावामुळे त्यांना भारत सोडून इंग्लंडला जावे लागले. कारण त्यांच्या वडिलांना असे वाटायचे की, त्यांनी शिकून मोठी नोकरी करावी. नंतर त्यांनी कॅमब्रिज मधून शिक्षण पूर्ण केले व इंडियन सिविल सर्विस मध्ये चौथी रंग प्राप्त केली .एवढी चांगली नोकरी असूनही त्यांनी ती नाकारली कारण त्यांना ब्रिटिश सरकारमध्ये नोकरी करायला आवडत नव्हते.
भारतीय लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याबद्दल एक आशा निर्माण करण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रे छापायला चालू केले. त्या वृत्तपत्राचे नाव" स्वराज्य "हे होते. त्यांची साथ देण्यासाठी त्यावेळेचे महान नेता चित्तरंजनदास हे बनले. जे की देशभक्तीवर प्रचंड असे भाषण देत असायचे. सुभाषचंद्र बोस यांचे काम पाहून 1923 मध्ये त्यांना "ऑल इंडिया युथ काँग्रेसचे" प्रेसिडेंट बनवण्यात आले. स्वातंत्र्यासाठी लोकांना पेटवून देण्याबद्दल त्यांना पकडून कारागृहात टाकण्यात आले व कारागृहातच त्यांना टी.बी चा आजार झाला. नंतर 1927 मध्ये जेव्हा ते तुरुंगामधून बाहेर आले ,त्यावेळेस त्यांना काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी बनवण्यात आले. जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत त्यांनी स्वतंत्र्यासाठी लढायला सुरुवात केली. 1930 मध्ये ते युरोपला गेले आणि तेथे त्यांनी काही नेत्यांसोबत मिळून पार्टीला कसे चालवायचे हे शिकून घेतले. याच दरम्यान त्यांनी त्यांचे पुस्तक द इंडियन स्ट्रगल प्रकाशित केले. परंतु लंडनमध्ये प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला ब्रिटिश सरकारने बंद केले. नंतर ते भारतात आले व त्यांना भारत काँग्रेस पार्टीचे प्रेसिडेंट म्हणून निवडले गेले. परंतु अहिंसेच्या मार्गावर चालणारे गांधीजी, हिंसेने भरलेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या नीतीला प्रोत्साहन देत नव्हते. जेव्हा ही गोष्ट त्यांना कळली त्यावेळेस त्यांनी काँग्रेस प्रेसिडेंटचा राजीनामा दिला. नंतर त्यांनी पूर्ण जगभर फिरून भारताच्या समर्थनासाठी मागण्या केल्या. यामुळे ब्रिटिश सरकारला भीती वाटू लागली. व ब्रिटिश सरकारला असे वाटायचे की, भारताच्या आर्मीने आमच्याकडून युद्ध लढावे परंतु नेताजींनी या विचाराचा पूर्णपणे विरोध केला. कारण त्यांना वाटत नव्हते की- भारताच्या जवानांनी ब्रिटिशांसाठी आपले प्राण द्यावेत. यामुळे पुन्हा एकदा त्यांना तुरुंगामध्ये टाकण्यात आले.
तुरुंगामध्येही ते शांत बसले नाहीत. त्यांनी तेथे खूप दंगा केला. त्यामुळे तुरुंगामधून घरी आल्यानंतरही त्यांना त्यांच्याच घरात सी.आय.डी. च्या नजर कैदेत ठेवले होते. परंतु 16 जानेवारी 1941 ला सी.आय.डी ला फसवून बाहेर जाण्यास ते यशस्वी झाले. नंतर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते ब्रिटिशांच्या विरुद्ध असलेला देश जर्मनीला गेले. तेथे हिटलरने भारताला सात देण्याचे वचनही दिले परंतु जेव्हा जगाच्या युद्धामध्ये जर्मनीची हार होऊ लागली त्यावेळेस ते जहाजाद्वारे जपानला गेले. त्यांचा मजबूत विश्वास पाहून जपानच्या प्रधानमंत्री ही त्यांची मदत करण्यास स्वीकारले. आणि नंतर जपान सोबत मिळून सुभाषचंद्र बोस यांनी "आझाद हिंदसेनेची" स्थापना केली. ज्याला किलो INA म्हणजे Indian National Army असेही म्हणतात. नंतर त्यांनी आर्मीला मजबूतही बनवले. याच दरम्यान त्यांनी "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा" या प्रकारच्या उत्साहित करणाऱ्या घोषणा देऊन भारतीयांमध्ये ब्रिटिश सरकार बद्दल विरोध निर्माण करून लढण्यासाठी प्रोत्साहन दिले. दुसरीकडे जपान हारल्यामुळे भारताला आर्थिक मदत व हत्यार मिळणे बंद झाले. यामुळे मजबुरीमध्ये नेताजींना इंडियन नॅशनल आर्मीला बंद करावे लागले. अशा प्रकारची स्वातंत्र्यासाठी प्रखर तयारी करताना 18 ऑगस्ट 1945 ला फक्त 48 वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले. त्यांनी लावलेली स्वातंत्र्याची आग काही दिवसांनीच म्हणजे १९४७ ला भारताला स्वातंत्र्य देऊन पूर्ण झाली.
Post a Comment